(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: प्रेमप्रकरणातून प्रेयसीसह स्वतः पेटवून घेणाऱ्या तरुणाचा अखेर मृत्यू; मुलीवर उपचार सुरु
Aurangabad : मुलीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु असून, तीही गंभीर जखमी झाली आहे.
Aurangabad Crime News: प्रेमप्रकरणातून तरुणाने पेटवून घेत तरुणीला मिठी मारल्याने दोघेही गंभीर भाजल्याची घटना सोमवारी औरंगाबादच्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात समोर आली होती. राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेतील भाजलेल्या तरुणाचा अखेर रात्री 10 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गजानन खुशालराव मुंडे (२९, रा. लोणर, ह.मु. पीएचडी वसतिगृह, विद्यापीठ) असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरूण 95 टक्के भाजला होता. तर मुलीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु असून, तीही गंभीर जखमी झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमप्रकरणातून गजाजन साळवे याने शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्थेच्या इमारतीतील जैवभौतिकशास्त्र विभागात सोमवारी पेट्रोल अंगावर ओतून घेत स्वतःला पेटवून घेतले. यावेळी पूजा साळवेच्या अंगावर देखील पेट्रोल टाकून तिला देखील त्याने मिठी मारली. यात दोघेही गंभीर भाजले. गजाजन 95 टक्के, तर पूजा 45 टक्के भाजली होती. तर गजाननची प्रकृती चिंताजनक होती. दरम्यान रात्री 10 वाजता त्याच्यावर उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे.
मुलासह त्याच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल...
या प्रकरणात अख्खे पोलिस दल कामाला लागले असून उपायुक्त अपर्णा गिते यांच्यासह पोलिस निरीक्षक गीता बागवडे, आम्रपाली तायडे, अविनाश आघाव, प्रशांत पोतदार, अशोक भंडारे हे सर्वजण घटनास्थळी आणि घाटीत दाखल झाले. पोलिसांनी डॉक्टरांच्या परवानगीने दोघांचेही जबाब नोंदविले आहे. पोलिसांनी गजानन आणि त्याच्या आई-वडिलांवर बेगमपुरा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तर 'तु गजाननशी लग्न कर नाहीतर आम्ही जिव देवु अशी धमकी गजाननच्या आई-वडिलांनी मुलीला दिली असल्याचा उल्लेख पोलिसात दाखल करण्यात तक्रारीत आहे.
पूजाने फसवणूक केल्याचा तरुणाचा दावा...
गजाननच्या जबाबानुसार, पूजासोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी जालन्यातील एका गावात मंदिरामध्ये लग्न केले आहे. मात्र, काही महिन्यांपासून पूजा हे मान्य करण्यास तयार नव्हती. त्यामुळे तिने माझी फसवणूक करीत माझे जीवन उद्ध्वस्त केल्यामुळे हे पाऊल उचलले असल्याची माहिती गजाननने मृत्यूपूर्वी पोलिसांना दिली आहे.
शहरात खळबळ...
काही दिवसांपूर्वी एका मुलीला रिक्षा चालकाने अश्लील प्रश्न विचारल्याने तिने धावत्या रिक्षातून उडी मारल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता एका तरुणाने प्रेमप्रकरणात स्वतःसह प्रेयसीसला पेटवून घेतल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची शहरात सर्वत्र चर्चा होत असून, अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.