Aurngabad: आदित्य ठाकरेंच्या 'शिवसंवाद यात्रेचा' आज तिसरा दिवस; औरंगाबादसह अहमदनगर जिल्ह्यात...
Aurangabad News: आदित्य ठाकरे आज औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यातील शिवसैनिकांशी संवाद साधणार आहे.
Aurangabad News: राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी (Aditya Thakaray) शिवसंवाद यात्रा (Shivsamvad Yatra) काढली आहे. आदित्य यांच्या शिवसंवाद यात्रेचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान आदित्य ठाकरे आज औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यातील शिवसैनिकांशी संवाद साधणार आहे. औरंगाबाद शहरात मुक्कामी असलेले आदित्य हे सकाळी साडेदहा वाजता शिवसंवाद यात्रेला सुरवात करणार आहे.
असा असणार आजचा दौरा...
- सकाळी 11.30 वाजता, आदित्य ठाकरेंचं पैठणच्या बिडकीनमध्ये स्वागत आणि भाषण होईल.
- दुपारी 2 वाजता, गंगापूरमध्ये स्वागत आणि शिवसैनिकांशी संवाद.
- दुपारी 3 वाजता, नेवासा शहरात शिवसैनिकांकडून जंगी स्वागत आणि संवाद.
- दुपारी 4.30 वाजता, शिर्डी येथे कार्यकर्त्यांशी संवाद.
- संध्याकाळी 5 वाजता, शिर्डी साईबाबा दर्शन आणि दर्शनानंतर मुंबईकडे रवाना.
बंडखोर नव्हे गद्दार...
आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर याच यात्रेतून आदित्य हे बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवत आहे. तसेच आपल्या प्रत्येक भाषणातून शिवसेना सोडून गेलेले बंडखोर नव्हे तर गद्दार असल्याचा उल्लेख आदित्य ठाकरे करतांना पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत सुद्धा त्यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. ठाकरे सरकारने आतापर्यंत सर्वाधिक निधी औरंगाबाद जिल्हाला दिला असतांना गद्दारी का केली? असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला.
शिवसंवाद यात्रेमुळे दुसऱ्या फळीला बळ...
शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे गटात सामील झाल्याने, त्यांच्या मतदारसंघातील दुसऱ्या फळीतील नेते आता सक्रीय होतांना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेमुळे दुसऱ्या फळीला बळ मिळत असून, या यात्रेतील उत्साह त्यानिमित्ताने पाहायला मिळत आहे. ठीक-ठिकाणी शिवसंवाद यात्रेला होणारी गर्दी पाहता शिवसेना पुन्हा जोमाने उभा राहण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या...