एक्स्प्लोर

काळ्या अन् पांढऱ्या दाढीवाल्यांवरुन भुजबळांची टोलेबाजी! विधानसभेत फडणवीसांसोबत रंगली जुगलबंदी 

दुसऱ्या दिवशी अशीच जुगलबंदी रंगली ती छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात. विषय होता दाढीचा. तो ही राज्यातील काळ्या दाढीचा आणि केंद्रातील पांढऱ्या दाढीचा.

Maharashtra Monsoon Session Live: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Session) आज दुसरा दिवस सुरु आहे. अधिवेशन म्हटलं की टोलेबाजी आणि जुगलबंदीचा खेळ हा ठरलेला असतो. यात नाव न घेता एकमेकांवर प्रहार देखील केले जातात. काही प्रश्नांवर आक्रमकपणे तर काही प्रश्नांवर हसत खेळत टोलेबाजी करत सरकारकडून उत्तरं काढण्याचा प्रयत्न केला जातो. आज दुसऱ्या दिवशी अशीच जुगलबंदी रंगली ती छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात. विषय होता दाढीचा. तो ही राज्यातील काळ्या दाढीचा आणि केंद्रातील पांढऱ्या दाढीचा. भुजबळ आणि फडणवीसांची ही जुगलबंदी पाहून सभागृह मात्र खळखळून हास्यधारेत चिंब झालं. 

'नशीब आमचं की तुम्ही भाषणावर जीएसटी लावली नाही'

छगन भुजबळ यांनी शाळेतील पुस्तकांवरील जीएसटीवर बोलताना सरकारवर ताशेरे ओढले. त्यांनी म्हटलं की, नशीब आमचं की तुम्ही भाषणावर जीएसटी लावली नाही.  नाहीतर एक मिनिट बोलले तर जीएसटी लावतील. आम्ही पेपरात वाचलं की फडणवीस यांची ताकद वाढली आहे.  केंद्राच्या कुठल्या तरी समितीवर त्यांची  नियुक्ती झाली आहे.  जरा तिथे जाऊन सांगा अन्नधान्यावर जीएसटी लावू नका, असं भुजबळ म्हणाले. पुढं बोलताना त्यांनी आपला मोर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे वळवला. 

पांढऱ्या दाढीचा प्रभाव हा हिंदुस्थानावर 

भुजबळांनी म्हटलं की,  तुम्ही मुख्यमंत्री झालात ते मला चांगलं वाटलं. वेगळ्या पद्धतीनं मला चांगली गोष्ट वाटते कारण की हे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री आहेत.  पण यांची काळी दाढी आहे.  त्यांचा प्रभाव हा महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. पांढऱ्या दाढीचा प्रभाव हा हिंदुस्थानावर आहे, असं भुजबळ म्हणाले. 

आमच्याकडे पांढऱ्या दाढीचा फार सन्मान केला जातो

यावर प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जीएसटी संदर्भात जे काही बदल झाले आहे त्यानुसार आपण हे बिल आणलं आहे. भुजबळसाहेब हे लोकसभेतलं भाषण होतं पण ते आपण विधानसभेत केलं.  आमच्याकडे पांढऱ्या दाढीचा फार सन्मान केला जातो, असंही फडणवीस म्हणाले. 

जीएसटीमधील पळवाट बंद केली

नाना पटोले यांनी म्हटलं की,  राजाच्या तिजोरीच्या चाव्या या पहिल्या इकडे (अजित पवारांकडे हात करत) होत्या. त्या आता समोर गेल्या आहेत.  अजित दादा आता डोळे मारत आहेत. (यावर दादांनी हात जोडले) शाळेतील पुस्तकांवर ही जीएसटी लावण्यात आला आहे, असं ते म्हणाले.  यावर फडणवीस म्हणाले की, जीएसटीमधील पळवाट बंद केली आहे.  दूध आणि दही कोणाला विकायाचं असेल त्यावर जीएसटी नाही.  नानाभाऊ तुमचं सरकार असताना आम्ही म्हणायचो की पेट्रोल डिझेलचे दर कमी करा मात्र ते तुम्ही केले नाहीत.  आमचं सरकार आल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला.  कालच सीएनजी वरील कर केंद्राने कमी केला आहे, असं ते म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या

Maharashtra Monsoon Assembly Session : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, 'या' मुद्द्यांवर विरोधक होणार

Maharashtra Monsoon Session LIVE : पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्ट पर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget