Sambhaji Raje on Santosh Deshmukh Case : Dhananjay Munde यांनी राजीनामा द्यावा ; संभाजीराजे
Santosh Deshmukh: संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता डॉ. आंबेडकर चौकातून मोर्चा निघणार असून मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. याचदरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी धक्कादायक आरोप केले आहेत.
या प्रकरणावरून संभाजीराजेंनीही गंभीर आऱोप केलेत.. आऱोपींना अद्याप का पकडलं नाही असा सवाल संभीजाराजेंनी उपस्थित केलाय. तर धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्य़ाची मागणीही त्य़ांनी केलीय़.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात पकडले जात नसलेल्या 3 आरोपींचा खून झाल्याचा गंभीर आरोप अंजली दमानियांनी केलाय. यासंदर्भात फोन आल्याचा दावा अंजली दमानियांनी केला आहे. दरम्यान यासंदर्भात पोलीसांना माहिती दिल्याचही अंजली दमानियांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय. दरम्यान धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेत नाहीत? असा सवालही यावेळी अंजली दमानियांनी उपस्थिती केला आहे.