एक्स्प्लोर

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंना मिळणार मुस्लीम कार्यकर्त्यांकडून हटके गिफ्ट, 'सस्पेन्स कायम'

Aurangabad : हे गिफ्ट राजकीयदृष्ट्या महत्वाचे असणार असल्याची माहिती ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिली आहे. 

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे आज औरंगाबादच्या सिल्लोड दौऱ्यावर असून, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या या दौऱ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र आता यात आणखीन नवीन घडामोड घडतांना पाहायला मिळत असून, आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान सिल्लोड येथील मुस्लीम कार्यकर्ते त्यांना हटके गिफ्ट देणार असल्याचे समोर आले आहे. मात्र हे हटके गिफ्ट काय असणार आहे याबाबत ठाकरे गटाकडून 'सस्पेन्स कायम' ठेवण्यात आला आहे. 

आदित्य ठाकरे आज संध्याकाळी 6 वाजता सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडा गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. त्यानंतर सिल्लोड शहरातील आंबेडकर चौकात त्यांचे पदाधिकाऱ्यांकडून जंगी स्वागत करण्यात येणार आहे. मात्र यादरम्यान सिल्लोड येथील ठाकरे गटाचे मुस्लीम कार्यकर्ते आदित्य ठाकरे यांना स्पेशल गिफ्ट देणार असल्याची चर्चा आहे. मात्र हे गिफ्ट काय असणार याचा खुलासा ठाकरे गटाने केला नसून, याबाबत 'सस्पेन्स कायम' ठेवण्यात आला आहे. मात्र हे गिफ्ट राजकीयदृष्ट्या महत्वाचे असणार असल्याची माहिती ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिली आहे. 

दोन्ही युवा नेते आमने-सामने...
 
शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सतत पाहायला मिळत आहे. मात्र या दोन्ही नेत्यांमधील राजकीय वाद आता  वारसदरांवर येऊन पोहचला आहे. दरम्यान आज सिल्लोडमध्ये एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे दोन्ही एकाचवेळी उपस्थित असणार आहे. यावेळी श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार असून, आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. त्यामुळे आज दोन्ही युवा नेता आमने-सामने असणार असून, कोण काय बोलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 

पोलिसांची कसरत... 

सिल्लोडमध्ये एकाच दिवशी आणि एकाचवेळी एकमेकांच्य विरोधातील आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांचे कार्यक्रम होणार असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सिल्लोडसह जिल्ह्यातील इतर तालुक्यातील पोलिसांना देखील बंदोबस्तसाठी पाचारण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दोन्ही गटाने कार्यक्रमाची जोरदार तयारी केली आहे. अशात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागणार आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया हे स्वतः सिल्लोड शहरात सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. 

Aurangabad : ठाकरे Vs शिंदे! औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये आज आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्रांची तोफ धडाडणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Embed widget