दोन खासदार, तीन आमदारांचे राजीनामे, मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत कोणी कोणी पद सोडलं?
Maratha Reservation : मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील 3 आमदार आणि दोन खासदारांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये शिंदे गटाचे 2 खासदार, 1 आमदार, काँग्रेसचा एक आमदार आणि भाजपच्या एक आमदाराचा समावेश आहे.
Maharashtra Maratha Reservation : राज्यात मराठा आंदोलनं पेटलं आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी राज्यभरातील (Maharashtra News) मराठे एकत्र आले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जालन्यातील (Jalna) आंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केलं आहे. अशातच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून अनेकांनी पाठिंबा दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा प्रभाव राजकीय वर्तुळातही दिसून येत आहे. मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत काही आमदार आणि खासदारांचं राजीनामा सत्र पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील 3 आमदार आणि दोन खासदारांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये शिंदे गटाचे 2 खासदार, 1 आमदार, काँग्रेसचा एक आमदार आणि भाजपच्या एक आमदाराचा समावेश आहे.
आतापर्यंत कोणी-कोणी दिलाय खासदारकी आणि आमदारकीचा राजीनामा?
- हिंगोलीचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील
- नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे
- वैजापूरचे शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे
- परभणीचे काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर
- गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार
दरम्यान, राज्यातील मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. मराठा आंदोलकांनी प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर यांच्या घरावर दगडफेक केली. तसेच, त्यांच्या गाड्याही फोडल्या. यासर्व प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्यातील परिस्थितीमुळे गृहमंत्र्यांनी तातडीनं राजीनामा द्यावा, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
वेळ पडल्यास राजीनामा देईन : सुहास कांदे
जोपर्यंत जरांगे पाटील यांचं उपोषण सुटत नाही आणि मराठा आरक्षणावर काही ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत कुठल्याही गावात जाणार नाही आणि कुठल्याही विकास कामांचं उद्घाटन करणार नाही. मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा आहे, असं वक्तव्य आमदार सुहास कांदे यांनी केलं आहे. वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी मी माझा राजीनामा देईल, असंही कांदे यांनी म्हटलं आहे.
...तर मराठा आरक्षणासाठी राजीनामा देईन : नरहरी झिरवळ
मराठा आंदोलकांकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी राजीनामा देईन, असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मराठा आंदोलनातील तोडफोड प्रकरणी पोलीस अॅक्शन मोडमध्ये; संभाजीनगरात पहिला गुन्हा दाखल