(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wardha News : BSF जवानाच्या आत्महत्येप्रकरणी CBI चौकशीची मागणी, जवानाच्या हात-चेहऱ्यावर जखमा; कुटुंबियांची माहिती
BSF soldier suicide case : शशिकांत आत्महत्या करूच शकत नाही, अशी खात्री जवानाच्या कुटुंबातील सदस्यांना आहे.
BSF soldier suicide case : वर्धा जिल्ह्यातील खुबगाव येथील भारतीय लष्कराचे जवान शशिकांत राऊत यांनी गांधीनगर गुजरात बटालियन मध्ये बाथरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कुटुंबियांना या घटनेची माहिती मिळल्यावर 31 मे रोजी राऊत कुटुंबियांना मोठा धक्काच बसला, मृत शशिकांत यांना 25 वर्षांची पत्नी आणि अवघ्या दोन वर्षांचा मुलगा आहे. मृत जवानाचे पार्थिव शरीर कुटुंबियांच्या स्वाधीन केल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र शशिकांत आत्महत्या करूच शकत नाही अशी खात्री कुटुंबातील सदस्यांना आहे.
"शशिकांत आत्महत्या करूच शकत नाही" कुटुंबियांना खात्री
कुटुंबियांना आत्महत्येचा फोटो पाठवण्यात आला, ज्यात बाथरूम मधील हँगरला गळफास लावलेला दिसतोय. मात्र त्यावर दाट संशय आल्याने त्याच्या चेहऱ्यावर आणि हातावर जखमा असल्याचेही कुटुंबीय सांगतात. त्यामुळे ही आत्महत्या असून घातपात आहे असा आरोप करत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. शशिकांतच्या भावंडांनी संबंधित बीएसएफच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून झालेल्या प्रकाराची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, या अधिकाऱ्यांच्या सांगण्यामध्ये बरीच विसंगती व तफावत होते असा आरोप शहीद जवानाच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच प्राथमिकदृष्ट्या बघता इतर अनेक बाबी अशा आहेत की, शशिकांत याची आत्महत्या नसून त्यासोबत काहीतरी घातपात झाला आहे. या बाबीकडे दिशानिर्देश करतात.
जवानाच्या कुटुंबियांनी भारत सरकारला लेखी स्वरूपात तक्रार
या घटनेच्या सखोल तपास होऊन त्यामध्ये घातपाताच्या सर्व शक्यतांची पडताळणी करून सर्व सत्य परिस्थिती त्यांच्या कुटुंबियांना कळविण्यात यावी व जर या प्रकरणात कोणी दोषी असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, असा आक्षेप देखील लेखी स्वरुपात बीएसएफच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे पाठविण्यात आलेला आहे. परंतु भारत सरकारच्या स्वतंत्र सक्षम तपास यंत्रणेमार्फत (CBI) या प्रकरणाचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. अशी तक्रार जवानाच्या कुटुंबियांनी भारत सरकारला लेखी स्वरूपात केलेली आहे.