एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Maharashtra Mumbai Rain LIVE Updates : सर्वदूर पाऊस! उत्तर महाराष्ट्र वगळता सर्वत्र पावसाची नॉन-स्टॉप बॅटिंग, प्रत्येक अपडेट्स...

Maharashtra Mumbai Rain LIVE Updates : उत्तर महाराष्ट्र वगळता सर्वत्र पावसाची नॉन-स्टॉप बॅटिंग, कोकणाला पुढील चार दिवसांसाठी रेड अलर्ट, तर मुंबईतही पुढील पाच दिवस अतीवृष्टीचा इशारा

LIVE

Key Events
Maharashtra Mumbai Rain LIVE Updates : सर्वदूर पाऊस! उत्तर महाराष्ट्र वगळता सर्वत्र पावसाची नॉन-स्टॉप बॅटिंग, प्रत्येक अपडेट्स...

Background

Maharashtra Mumbai Rain LIVE Updates : मुंबईत पावसाची (Mumbai Rain) नॉन स्टॉप बॅटिंग सुरुच आहे. मुंबईला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत आज काही ठिकाणी 200 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच, मुंबईत 7 आणि 8 जुलै रोजी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, रात्रभर कोसळत असलेल्या पावसामुळं अनेक सखच भागांत पाणी साचलं आहे.  

पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये दोन ते तीन फूट पाणी भरलं होतं. त्यामुळे अंधेरी सबवे वाहनांसाठी आणि इतर नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. याशिवाय सायन, माटुंग्यातही काही प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या हिंदमातामध्ये मात्र अजिबात पाणी साचचेलं नाही. 

सध्या मुंबई लोकल ट्रेन सुरळीत असून पश्चिम रेल्वे त्याचबरोबर मध्य रेल्वेची वाहतूकही सुरळीत आहे. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूकही सुरुळीत सुरु आहे. आज दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत पुढील 5 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच आज आणि उद्या मुंबईत हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

मंगळवार, बुधवार असे दोन दिवस पावसानं मुंबईत जोरदार बॅटिंग केली. दिवसभर मुसळधार पाऊस मुंबईत कोसळल्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साठल्याचं पाहायला मिळालं होतं, याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं प्रत्येक वॉर्डमध्ये विशेष खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड या ठिकाणी देखील पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळत होता. हवामान विभागाकडून कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापुरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिक, पुण्यातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आज दिवसभरातली परिस्थिती पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आव्हान हवामान खात्याच्या वतीनं करण्यात आलं आहे. 

काल (बुधवारी) झालेल्या मुसळधार पावसामुळं शहरातील काही भागांत पाणी साचल्यानं (Water Lodging) नागरिकांची मोठी गैरसोय झाली. काल दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळं सायनच्या रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. अंधेरी, घाटकोपर, चेंबूर, धारावी, दादर, वडाळा, पनवेलमध्येही लोक साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत घर गाठताना दिसले. पण संध्याकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यामुळं साचलेलं पाणी ओसरलं. पण रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळ पुन्हा सखल भागांत पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. 

20:38 PM (IST)  •  07 Jul 2022

मुंबईच्या धरणांमध्ये किती आहे साठा?

मुंबईच्या धरणांमध्ये किती आहे साठा? (सकाळी ६ वाजेपर्यंत) 
 
अप्पर वैतरणा - ० टक्के 
मोडक सागर - ४३.५४ टक्के 
तानसा - २१ टक्के 
मध्य वैतरणा - १३.०१ टक्के 
भातसा - २०.७० टक्के 
विहार - ४०.५८ टक्के 
तुसली - ५८.३५ टक्के 
————
एकूण - १९ टक्के पाणीसाठा
———
 
या मौसमात पहिल्यांदाच मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या प्रमाणापेक्षा अधिक झालाय 
 
तलावातील एकूण पाणीसाठा 19 टक्के इतका 
 
पुढील काही दिवस धरण क्षेत्रात चांगल्या पावसाची शक्यता
20:36 PM (IST)  •  07 Jul 2022

वसई विरारमध्ये सलग तीन दिवस पावसाचा जोर

वसई - वसई विरारमध्ये सलग तीन दिवस पावसाचा जोर कायम असल्याने शहरातील सखल भागातील रस्त्यावर पाणी साचलेलं आहे. वसईतील गास सनसिटी रस्ता हा बुधवारपासून पाण्याखाली गेला आहे. आज या रस्त्यावर तीन ते साढे तीन फुट पाणी होतं. रस्ताच पाण्याने गायब झाला होता.  आज दुपारी वसई विरार महानगरपालिकेची कचरा उचळणारा डंपर या पाण्यातून गेला.  ड्रायव्हरला रस्त्याचा अंदाज न तो रस्त्याच्या बाजूलाच पलटी झाली आहे. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. माञ बाजूला सनसिटी चौकी आहे. आणि रस्त्यावर पाणी भरले असताना वाहतुक सुरु असल्याने राञीत मोठी दुर्घटना होवू शकते. असा सामान्य नागरीकांनी तक्रारी केल्यानंतर, माणिकपूर पोलिसांनी आज गुरुवारी सायंकाळनंतर बॅरेकेट लावून सदरचा गास सनसिटी रस्ता बंद केला आहे. वसईच्या शहरी आणि ग्रामीण भागाला जोडणारा हा शॉर्टकट रस्ता आहे. सध्या शाळांना सुट्टी असल्याने नागरीकांनी येथे सायंकाळी फिरण्यासाठी  गर्दी केली होती.

14:30 PM (IST)  •  07 Jul 2022

एका महिन्यात राज्यात तब्बल 66 जणांचा मृत्यू, पाऊस आणि काही नैसर्गिक कारणास्तव मृत्यू झाल्याची नोंद

एका महिन्यात राज्यात तब्बल 66 जणांचा मृत्यू, पाऊस आणि काही नैसर्गिक कारणास्तव मृत्यू झाल्याची नोंद, १ जुन ते ६ जुलै या कालावधीत तब्बल ६६ जणांचा मृत्यू, नाशिक जिल्हात तब्बल १२ तर नागपुर जिल्ह्यात ८ जणांचा सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद

14:10 PM (IST)  •  07 Jul 2022

Aurangabad Rain Update: औरंगाबादमध्ये पावसाला सुरवात; गंगापूरमध्ये मुसळधार

Aurangabad: औरंगाबादमध्ये आज दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. बिडकीन, गंगापूरमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. तर गंगापूर शहरात तासाभरापासून मुसळधार पाऊस पडत आहे. तर पैठण,चित्तेगाव, सावखेडा, सावरगाव, पाचोडला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

12:27 PM (IST)  •  07 Jul 2022

पनवेल तालुक्यातील आपटा खारपाडा मार्गावरील रस्त्यावर पाणी साचले, काल रात्री झालेल्या पावसामुळे पाताळगंगा नदीचे पाणी रस्त्यावर

रायगड  : पनवेल तालुक्यातील आपटा खारपाडा मार्गावरील रस्त्यावर पाणी साचले, काल रात्री झालेल्या पावसामुळे पाताळगंगा नदीचे पाणी रस्त्यावर आले. आपटा खारपाडा मार्गावर सुमारे अडीच ते तीन फूट पाणी साचले.. सुमारे १५०  मीटर मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक बंद..

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
सरकारी नोकरीची संधी, 237 विविध जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
सरकारी नोकरीची संधी, 237 विविध जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
Muslim Bollywood Actors Hindu Screen Names : दिलीपकुमार ते मधुबालापर्यंत! या 11 प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्सनी मुस्लिम असूनही हिंदू नावे सहज स्वीकारली
दिलीपकुमार ते मधुबालापर्यंत! या 11 प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्सनी मुस्लिम असूनही हिंदू नावे सहज स्वीकारली
काळजी करु नका, देवेंद्र फडणवीसांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार, भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य 
काळजी करु नका, देवेंद्र फडणवीसांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार, भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 28 November 2024Nalasopara Achola Vasant nagri | नालासोपाऱ्यातील आचोळा वसंत नगरीत 41 इमारतींवर पालिकेची तोडक कारवाईAjit Pawar Full PC : मी ज्योतिषी नाही, मुख्यमंत्रि‍पदाच्या प्रश्नावर अजित पवार संतापले ABP MajhaShrikant Shinde Big News : एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
सरकारी नोकरीची संधी, 237 विविध जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
सरकारी नोकरीची संधी, 237 विविध जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
Muslim Bollywood Actors Hindu Screen Names : दिलीपकुमार ते मधुबालापर्यंत! या 11 प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्सनी मुस्लिम असूनही हिंदू नावे सहज स्वीकारली
दिलीपकुमार ते मधुबालापर्यंत! या 11 प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्सनी मुस्लिम असूनही हिंदू नावे सहज स्वीकारली
काळजी करु नका, देवेंद्र फडणवीसांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार, भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य 
काळजी करु नका, देवेंद्र फडणवीसांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार, भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य 
Shrikant Shinde Big News : एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार?
Shrikant Shinde Big News : एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार?
अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी... मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 
अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी... मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 
नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडूंचा सुळसुळाट; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गडांतर; चौकशीही मागणी
नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडूंचा सुळसुळाट; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गडांतर; चौकशीही मागणी
Mohammed Siraj On RCB : आरसीबीसोबतची सात वर्षे माझ्या हृदयात; जिगरी दोस्त कोहलीची साथ सुटताच सिराज भावूक, राशीद खानची सुद्धा कमेंट
आरसीबीसोबतची सात वर्षे माझ्या हृदयात; जिगरी दोस्त कोहलीची साथ सुटताच सिराज भावूक, राशीद खानची सुद्धा कमेंट
Embed widget