मराठा आंदोलनातील तोडफोड प्रकरणी पोलीस अॅक्शन मोडमध्ये; संभाजीनगरात पहिला गुन्हा दाखल
Maratha Reservation : मराठवाड्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. याचप्रकरणी छत्रपती संभाजीनंगरात याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यभरात हिंसक आंदोलन पाहायला मिळत असून, मराठवाड्यातील (Marathwada) अनेक भागात तोडफोड आणि जाळपोच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांच्या कार्यालयाची देखील तोडफोड करण्यात आली होती. आता या प्रकरणी तोडफोड करणाऱ्या आरोपींविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी 30 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.
मराठवाड्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. याचे लोण आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील पसरले आहे. आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची सोमवारी तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आता या प्रकरणात तोडफोड करणाऱ्या आंदोलकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी 30 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या 10 ते 12 आंदोलकांची ओळख पटली असून, इतर अज्ञात लोकांविरोधात हा गुन्हा दाखल केला गेला आहे.
पोलिसांकडून शांततेचं आवाहन
मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागला असून बीड आणि धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आंदोलनाची पडसाद आता विभागातील अनेक जिल्ह्यात देखील पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगर पोलीस देखील अलर्ट झाले आहे. पोलिसांकडून आंदोलकांना शांततेचा आवाहन करण्यात येत आहे. सोबतच प्रत्येक आंदोलनावर पोलिसांचं लक्ष आहे.