एक्स्प्लोर

Samriddhi Highway Accident : चालकाचं नियंत्रण सुटलं, कार थेट दुसऱ्या लेनवर जाऊन आदळली, शिर्डी-भरवीर समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

Samrudhhi Mahamarg Accident : आठ दिवसांपूर्वी उद्घाटन केलेल्या शिर्डी ते भरवीर महामार्गावर (Shirdi To Bharvir Highway) पहिलाच भीषण अपघात झाला आहे.

Samrudhhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर (Samrudhhi Mahamarg) अपघातांची (Accident) मालिका सुरुच आहे. नुकत्याच उद्घाटन केलेल्या शिर्डी ते भरवीर महामार्गावर (Shirdi To Bharvir Highway) पहिलाच अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समजते आहे. शिर्डी ते भरवीर समृद्धी महामार्गावरील सिन्नरच्या पूर्व भागात हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास घडला आहे. 

महाराष्ट्रासह देशातील महत्वाचा मार्ग असलेल्या समृद्धी महामार्ग (Samrudhhi Mahamarg) सुरुवातीपासून चर्चेत राहिलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा झालेल्या शिर्डी ते भरवीर या मार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मुंबईकडून शिर्डी बाजूकडे जाणारी कार ही नाशिक जिल्ह्यातील सिन्नर (Sinnar) तालुक्यातील पूर्व भागातून जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरवर आदळून शिर्डी बाजूकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर थेट जाऊन आदळली. यात कार दोन तीन वेळा उलटली.  या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. 

दरम्यान या अपघातात धरमसिंग गुसींगे, राजेंद्र राजपूत या दोघांचा मृत्यू झाला असून भरतसिंग परदेशी, नंदिणी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघाताची महिती कळताच महामार्गावरील रेस्क्यू पथक आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत मदतकार्य सुरु केले. जखमींना ॲम्ब्युलन्सने कोपरगाव येथील रुग्णालयात प्राथमिक औषधोपचारासाठी पाठवण्यात आले. अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या कडेला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक शशिकांत गिरी, सिन्नर महामार्ग पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. डी. गायकवाड यांच्यासह महामार्गाचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, क्यू.आर.व्ही व्हॅन वाहनावरील कर्मचारी यांनी मदतकार्य केले.

शिर्डी ते भरवीर मार्गावरील पहिला अपघात 

पहिल्या टप्पा खुला झाल्यानंतर उत्साहात वाहतूक सुरु झाली. मात्र अपघातांच्या घटना वारंवार घडत असल्याने हा चिंतेची बाब ठरली. दुसरीकडे 26 मी रोजी नाशिक जिल्ह्यासह अहंमदनगर जिल्ह्यातील दुसरा टप्पा म्हणजे शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटरचा टप्पा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या उद्घाटन सोहळ्यास आठ दिवस होत नाही तोच भीषण अपघात घडला आहे. एकीकडे गेल्या अनेक दिवसांपासून अपघाताची मालिका सुरु असल्याने आता शिर्डी भरवीर मार्गावरही अपघात होत असल्याचे समोर आले आहे.

संमोहित करणारा महामार्ग? 

दरम्यान महाराष्ट्र राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्ग सुरुवातीपासून चर्चेत आहे. नेहमीच या मार्गावर अपघातांच्या घटना घडत आहे. अनेकवेळा अपघाताची नेमकी कारणे काय? यावर विचारमंथनही झाले आहे. समृद्धी महामार्ग वाहनधारकांना एकप्रकारे संमोहित करत असून सुनसान वाटणाऱ्या रस्त्याने प्रवास करताना वाहनधारकांचे नियंत्रण सूटत असल्याचे बोलले जात आहे. समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली असली तरी अद्याप वाहनधारकांना महामार्गावरुन वाहने चालवण्याचा अंदाज येत नसल्याने अपघातात वाढ झाली आहे. वाहनधारक सुसाट वेगाने महामार्गावरुन जात असल्याने एकतर चालकाचे नियंत्रण सुटून किंवा वाहनाचे टायर फुटून अपघात होत आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget