एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News 6 August 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News 6 August 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Background

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत... 

आज उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान

देशाच्या नवीन उपराष्ट्रपतीपदासाठी आज मतदान होणार असून एनडीएकडून जगदीप धनकड आणि विरोधकांच्या कडून मार्गारेट अल्वा या उमेदवार आहेत. सध्याचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा कार्यकाल 10 ऑगस्टला संपणार आहे. 11 ऑगस्टला नवे उपराष्ट्रपती शपथ घेतील.

या निवडणुकीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्य मतदान करतील. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत मतदानप्रक्रिया पार पडेल. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होऊन निकाल लागेल असा अंदाज आहे.

सध्याची दोन्ही सभागृहातील भाजप खासदारांची संख्या

लोकसभा भाजप खासदार- 303 (खासदार संजय धोत्रे तब्येत बरी नसल्यानं मतदान करु शकणार नाहीत)  
लोकसभेतील एनडीएचे इतर सदस्य- 33

एनडीएचे लोकसभेतील एकूण खासदार- 336

राज्यसभेतील भाजप खासदार- 91
राज्यसभेतील एनडीएचे इतर सदस्य- 18
एनडीएचे राज्यसभेतील एकूण खासदार- 109

एनडीएचे एकूण खासदार - 445

भाजपला विजयासाठी 390 पेक्षा अधिक मतांची गरज आहे. शिवसेनेचे खासदार (उद्धव ठाकरे गट) या निवडणुकीत यूपीएच्या बाजूनं मतदान करणार आहे.

आज मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचा पुन्हा दिल्ली दौरा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजपासून दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. आज आझादी का अमृत महोत्सव बैठकीला ते उपस्थिती लावतील तर रविवारी निती आयोगाच्या बैठकीमध्ये ते सहभागी होतील. या दोन दिवसांच्या दौऱ्यात दिल्लीतील नेत्यांशी गाठीभेटी घेऊन मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे. 

संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडी चौकशी

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीनं वर्षा राऊत यांना समन्स पाठवलंय. सकाळी 11 वाजता त्यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. ईडीला वर्षा राऊत यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेच्या संदर्भात चौकशी करायची आहे. 

राज्यात पाच दिवस मान्सून सक्रिय होणार, पश्चिम महाराष्ट्र, कोकणाला ऑरेंज अलर्ट

येत्या 24 तासांत दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, मेघगर्जनेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

नितेश राणे यांची पत्रकार परिषद

भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची आणि नितेश राणेंची पत्रकार परिषद होणार आहे. आज दुपारी 1 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात ही परिषद होणार आहे. नितेश राणे दीपक केसरकरांच्या आरोपांवर उत्तर देण्याची शक्यता आहे. तसेच, नितेश राणे उमेश कोल्हे प्रकरणाबाबत मोठा गौप्यस्फोट करणार आहेत अशी माहिती आहे.

22:57 PM (IST)  •  06 Aug 2022

 आश्रम शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी माजी आमदार आणि भाजप नेते विजयराज शिंदेंवर गुन्हा दाखल

आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी माजी आमदार आणि भाजप नेते विजयराज शिंदे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 16 जुलै रोजी बुलढाण्यातील आदिवासी आश्रम शाळेत लोखंडी गेट अंगावर पडून आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी तब्बल दोन आठवाड्यांनी पोलिसांनी संस्था चालक विजयराज शिंदे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केलाय. अनुदानित आदिवासी शाळेतील मुलांच्या सुरक्षेबद्दल हयगय केल्याच्या ठपका ठेवत हा गुन्हा दाखल केला आहे.  

22:37 PM (IST)  •  06 Aug 2022

केदार दिघे यांना मुंबई  सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर 

केदार दिघे यांना मुंबई  सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर 

केदार दिघेंविरोधात बलात्काराच्या प्रकरणाशी संबंधित गुन्हा दाखल  

तपासात सहकार्य करण्याची जामीनात प्रमुख अट 

एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दिघेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

एका बलात्कार पीडितेला धमकावल्या प्रकरणी केदार दिघेंवर दाखल आहे गुन्हा

19:01 PM (IST)  •  06 Aug 2022

उद्धव ठाकरे गटाच्या सहा खासदारांचे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान नाही 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या सहा खासदारांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान केले नाही. 

17:32 PM (IST)  •  06 Aug 2022

Nashik Fire : नाशिक येथील द्वारका परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग, बंब घटनास्थळी दाखल 

Nashik Fire : नाशिक शहरातील द्वारका परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर आगीची घटना समजल्यानंतर बघ्यांची गर्दी झाली आहे. 

14:39 PM (IST)  •  06 Aug 2022

वर्षा राऊत यांची मागील तीन तासांपासून ईडी चौकशी सुरू

खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची मागील तीन तासांपासून ईडी चौकशी सुरू आहे. वर्षा राऊत यांची पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आणि अलिबाग येथे मालमत्तेसंदर्भात चौकशी सुरू आहे. अलिबाग येथे जागा खरेदी करताना रोखीने व्यवहार झाले असल्याचा ईडीने आरोप केला आहे. वर्षा राऊत यांच्या अकाउंट मध्ये एक करोडपेक्षा जास्त पैसे आले आहेत. त्यासंदर्भात ही चौकशी केली जात आहे. सध्या संजय राऊत ईडीच्या कोठडीत आहेत. 

13:31 PM (IST)  •  06 Aug 2022

घाटकोपरमध्ये इमारतीच्या खालील भाग कोसळला

11:07 AM (IST)  •  06 Aug 2022

हृदयद्रावक! साताऱ्यात 10 महिन्याच्या चिमुकल्याला विहिरीत फेकलं, बाळाचा मृत्यू

Satara Crime News : साताऱ्यात मन सुन्न करणारी हृदयद्रावक घटना घडली आहे. साताऱ्यातील कोडोली येथील दोन भावांच्या वादात दहा महिन्यांच्या चिमुकल्यानं जीव गमावला आहे. भावासोबत झालेल्या कौटुंबिक वादातून काकानं आपल्या पुतण्याला विहिरीत फेकून दिलं. या धक्कादायक घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, घटनेती माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. आरोपी असलेला बाळाचा काका अद्याप फरार आहे. 

10:59 AM (IST)  •  06 Aug 2022

महाविकास आघाडी सरकारच्या काळात म्हाडा, आरोग्य आणि टीईटी घोटाळ्याचा तपास ईडीकडे जाण्याची शक्यता

Pune News : महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वाधिक गाजलेल्या म्हाडा, आरोग्य आणि टीईटी घोटाळ्याचा तपास आता ईडीकडे जाण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांनी म्हाडा, आरोग्य आणि टीईटी परीक्षेच्या संदर्भात झालेला घोटाळा उघडकीस आणला होता. या प्रकरणी काही बड्या अधिकाऱ्यांना देखील पुणे पोलिसांनी अटक केली होती. ईडीने या संपूर्ण प्रकरणाची कागदपत्रे तपासासाठी पुणे पोलिसांकडून मागून घेतली आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी ही सर्व कागदपत्रे ईडीच्या ताब्यात सोपवली आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता ईडी करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

10:55 AM (IST)  •  06 Aug 2022

साताऱ्यातील कोडोली इथे हृदय पिळवटून टाकणारी घटना, कौटुंबिक वादातून भावाच्या दहा महिन्यांच्या बाळाला विहिरीत फेकलं

Satara News : साताऱ्यातील कोडोली येथील हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. कौटुंबिक वादातून एकाने भावाच्या दहा महिन्यांच्या बाळाला विहिरीत फेकलं. या घटनेत बाळाचा मृत्यू झाला असून आरोपी काका पसार झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. शालमोल सोनवणे असं त्या 10 महिन्याच्या बाळाचं नाव आहे.

10:38 AM (IST)  •  06 Aug 2022

LIVE : खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात पोहोचल्या

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar on Satara Loksabha : श्रीनिवास पाटलांची सातारच्या रिंगणातून माघार, शरद पवारांनी चारे नावे सांगितली! कोणाला संधी मिळणार?
श्रीनिवास पाटलांची सातारच्या रिंगणातून माघार, शरद पवारांनी चारे नावे सांगितली!
Latur Lok Sabha: ठाकरेंच्या माजी आमदाराची जीभ घसरली; पंतप्रधान मोदी, अशोक चव्हाण, अजित पवारांवर बोचरी टीका
ठाकरेंच्या माजी आमदाराची जीभ घसरली; पंतप्रधान मोदी, अशोक चव्हाण, अजित पवारांवर बोचरी टीका
Kartiki Gaikwad Pregnancy News :'लिटिल चॅम्प'च्या घरी पाळणा हलणार; इवलुशा पावलांनी नवा पाहुणा घरी येणार, सोशल मीडियावर Video VIRAL
'लिटिल चॅम्प'च्या घरी पाळणा हलणार; इवलुशा पावलांनी नवा पाहुणा घरी येणार, सोशल मीडियावर Video VIRAL
Uddhav Thackeray on Kalyan Loksabha : कल्याणमध्ये उद्धव ठाकरे कोणता डाव टाकणार? मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलावलं!
कल्याणमध्ये उद्धव ठाकरे कोणता डाव टाकणार? मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलावलं!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 29 March 2024 : ABP MajhaSwatantra Veer Savarkar Movie :  स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाच्या स्क्रिनिंगवरुन  मनसे आक्रमकABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 02 PM :  29 March 2024 : Maharashtra NewsChandrakant Khaire : Ambadas Danve आणि मी हातात हात घालून प्रचार करणार : चंद्रकांत खैरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar on Satara Loksabha : श्रीनिवास पाटलांची सातारच्या रिंगणातून माघार, शरद पवारांनी चारे नावे सांगितली! कोणाला संधी मिळणार?
श्रीनिवास पाटलांची सातारच्या रिंगणातून माघार, शरद पवारांनी चारे नावे सांगितली!
Latur Lok Sabha: ठाकरेंच्या माजी आमदाराची जीभ घसरली; पंतप्रधान मोदी, अशोक चव्हाण, अजित पवारांवर बोचरी टीका
ठाकरेंच्या माजी आमदाराची जीभ घसरली; पंतप्रधान मोदी, अशोक चव्हाण, अजित पवारांवर बोचरी टीका
Kartiki Gaikwad Pregnancy News :'लिटिल चॅम्प'च्या घरी पाळणा हलणार; इवलुशा पावलांनी नवा पाहुणा घरी येणार, सोशल मीडियावर Video VIRAL
'लिटिल चॅम्प'च्या घरी पाळणा हलणार; इवलुशा पावलांनी नवा पाहुणा घरी येणार, सोशल मीडियावर Video VIRAL
Uddhav Thackeray on Kalyan Loksabha : कल्याणमध्ये उद्धव ठाकरे कोणता डाव टाकणार? मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलावलं!
कल्याणमध्ये उद्धव ठाकरे कोणता डाव टाकणार? मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलावलं!
Jyoti Mete : ज्योती मेटे शरद पवार गटातील प्रवेशावर काय म्हणाल्या, उमेदवारीवर काय निर्णय झाला?
ज्योती मेटे शरद पवार गटातील प्रवेशावर काय म्हणाल्या; बीडमधून उमेदवारीवर कोणता निर्णय झाला?
Vasant More meet Prakash Ambedkar :   वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
Vasant More meet Prakash Ambedkar : वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
RCB vs KKR : आरसीबीला सूचक इशारा देत रिंकू सिंगनं वातावरण तापवलं, फोटो पोस्ट करत दिलं चॅलेंज
कोहली आणि फाफ डु प्लेसिसच्या आरसीबीला रिंकूचा इशारा, मॅचपूर्वी न बोलताच सगळं सांगितलं
Mirzapur 3 Release Date : कालीन भैय्या-गुड्डू पंडित भिडणार! 'मिर्जापुर 3'च्या रिलीज डेटवर निर्मात्यांनी दिली अपडेट
कालीन भैय्या-गुड्डू पंडित भिडणार! 'मिर्जापुर 3'च्या रिलीज डेटवर निर्मात्यांनी दिली अपडेट
Embed widget