एक्स्प्लोर

'सरन्यायाधीशांच्या सत्काराचं भाग्य मला, एकनाथ शिंदेनाही मिळालं, पण दुसऱ्या शिंदेंना मिळाले नसेल', राज्यपालांचा टोला कोणाला?

Bhagat Singh Koshyari : भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पदी यू.यू.लळीत विराजमान झाल्यानंतर त्यांच्या नियुक्तीने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Bhagat Singh Koshyari : Uday Umesh Lalit उदय लळीत यांचे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) सरन्यायाधीशपदी विराजमान होणे, महाराष्ट्रासाठी एक अनोखा योगायोग मानला जात आहे. पण उदय लळीतही यांचा कार्यकाळ अवघ्या 74 दिवसांचा आहे. सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्यानंतर उदय लळीत 8 नोव्हेंबर 2022 रोजी निवृत्त होणार आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे 49 व्या सरन्यायाधीश पदी (CJI Supreme Court) विराजमान झाल्यानंतर त्यांच्या नियुक्तीने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारताचे सरन्यायाधीश उदय लळीत यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari)  यांच्या हस्ते सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मोठं वक्तव्य केलंय. काय म्हणाले?

निवृत्त झाल्यानंतर लवकर तुम्ही राजभवनात याल - राज्यपालांचं मोठ वक्तव्य

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश यांचा सत्कार करण्याचं भाग्य मला मिळालं, एकनाथ शिंदे यांना पण ते मिळालं, दुसऱ्या शिंदे यांना मिळाले नसेल असं सांगत त्यांनी समोर बसलेल्या सुशीलकुमार शिंदे यांनी उद्देशून म्हटले आहे. कॉलेज मधे मी शिकत होतो, संघात काम करत होतो, आणि मित्र मला म्हणायचे काय राष्ट्र राष्ट्र करतो, इथे राष्ट्र कुठे आहे, इथे महाराष्ट्र सौराष्ट्र आहे त्यावर गोळवलकर गुरुजींनी दिलेलं उत्तर मी सांगितलं इथे माणसात ही राष्ट्र आहे ते म्हणजे धृतराष्ट्र. मी गेल्या तीन वर्षात राज्यातील अनेक लोक मोठ्या पदावर बघितले आहेत, दोन सर न्यायाधीश बघितले आता तिसरेही बघेल. लळीत मराठीत बोलत होते, तेव्हा तुळजा भवानीचं दर्शन झालं मी मराठी शिकलो, मला बोलता येत नाही पण कोण काय बोलतं हे समजते. आता तुम्ही निवृत्त होत आहात लवकर तुम्ही राजभवनात यावे हे होऊ शकते, असं मोठ वक्तव्य यावेळी राज्यपालांनी केलंय

माझ्या घरात मराठमोळं वातावरण आहे - उदय लळीत
उदय लळीत यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय, ते म्हणाले, महाराष्ट्र राज्याचा सुपुत्र त्यामुळे माझं शिक्षण राज्यात झालं, या राज्याने मला खूप काही दिलं, मी या राज्याचा आहे, याचा अभिमान आहे. यावेळी लळित यांनी आपल्या आठवणी ताज्या करत म्हटलंय की, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा पाहता यावा, त्याची ओळख व्हावी म्हणून मी मोटारसायकलवर माझ्या मित्रासोबत राज्य फिरून झालं आहे. आज माझ्या मुलांना नीट मराठी बोलता येत नाही, ते दिल्लीत मोठे झाले, पण घरात मराठमोळं वातावरण आहे. माझी आजी सोलापुरात पहिली डॉक्टर, पण त्यांनतर आमच्या घरी कुणी पांढरा कोट घातला नाही कायम काळा कोट घातला आहे. आता चार दिवसात माझी निवृत्ती आहे, पण मी इथे परत परत येत राहील तसेच ते म्हणाले, सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना राज्याची अनेक कामे माझ्याकडे होती. 

अनेक कायदेपंडित ही राज्याची ओळख -मुख्यमंत्री
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लळीत यांचे कौतुक करत म्हटले,  महाराष्ट्र राज्याचे सुपुत्र देशाच्या सरन्यायाधीश पदी विराजमान झाले याचा आनंद आहे. अनेक सामाजिक सुधारणा राज्यात झाल्या असून अनेक कायदेपंडित ही राज्याची ओळख आहे. लळीत कुटुंबीयांनी हा मान कायम ठेवला आहे, देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाक, पद्मनाभ मंदिर यात निकाल दिले आहेत, लळीत यांनी कमी वेळात प्रकरण निकाली काढली. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यांनी कायम पारदर्शक पद्धतीचा स्वीकार केला. कोर्टाचं काम सध्या आपण लाईव्ह पाहू शकतो ही सर्वात मोठी गोष्ट आहे. विनम्रता, शालीनता हा त्यांचा स्वभाव आहे. त्याचं सर्वांनी अनुकरण करावे. आम्ही कोर्टाच्या सूचनांचं पालन करतो, लळीत लोकशाहीच्या इतिहासात सुवर्ण पान लिहितील अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत. 


कदाचित त्यामुळं लळीत आज फीट आहेत - देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचे सुपुत्र झाल्यानंतर त्यांचा सत्कार राज्यपालांच्या हस्ते होतो, म्हणजे राज्याच्या प्रत्येक नागरिकाच्या वतीने होतो. अलीकडे सरन्यायाधीश यांची ओळख सांगितली, तर लोक टीका करतात. 2000 साली नागपूरमधील एका प्रकरणात ते आमचे वकील होते, आम्ही जेव्हा दिल्लीमध्ये जायचो, तेव्हा ते लिफ्ट वापरत नव्हते, कदाचित त्यामुळं ते फीट आहे. त्यांची नम्रता कायम बघायला मिळाली आहे  ते पुढच्या काळात निवृत्त होणार आहेत. पण ते कायम मार्गदर्शन राहतील. न्यायदान वेगाने व्हावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्याकडे सुदैवाने सर्व पदे भरण्यात आले आहेत. तसेच बॉम्बे हायकोर्टाचे नवीन संकुल बांद्रा येथे व्हावं अशी त्यांची इच्छा होती, आता लवकरच ते होणार आहे, त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया झाली आहे. त्यामुळं लवकर हे संकुल उभे राहील अशी आशा व्यक्त करते असे फडणवीस यावेळी म्हणाले. 

 8 नोव्हेंबरला निवृत्त होणार उदय लळीत 

उदय लळीत यांचे सरन्यायाधीशपदी विराजमान होणे, महाराष्ट्रासाठी एक अनोखा योगायोग मानला जात आहे. पण उदय लळीतही फार दिवस सरन्यायाधीश राहू शकणार नाहीत. त्यांचा कार्यकाळ अवघ्या 74 दिवसांचा असेल. सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्यानंतर उदय लळीत 8 नोव्हेंबर 2022 रोजी निवृत्त होतील.

इतर महत्वाच्या बातम्या

मोठी बातमी! काँग्रेसचे 22 आमदार फुटणार, फडणवीस यांच्याकडून तयारी; ठाकरे गटाकडून मोठा गौप्यस्फोट

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP MajhaTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
Embed widget