एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News LIVE Updates: महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाचा संसर्ग

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Key Events
maharashtra marathi news breaking news live updates december 31 2021 today marathi headlines maharashtra political news mumbai news national politics news Maharashtra Breaking News LIVE Updates: महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाचा संसर्ग
Live Updates

Background

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Maharashtra Corona New Guideline : नव्या नियमांसह नवीन वर्षात प्रवेश, 'ही' नियमावली पाळावीच लागणार

Maharashtra Covid Restrictions : सरत्या वर्षाला निरोप देण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे कोरोनाने नागरिकांची चिंता वाढवली आहे. आज 2021 वर्षाचा शेवटचा दिवस. उद्या नवीन वर्षाचा आरंभ होतोय. 2022 मध्ये प्रवेश करत असताना कोरोना आणि ओमायक्रॉनचं संकट वाढत चाललं आहे. त्यामुळं नवीन वर्षात प्रवेश करताना आपल्याला नव्या निर्बंधांसह करावा लागणार आहे.  राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच चिंतेत वाढ झाली आहे. आरोग्य विभाग, टास्क फोर्स यांच्यातील झालेल्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. 

सरकारकडून कालपासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळे फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत करता येणार आहेत. तर अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.  पर्यटनस्थळावर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे. 

मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची वाढ होऊ लागली आहे. ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. त्यामुळे गुरुवारी टास्कफोर्ससोबत झालेल्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

काय आहेत निर्बंध?

सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळे फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत
अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांची उपस्थिती
पर्यटनस्थळावर जमावबंदी
कोरोनाबाबत आधीचे निर्बंधही कायम राहतील.

नारायण राणे महाविकास आघाडीला धक्का देणार? सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीची आज मतमोजणी

Sindhudurg District Bank Election : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची आज मतमोजणी होणार. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप महाविकास आघाडीला धक्का देणार की महाविकास आघाडीचे पॅनेल पुन्हा सत्ता ताब्यात ठेवणार याकडे लक्ष लागले आहे. आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली होती. त्यातच या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले. त्यानंतर नितेश राणे अज्ञातवासात आहेत.

गुरुवारी झालेल्या निवडणुकीत एकूण 981 पैकी तब्बल 968 मतदारांनी म्हणजे 98.67 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 115 महिला व 853 पुरुषांचा समावेश होता.  कणकवली वगळता कुठेही गालबोट लागलं नाही. शांततेत मतदान प्रकिया पार पडली.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह एकूण 14 विद्यमान संचालक निवडणूक रिंगणात उभे आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी, काँग्रेस या महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनेल विरुद्ध भाजपचे सिद्धिविनायक सहकार पॅनेल यांच्यात चुरशीची लढत होत आहे. मतदारांचा कौल कुणाला? याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

22:50 PM (IST)  •  31 Dec 2021

कल्याणमध्ये मद्यधुंद तरुणाने नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांसमोर घातला गोंधळ

31 डिसेंबरच्या पाश्वभूमीवर आज सायंकाळपासूनच कल्याण शहरात वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी लावली आहे. कल्याणच्या महात्मा फुले चौकात नाकांबदीसाठी कार्यरत असलेल्या पोलिसांनी एका तरुणाला अडविले. तो मद्यधुंद अवस्थेत होते. त्याने ब्रेथ अॅनालायझर टेस्ट करण्यास नकार दिला. तसेच पोलिसांना उलट प्रश्न विचारुन गोंधळ घातला.आपण काय करतोय ,कुणाशी बोलतोय याच भान या महाभागाला राहील नव्हतं .पोलिसांचीच परेड घेत15 ते 20 मिनिटे त्याचा गोंधळ सुरूच होता .अखेर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने टेस्ट केली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. 31 डिसेंबरला नववर्षचा स्वागताचा आनंद शिगेला पोहचण्यापूर्वीच ही रात्री नऊ वाजता घडली.त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच मात्र चांगलंच मनोरंजन झालं .दरम्यान रात्री नाकाबंदी सुरुच राहणार असून तळीरामांची विरोधात कारवाई केली जाणार असल्याचं वाहतूक पोलिसांनी सांगितलं .

18:39 PM (IST)  •  31 Dec 2021

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाचा संसर्ग

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांना कोरोनाचा संसर्ग झालाय. स्वत: यशोमती ठाकूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिलीय. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी, असं आवाहन यशोमती ठाकूर यांनी केलंय. 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : फुलांची उधळण अन् शाही सोहळा; जय पवार- ऋतुजा पाटील यांच्या लग्नाचे न पाहिलेले फोटो समोर, नवविवाहीतांनी पोस्ट केली शेअर
फुलांची उधळण अन् शाही सोहळा; जय पवार- ऋतुजा पाटील यांच्या लग्नाचे न पाहिलेले फोटो समोर, नवविवाहीतांनी पोस्ट केली शेअर
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला? मोठा भाऊ कोण अन् कोणाच्या वाट्याला किती जागा??
कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला? मोठा भाऊ कोण अन् कोणाच्या वाट्याला किती जागा??
Devednra Fadnavis Ashiqi Song : मंगलप्रभात लोढांच्या हुर्डा पार्टीत देवेंद्र फडणवीसांकडून कुमार सानूच्या 'या' गाण्याची फर्माइश, राहुल नार्वेकरांनी गाजवली पार्टी
मंगलप्रभात लोढांच्या हुर्डा पार्टीत देवेंद्र फडणवीसांकडून कुमार सानूच्या 'या' गाण्याची फर्माइश, राहुल नार्वेकरांनी गाजवली पार्टी
Pune Leopard: वनखात्याने बिबट्याला पकडायला सापळा लावला, पण चलाख बिबट्याने बाहेरुनच कोंबडीचं मुंडकं पकडलं
वनखात्याने बिबट्याला पकडायला सापळा लावला, पण चलाख बिबट्याने बाहेरुनच कोंबडीचं मुंडकं पकडलं

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : फुलांची उधळण अन् शाही सोहळा; जय पवार- ऋतुजा पाटील यांच्या लग्नाचे न पाहिलेले फोटो समोर, नवविवाहीतांनी पोस्ट केली शेअर
फुलांची उधळण अन् शाही सोहळा; जय पवार- ऋतुजा पाटील यांच्या लग्नाचे न पाहिलेले फोटो समोर, नवविवाहीतांनी पोस्ट केली शेअर
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला? मोठा भाऊ कोण अन् कोणाच्या वाट्याला किती जागा??
कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला? मोठा भाऊ कोण अन् कोणाच्या वाट्याला किती जागा??
Devednra Fadnavis Ashiqi Song : मंगलप्रभात लोढांच्या हुर्डा पार्टीत देवेंद्र फडणवीसांकडून कुमार सानूच्या 'या' गाण्याची फर्माइश, राहुल नार्वेकरांनी गाजवली पार्टी
मंगलप्रभात लोढांच्या हुर्डा पार्टीत देवेंद्र फडणवीसांकडून कुमार सानूच्या 'या' गाण्याची फर्माइश, राहुल नार्वेकरांनी गाजवली पार्टी
Pune Leopard: वनखात्याने बिबट्याला पकडायला सापळा लावला, पण चलाख बिबट्याने बाहेरुनच कोंबडीचं मुंडकं पकडलं
वनखात्याने बिबट्याला पकडायला सापळा लावला, पण चलाख बिबट्याने बाहेरुनच कोंबडीचं मुंडकं पकडलं
Nagpur Leoprad : नागपुरात बिबट्याचा धुमाकूळ; परडीत वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु, अनेकांवर हल्ला केल्याची माहिती
नागपुरात बिबट्याचा धुमाकूळ; परडीत वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु, अनेकांवर हल्ला केल्याची माहिती
Nagpur Leopard: डार्ट लागून गुंगीचं औषध शरीरात भिनलं, तरीही बिबट्याची 15 फूट उंच उडी, अखेर गच्चीतून खाली पडला, नागपूरमध्ये बिबट्याला पकडण्याचा थरार
डार्ट लागून गुंगीचं औषध शरीरात भिनलं, तरीही बिबट्याची 15 फूट उंच उडी, अखेर गच्चीतून खाली पडला, नागपूरमध्ये बिबट्याला पकडण्याचा थरार
Devendra Fadnavis & Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस सभागृहातील बिग डी, आरडओरडा न करता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतात: एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस सभागृहातील बिग डी, आरडओरडा न करता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतात: एकनाथ शिंदे
Bhandara Crime: शासकीय ग्रामीण रुग्णालय पेटवून देण्याची धमकी, 10 लाखांची खंडणी; बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षाविरोधात भंडाऱ्यात गुन्हा दाखल
शासकीय ग्रामीण रुग्णालय पेटवून देण्याची धमकी, 10 लाखांची खंडणी; बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षाविरोधात भंडाऱ्यात गुन्हा दाखल
Embed widget