एक्स्प्लोर

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 14 आणि 15 मार्चला 'या' भागातील पाणीपुरवठा बंद

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील काही भागांत येत्या सोमवारी आणि मंगळवारी (14 आणि 15 मार्च) पाणीपुरवठा बंद असणार आहे. मुंबई महानगरपालिकेने ही माहिती दिली आहे.

मुंबई :  बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे लोअर परळ येथे सेनापती बापट मार्गावर गावडे चौकात 1450 मिलीमीटर व्यासाच्या  तानसा पूर्व व पश्चिम मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.  हे काम  14 मार्च 2022 रोजी सकाळी 8 वाजता सुरु होऊन ते मंगळवार  15 मार्च  2022  रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.  या कालावधीत महानगरपालिकेच्या जी/दक्षिण आणि जी/उत्तर विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. तर जी/दक्षिण विभागातील काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

त्याचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे आहे.

जी/ दक्षिण विभाग :  डिलाई रोड बी. डी. डी., संपूर्ण प्रभादेवी परिसर, जनता वसाहत,  संपूर्ण  लोअर परळ विभाग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, ना. म. जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एस. एस. अमृतवार मार्ग  या भागात सोमवारी, 14 मार्च 2022 रोजी दुपारी 2.30 ते दुपारी 3.30 वाजता डिलाई रोड पाणीपुरवठा आणि दुपारी 3.30 ते सायंकाळी 7 वाजता  पाणीपुरवठा होणार नाही

जी/उत्तर विभागः संपूर्ण प्रभादेवी परिसर, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर  मार्ग, सेनाभवन परिसर, मोरी मार्ग, टी. एच. कटारिया मार्ग, कापड बाजार, पूर्ण माहीम (पश्चिम) विभाग, माटुंगा (पश्चिम) विभाग, दादर (पश्चिम) विभाग या भागात सोमवारी 14  मार्च 2022 रोजी दुपारी 4  ते सायंकाळी 7  तसेच सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजता  पाणीपुरवठा होणार नाही

 जी/दक्षिण विभागः ना. म. जोशी मार्ग, डिलाई रोड बी.डी.डी., सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग  या भागात मंगळवार दिनांक 15 मार्च 2022 रोजी पहाटे 4.30 ते सकाळी  7.45 वाजता या वेळेत पाणीपुरवठा होणार नाही

जी/दक्षिण विभागः धोबीघाट, सातरस्ता -मंगळवारी 15  मार्च  रोजी पहाटे 4 ते सकाळी 7 वाजता डिलाई रोड पुरवठा भागात  पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे

त्यामुळे सर्व संबंधीत विभागातील नागरिकांना या कालावधीतील पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेच्या फटक्यानंतर भाजप आता 'ताकही फुंकून पिणार', खुद्द अमित शाहांचं मुंबईवर लक्ष, विधानसभेला मायक्रो प्लॅनिंग
लोकसभेच्या फटक्यानंतर भाजप आता 'ताकही फुंकून पिणार', खुद्द अमित शाहांचं मुंबईवर लक्ष, विधानसभेला मायक्रो प्लॅनिंग
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, त्यापूर्वी करावं लागणार महत्त्वाचं काम
पीएम किसान सन्मानचे 2 हजार रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना मिळणार, ई केवायसी करुन घ्या, अन्यथा...
Pune Crime News: पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं?
पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं
Amit Shah : अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या Top 80 At 8AM 27 Sept 2024Hingoli Soyabean Loss due to Rain : परतीच्या पावसाने हिंगोलीत सोयाबीनचे नुकसानएबीपी माझा मराठी  न्यूज हेडलाईन्स : ABP Majha Marathi News Headlines: 27 September 2024माझं गाव माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 630AM Superfast 27 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेच्या फटक्यानंतर भाजप आता 'ताकही फुंकून पिणार', खुद्द अमित शाहांचं मुंबईवर लक्ष, विधानसभेला मायक्रो प्लॅनिंग
लोकसभेच्या फटक्यानंतर भाजप आता 'ताकही फुंकून पिणार', खुद्द अमित शाहांचं मुंबईवर लक्ष, विधानसभेला मायक्रो प्लॅनिंग
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, त्यापूर्वी करावं लागणार महत्त्वाचं काम
पीएम किसान सन्मानचे 2 हजार रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना मिळणार, ई केवायसी करुन घ्या, अन्यथा...
Pune Crime News: पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं?
पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं
Amit Shah : अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
Mumbai University Senate Election 2024: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल, युवासेना Vs अभाविप, कोण मारणार बाजी?
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल, युवासेना Vs अभाविप, कोण मारणार बाजी?
Andheri News : मुसळधार पावसात नाल्यात वाहून गेली महिला, कुटुंबीयांचा आक्रोश
Andheri News : मुसळधार पावसात नाल्यात वाहून गेली महिला, कुटुंबीयांचा आक्रोश
पालघरमध्ये वाढवण बंदराजवळ रिलायन्स 880 एकर जमिनीमध्ये टेक्सटाईल पार्क उभारणार,एमआयडीसीकडून हालचाली सुरु
रिलायन्स पालघरमध्ये प्रस्तावित वाढवण बंदराजवळ टेक्स्टाईल पार्क उभारणार, एमआयडीसीकडून हालचाली सुरु
Sharad Pawar: आता मिशन विधानसभा! अकलूजमध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदे अन् मोहिते पाटील त्रिकुट एकत्र, महायुतीचं  टेन्शन वाढलं?
आता मिशन विधानसभा! अकलूजमध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदे अन् मोहिते पाटील त्रिकुट एकत्र, महायुतीचं टेन्शन वाढलं?
Embed widget