राज्यातील महाविद्यालयं सुरु ठेवायची की नाही? उद्या निर्णय होणार जाहीर
कोरोनाची रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे शाळांपाठोपाठ महाविद्यालयं सुरू ठेवायची की नाही या संदर्भात उद्या निर्णय घेण्यात येणार आहे.
मुंबई : गेले दोन वर्षं कोरोनानं (Corona) बंद ठेवलेल्या शाळा (School), महाविद्यालये आता कुठे सुरू झाल्या होत्या तोच पुन्हा एकदा कोरोनानं शाळेच्या वाटेवर खोडा घातलाय. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील पहिली ते नववीच्या आणि अकरावीच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता राज्यातील महाविद्यालयं सुरू ठेवायची की नाही या संदर्भात उद्या संध्याकाळी 4 वाजता निर्णय जाहीर होणार आहे.
राज्यातील महाविद्यालयांसंदर्भात आज सर्व विभागीयआयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत कोविड 19 संसर्गाबाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थीं, पालक, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या सोबत आरोग्य सुरक्षितते बद्दल सविस्तर चर्चा झाली.
कोरोनाची रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने शाळांबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय. दुसरीकडे वाढता कोरोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे महाविद्यालयांबाबत देखील हा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. महाविद्यालये बंद केली तरी ऑनलाईन शिक्षण मात्र सुरू राहणार आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या इतर बातम्या :