एक्स्प्लोर

ST Workers Strike : ST महामंडळातील कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात, एका दिवसांत 15 हजार 185 कर्मचारी हजर

ST Workers Strike : पुढील चार दिवसांत एसटी पूर्ण क्षमतेने सुरू होईल असा एसटी प्रशासनाला विश्वास आहे.

ST Workers Strike : एसटी महामंडळातील कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी एका दिवसांत एसटी महामंडळातील 15 हजार 185 कर्मचारी हजर असल्याची माहिती मिळत आहे. ऑक्टोबर, 2021 च्या शेवटच्या आठवड्यापासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचार्‍यांचे राज्य शासनात विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला होता. 

पुढील चार दिवसांत एसटी पूर्ण क्षमतेने सुरू होईल
एसटी महामंडळातील कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात झाली आहे. पुढील चार दिवसांत एसटी पूर्ण क्षमतेने सुरू होईल असा एसटी प्रशासनाला विश्वास आहे. तर नव्याने हजर होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना एक दिवसाचे जुजबी प्रशिक्षण देण्यात येणारं असे परिवहन मंडळाकडून सांगण्यात आले आहे. 

एका दिवसांत 15 हजार 185 कर्मचारी हजर

सोमवारी एका दिवसांत एसटी महामंडळातील 15 हजार 185 कर्मचारी हजर होते, मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 82 हजार 108 कर्मचाऱ्यांपैकी 61 हजार 647 कर्मचारी कामावर हजर आहेत, तर 20 हजार 461 कर्मचारी कामावर अद्याप बाकी आहेत. प्रशासकीय 12 हजार 6, कार्यशाळा 15 हजार 781, चालक 29 हजार 485 तर वाहक 24 हजार 826 कर्मचारी हजर आहेत. 

 22 एप्रिलची डेडलाइन 
ऑक्टोबर, 2021 च्या शेवटच्या आठवड्यापासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचार्‍यांचे शासनात विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला होता. महामंडळाने कर्मचार्‍यांच्या काही मागण्या मान्य केल्या. मात्र, त्याला न जुमानता कर्मचारी संपावर ठाम होते. अखेर उच्च न्यायालयाने दखल घेऊन कर्मचार्‍यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर येण्यास सांगितले. ज्यांच्या विरोधात बडतर्फी, निलंबन अथवा अन्य कारवाया सुरू असतील, त्या मागे घेऊन समज देऊन त्यांना कामावर घेऊ. मात्र, 22 तारखेनंतर जे कर्मचारी कामावर येणार नाहीत, त्यांना नोकरीची गरज नाही, असे समजून त्यांची सेवा समाप्त केली जाईल, असे परिवहनमंत्र्यांनी सांगितलंय. एसटी महामंडळाने संपातील कर्मचार्‍यांना कामावर हजर होण्यासाठी आतापर्यंत सात वेळा संधी दिली. मात्र, या काळात 30 टक्केही कर्मचारी हजर होऊ शकले नाहीत. आता न्यायालयानेच 22 एप्रिलची डेडलाइन दिली आहे. तोपर्यंत हजर झाले, तर कारवाई होणार नाही. मात्र, त्यानंतर हजर होण्याची संधी मिळणार नाही. 

महत्त्वाच्या बातम्या: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ब्रेक फेल झाले की केले? अमोल मिटकरींचा सवाल, अंजली दमानिया म्हणाल्या, ईडी चौकशी झाली, हा अपघात असूच शकत नाही
ब्रेक फेल झाले की केले? अमोल मिटकरींचा सवाल, अंजली दमानिया म्हणाल्या, ईडी चौकशी झाली, हा अपघात असूच शकत नाही
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
. धक्कादायक! घरात लग्नाची लगबग आणि आनंदाचे वातावरण, रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल 
. धक्कादायक! घरात लग्नाची लगबग आणि आनंदाचे वातावरण, रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल 
ॲक्सिस बँकेत असताना माझ्यासमोर अशी प्रकरणे झाली, नाशिक TCS प्रकरणावरुन अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
ॲक्सिस बँकेत असताना माझ्यासमोर अशी प्रकरणे झाली, नाशिक TCS प्रकरणावरुन अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य 

व्हिडीओ

Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
Shrikant Shinde On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शुभेच्छा! ऑन आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष ..
Yunus Shaikh On Sahar Shaikh : सहर नॉटरिचेबल? जात प्रमाणपत्र अवैध? वडिलांचं एका शब्दात उत्तर
Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे

Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
Gold : 2026 मध्ये सोन्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले,अक्षय तृतीयेपूर्वी सोन्यात चढ-उतार; पुढे काय होणार, मोतिलाल ओसवालचा अहवाल काय सांगतो?
2026 मध्ये सोन्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले, पुढं काय होणार,मोतिलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचा अहवाल काय सांगतो?
Embed widget