एक्स्प्लोर

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात, तेढ निर्माण करणारं 'ते' वक्तव्य भोवलं

Gunratna Sadavarte News : शरद पवारांच्या घरावर हल्लाप्रकरणी ताब्यात असलेल्या सदावर्ते यांच्यावर साताऱ्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदावर्तेंना ताब्यात घेत पोलिस साताऱ्याकडे रवाना झाले

Gunratna Sadavarte Satara Police News : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte)यांना आता सातारा पोलिसांनी  (satara police)ताब्यात घेतलं आहे. तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी दोन वर्षांपूर्वी त्यांच्याविरोधात साताऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांची सातारा पोलीस चौकशी करणार आहेत. शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर सदावर्ते यांना अटक करण्यात आली. काल त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पण आता त्यांचा ताबा सातारा पोलिसांना देण्यात आला आहे. 

शरद पवारांच्या (sharad Pawar) घरावर हल्लाप्रकरणी ताब्यात असलेल्या सदावर्ते यांच्यावर दुसरीकडे साताऱ्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी  एका खाजगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे संभाजीराजे यांच्याविरोधात आक्षेपार्य वक्तव्य केले होते. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त भावना तयार झाल्या होत्या. दरम्यान सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्ते याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साताऱ्यामध्ये उदनराजे भोसले आणि संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल आहे. ऑक्टोबर 2020मध्ये दाखल गुन्ह्याच्या चौकशीसाठी सदावर्ते यांना बोलावण्यात आले होते. मात्र ते गैरहजर राहिल्याने सातारा शहर पोलिसांनी या प्रकरणात ताबा मिळण्यासाठी गिरगाव न्यायालयात अर्ज केला होता. अखेर पोलिसांची विनंती मान्य करत न्यायालयाने सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे दिल्यानंतर आज सदावर्तेंना सातारा पोलिसांनी ताब्यात घेत साताऱ्याकडे रवाना झाले आहेत.

नागपुरातून संदीप गोडबोले पोलिसांच्या ताब्यात  

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तसंच आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांना 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. तसंच 17 एप्रिलपर्यंत सदावर्ते यांचा ताबा घेण्याची सातारा पोलिसांना परवानगीही देण्यात आली आहे. अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी साताऱ्यात सदावर्तेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सिल्व्हर ओकवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नागपुरातून संदीप गोडबोले नावाच्या एसटी कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पवारांच्या घरावरच्या हल्ल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून हुसकवण्यात आलं होतं. त्यानंतर अनेक आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकाकडे मोर्चा वळवला. या आंदोलकांना तिकीटासाठी पैसे दिल्याचा उल्लेख अभिषेक आणि संदीप यांच्यातील फोन संभाषणामध्ये आढळून आला आहे. 

संबंधित बातम्या :

शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरण; ताब्यात घेतलेल्या दोघांमधील खळबळजनक संवादाची क्लिप हाती

Sharad Pawar Silver Oak Attack : सिल्व्हर ओक हल्ल्याचा मास्टरमाइंड हा नागपूरचा, राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा आरोप

Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 17 एप्रिलपर्यंत सातारा पोलिसांना ताबा घेण्याची परवानगी

Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा वकील आज तिसऱ्यांदा बदलला, आज कोर्टात काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha at 630AM 06 January 2025 माझा गाव, माझा जिल्हासकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 06 January 2025  एबीपी माझा लाईव्ह ABP MajhaVulture Journey : ताडोबातलं गिधाड कसं पोहोचलं तामिळनाडूत? Special ReportMarathi Abhijaat Bhasha | मराठीला अभिजात दर्जा देणारा सरकारी आदेशच नाही Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Amol Mitkari: महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
Nashik Crime : बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Ram Shinde : आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
Embed widget