(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Measles Disease: चिंता वाढली! औरंगाबादमध्ये आणखी एक बालक गोवर पॉझिटिव्ह, हाय रिस्क भागात लसीकरण मोहीम
Aurangabad: आरोग्य विभागातर्फे अतिरिक्त 20 लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.
Aurangabad Measles Disease Update: औरंगाबाद जिल्ह्यात दोन गोवरचे रुग्ण (Measles Disease) पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता आणखी एक बालक गोवर पॉझिटिव्ह आढळून आल्याने चिंता वाढली आहे. शहरातील भानुदासनगरमधील एक वर्षाच्या बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर आणखी तीन संशयित रुग्णाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. तर या घटनेने प्रशासन खडबडून जागं झाला आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य पथकाकडून खबरदारीचे उपाय केले जात आहे. तर गोवरच्या संसर्गाला तोंड देण्याची जय्यत तयारी देखील महापालिका प्रशासनाने केली आहे. त्यामुळे हाय रिस्क भागात (ज्या परिसरात लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी) आरोग्य विभागातर्फे अतिरिक्त 20 लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.
शहरातील एक सात वर्षीय बालकाला गोवरची लागण झाल्यानंतर आता आणखी एका बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आल्याने प्रशासन अलर्ट झालं आहे. तर शहरातील मेलट्रोन हॉस्पिटलमध्ये गोवरचे रुग्णांचे उपचारासाठी विशेष विलगिकरन कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी दिली आहे.
गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. प्रामुख्याने हा आजार पाच वर्षा खालील मुलांमध्ये आढळतो. सर्दी, ताप, खोकला, डोळे लाल होणे व सुरुवातील चेह-यावर व नंतर पूर्ण शरीरावर लाल पुरळ येणे ही प्रमुख्याने लक्षणे गोवर रुग्णांमध्ये आढळतात.औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत ही या अनुषंगाने गोवर रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच ताप व पुरळ असलेले बालकांना उपचारासाठी संदर्भित करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली आहे.
प्रशासनाकडून 'या' उपाययोजना राबविण्यात येत आहे.
- आशावर्कर्स मार्फत घरोघरी गोवर सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
- प्रत्येक संशयित गोवर रुग्णांना जीवनसत्व 'अ' (Vit.A) चे दोन डोस देण्यात येत आहे.
- विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
- ज्या बालकांचे लसीकरण राहीलेले आहे. त्या बालकांची यादी तयार करुन त्यांना लस देण्यात येणार आहे.
- प्रत्येक संशयित संशयित गोवर रुग्ण आढळल्यास त्याचा प्राथमिक उपचार आरोग्य केंद्रामार्फत करण्यातयेत आहे व गरज पडल्यास त्यांना रुग्णालयात संदर्भित करण्यात येत आहे.
- खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व बालरोगतज्ञ यांना याबाबत माहिती देवून त्यांना ही संशयित गोवर रुग्णांची माहिती मनपा आरोग्य विभागास देण्याबाबत कळविण्यात आले आहे.
- सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र देवून गोवर रुग्णांची माहिती देण्याबाबत कळविण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
Measles Disease : औरंगाबाद जिल्ह्यातही गोवरची एन्ट्री, दोन बालके पॉझिटिव्ह; प्रशासन अलर्टवर
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )