Maharashtra Monsoon Session : विधान परिषदेत गदारोळ, निलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं, पाहा नेमकं काय घडलं?
विधानपरिषदेत आज पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) आणि उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.
Maharashtra Monsoon Session : आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Session) दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या दिवशी विधानपरिषेदत गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. विधानपरिषदेत आज पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) आणि उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. उपसभापती निलम गोऱ्हे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना सुनावल्याचे पाहायला मिळालं. शेवटी ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांना हस्तक्षेप करावा लागला.
नेमकं काय घडलं?
राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना त्रुटी पूर्ततेनंतर अनुदान मंजूर करण्याबाबतच्या विषयावर विधानपरिषदेच चर्चा सुरु होती. यावेळी अनुदान मंजूर का केलं नाही? असe सवाल विरोधी पक्षाने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना विचारला. यावर त्यांनी फाईल फायनान्स विभागाकडं पाठवली असल्याचं सांगितलं. यावर विरोधकांनी मागच्या मुख्यमंत्र्यांनी फाईलवर सही केली असताना देखील आता फाईल पुन्हा फायनान्स विभागाकडं का पाठवली, याच मुद्यावरुन सभागृहात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी गुलाबराव पाटील बोलत असताना त्यांना खाली बसण्याची विनंती निलम गोऱ्हे करत होत्या. मात्र, ते बोलतच होते. यावेळी गोऱ्हे यांनी मंत्री पाटील यांना चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळालं. तुमची सभागृहात वागायची ही कोणती पद्धत झाली. तुम्ही काय चौकात उभे आहात काय? हे सभागृह आहे, असे म्हणत गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटलांना सुनावलं.
चंद्रकांत पाटील यांनी केला हस्तक्षेप
दिपक केसरकर यांच्याशी संबधीत शिक्षण विभागाचा प्रश्न आहे. तुम्ही खाली बसा अशी विनंती निलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटील यांनी केली होती. चुकीच्या पद्धतीने गुलाबराव पाटील हे हातवारे करुन बोलत होते, त्यामुळं त्यांनी खाली बसावे असे गोऱ्हे म्हणाल्या. यावेली विरोधक आणि सत्ताधारी समोरासमोर येऊन गोंधळ घालत होते. यावेळी संसदीय कार्यमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी गुलाबराव पाटील यांना समज द्यावी असे गोऱ्हे म्हणाल्या. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करत हस्तक्षेप केला. सभागृहातील सदस्यांना विनंती करत खाली बसण्याचे आवाहन केले.
महत्त्वाच्या बातम्या: