एक्स्प्लोर

Jejuri Shashan Aplya Dari : कोणाची सभा, कशाचे लाभार्थी, माहितच नाही; फोन आला आणि बसमध्ये बसून आलो; जेजुरीतील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात खोटी गर्दी?

शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या तालुक्यातील नागरिकांना खास एसटी बसेस करुन कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यात आलं आहे. मात्र यापैकी अनेकांना आपल्याला इथे का आणलं आहे?, हेच माहिती नसल्याच दिसून आलं

Jejuri Shashan Aplya Dari : पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे (Jejuri Shashan Aplya dari) होणाऱ्या शासन (Jejuri) आपल्या दारी कार्यक्रम पार पडत आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील नागरिकांना खास एसटी बसेस करुन कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यात आलं आहे. मात्र यापैकी अनेकांना आपल्याला इथे का आणलं आहे?, हेच माहिती नसल्याच दिसून आलं. आपल्याला नक्की कोणत्या योजनेचा लाभ मिळणार आहे हेच अनेकांना सांगता आलं नाही.शासनाच्या कार्यक्रमाला खोटी गर्दी आणली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

चार वेळा हा कार्यक्रम वेगवेगळ्या कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला होता. मात्र अखेर आज हा कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी 451 बसेसच्या माध्यामतून 18 हजाराहून अधिक नागरिक किंवा लाभार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. त्यांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली आहे आणि परत जाताना प्रत्येकाला फळझाड मिळणार आहे. अनेक गावातील ग्रामपंचायतीकडून नागरिकांना फोन आणि मेसेज करुन कार्यक्रमाला जायचं असल्याचं सांगून जेजुरीत घेऊन आले आहे. अनेक नागरिकांना त्यांना नेमका कोणता लाभ मिळणार आहे किंवा जेजुरीत नेमका कशाचा कार्यक्रम आहे. याची अनेक नागरिकांना माहिती नाही आहे. 

या कार्यक्रमासाठी अनेक महिलांनादेखील आणण्यात आलं आहे. सकाळपासून महिला शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी आल्या आहेत. त्यांना गावातील ग्रामपंचायतीकडून नागरिकांना फोन आणि मेसेज आला आहे आणि त्यांच्यासाठी बसची सोय देखील करण्यात आली आहे. मात्र या महिलांनादेखील हा कार्यक्रम कशासाठी आहे, हे माहिती नाही आहे. महाराष्ट्रातील सत्तानाट्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यात येणार होते. त्यात पवारांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच जेजुरीत हा कार्यक्रम होत आहे. 

चारवेळा हा कार्यक्रम पुढे ढकलला गेल्याचा सर्वात मोठा फटका हा विद्यार्थ्यांना बसल्याचं बोललं जात आहे. प्रवेश प्रक्रिया सुरु असताना उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, नॉन क्रिमिलेअरचे दाखले, आर्थिक दुर्बल गटाचे दाखले, यासांठी विद्यार्थ्यांची प्रचंड धावपळ सुरु असते. पण पुण्याच्या तहसील कार्यालयात पडलेल्या चेहऱ्याने शेकडो विद्यार्थी आणि पालक अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्या पाहालया मिळत होत्या. आज कार्यक्रमात अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या-

Ajit Pawar : जयंत पाटलांनी अमित शाहांची भेट घेतली का?; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं...

 
 

महत्त्वाच्या बातम्या

Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Baramati News: इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Rohit Pawar on PAs Girl Death: पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Amravti hospital fire new born baby death: मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Embed widget