एक्स्प्लोर

Dahi Handi 2002 : मुंबई-ठाण्यात दहीहंडी उत्सवासाठी आयोजक ते गोविंदा पथकांची तयारी पूर्ण; थरांचा विश्‍वविक्रम करणाऱ्या पथकांसाठी लाखोंची बक्षीसे

Dahi Handi 2002 : कोरोनानंतर (Corona) दोन वर्षांनी त्याच जोशात, उत्साहात गोविंदा अधिकाधिक थर लावण्यासाठी आणि दहीहंडी फोडण्यासाठी तयार झाला आहे

Dahi Handi 2002 : राज्यात दहीहंडी उत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. कोरोनानंतर (Corona) दोन वर्षांनी त्याच जोशात, उत्साहात गोविंदा अधिकाधिक थर लावण्यासाठी आणि दहीहंडी फोडण्यासाठी तयार झाला आहे, तर दुसरीकडे आयोजकांनी सुद्धा मोठी तयारी या उत्सवासाठी केली आहे. अधिकाधिक थर लावणाऱ्या किंवा थरांचा विश्वविक्रम करणाऱ्या गोविंदा पथकांसाठी लाखोंची बक्षीसं आयोजकांनी ठेवली आहेत. त्यामुळे आयोजकांपासून ते गोविंदापथकांपर्यंत सगळ्यांचाच उत्साह शिगेला आहे.

दहीहंडी उत्सवात थरांचा थरार, विश्वविक्रम मोडीत काढणार का?
एक, दोन, तीन, चार, पाच अशा थरांचा थरार या दहीहंडी उत्सवात पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. जास्तीत जास्त थर लावता येतील यासाठी मागील दोन महिन्यापासून मुंबईतील नावाजलेला 'जय जवान' गोविंदा पथक या भर पावसात सुद्धा दहीहंडी साठी खास तयारी करत आहे. कारण याच गोविंदा पथकानं आतापर्यंत  सर्वाधिक 9 थर लावण्याचा विश्वविक्रम केला आहे. शिस्त, सातत्य, मेहनत या बळावर दरवर्षी गोविंदा पथक विशेष छाप पाडत आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यापासून सुरू असलेल्या सरावात सुद्धा या पथकाने चार वेळेस नऊ थर लावले आहेत. त्यामुळे दहीहंडी उत्सवाच्या जेव्हा मैदानात उतरेल, तेव्हा आपलाच विश्वविक्रम मोडीत काढणार का? याची उत्सुकता प्रत्येकाला असेल

मुंबई ठाण्यात दहीहंडी उत्सवाचं विशेष आकर्षण
जय जवानच नाही तर मुंबई ठाण्यातील 200 पेक्षा अधिक गोविंदा पथक सुद्धा अशाच प्रकारे सराव करत आपला उत्साह वाढवत आहेत. कारण दोन वर्षांनंतर जेव्हा अशाप्रकारे थाटामाटात दहीहंडी उत्सव होतो, तेव्हा पूर्वीपेक्षा अधिक थर लावण्यासाठी प्रत्येक गोविंद पथक प्रयत्न करणार आहे. कारण तशा प्रकारची भरघोस बक्षीस सुद्धा आयोजकांनी ठेवल्याने त्याचे विशेष आकर्षण असणार आहे. त्यामुळे आयोजकांची आणि दुसरीकडे गोविंदा पथकाची जवळपास तयारी पूर्ण झाली असून आता दहीहंडी उत्सवाचे वेध लागले आहेत. एकीकडे आयोजकांनी केलेली तयारी तर दुसरीकडे भर पावसात अशा प्रकारचा गोविंदा पथकांचा उत्साह हे सगळे पाहून यंदाचा दहीहंडी उत्सव रंगणार यात काहीच शंका नाही

'या' दहीहंड्यांचं असेल विशेष आकर्षण

1)ठाणे - संस्कृती युवा प्रतिष्ठान 
आयोजक - आमदार प्रताप सरनाईक 
बक्षीस- 10 थरांसाठी - 21 लाख
9 थरांसाठी - 11 लाख
8 थरांसाठी - 50 हजार

2)ठाणे -मनसे दहीहंडी उत्सव - आयोजक - मनसे नेते अविनाश जाधव 
बक्षीस - 10 थरांसाठी - 21 लाख
9 थरांसाठी - 11 लाख

3)ठाणे - भाजप पुरस्कृत स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सव- आयोजक- शिवाजी पाटील
बक्षीस- 9 थरांसाठी - 11 लाख
8 थरांसाठी - 25हजार
7 थरांसाठी- 10 हजार

4)ठाणे - शिवसेना टेंभी नाका मानाची हंडी - मार्गदर्शक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 
बक्षीस- सर्वाधिक थर लावल्यास मुंबई ठाणे गोविंदा पथक आला प्रत्येकी दोन लाख 51 हजार रुपये
महिला गोविंदा पदकासाठी एक लाख रुपयांचे बक्षीस

5)ठाणे - आनंद चॅरिटेबल ट्रस्ट महा दहीहंडी उत्सव -आयोजक-खासदार राजन विचारे 
6)मुंबई - वरळी जांभोरी मैदान भाजप भव्य दहीहंडी उत्सव मार्गदर्शक - आमदार आशिष शेलार 
7)मुंबई - बोरिवलीत मागाठाणे देवीपाडा दहीहंडी उत्सव आयोजक - आमदार प्रकाश सुर्वे

 

 

 

 

 

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
Embed widget