(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking News LIVE Updates : किरीट सोमय्या सोमवारी पत्रकार परिषद घेणार
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट. सोबत अभिनेते प्रकाश राजही उपस्थित.
Telangana CM K Chandrashekar Rao meets Maharashtra CM Uddhav Thackeray and his cabinet ministers and leaders at Varsha bungalow - Maharashtra CM's official residence in Mumbai.
Actor Prakash Raj was also present. pic.twitter.com/nYHrkpofJ9
— ANI (@ANI) February 20, 2022
/>
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
महत्वाच्या हे़डलाईन्स
मोदी सरकारविरोधात मोट बांधण्यासाठी चंद्रशेखर राव यांचा पुढाकार, तेलंगणाचे मुख्यमंत्री आज मुंबई दौऱ्यावर, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेणार
मुंबई आणि दिल्लीसह प्रमुख शहरात घातपात घडवण्याचा दाऊद इब्राहिमचा कट, एनआयएकडून एफआयर दाखल, यंत्रणांना सतर्कतेचा इशारा
दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राचा वीरपूत्र धारातीर्थी, सांगलीतल्या वाळवा तालुक्यातील शिगावच्या रोमीत चव्हाणांना वीरमरण
बारमधील ऑर्केस्ट्रा कलाकारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, राज्यात ऑर्केस्ट्रा बारमध्ये चारऐवजी 8 महिला कलाकारांना सामील करता येणार
राजकीय कॅप्टन निवडण्यासाठी पंजाबची जनता आज ईव्हीएमचं बटण दाबणार, विधानसभेच्या सर्व 117 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान, तर उत्तर प्रदेशात तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून समीर वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल, दारुविक्रीचा परवाना मिळवण्यासाठी खोटी माहिती दिल्याचा आरोप
दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राचा वीरपूत्र धारातीर्थी, सांगलीतल्या वाळवा तालुक्यातील शिगावच्या रोमीत चव्हाणांना वीरमरण
कॅनडात स्वस्तिकवर बंदी घालण्याच्या हालचाली, कॅनेडियन संसदेत विधेयक सादर, कॅनडा सरकारविरोधात भारतीयांचं आंदोलन
युक्रेन रशिया सीमेवर तणाव वाढला, सैन्याची मोठ्या प्रमाणावर जमवाजमव, अत्याधुनिक क्षेपणास्त्रांच्या चाचणीमुळे जगावर युद्धाचे ढग
श्रीलंका दौऱ्यासाठी अजिंक्य रहाणे ,चेतेश्वर पुजाराला कसोटी संघातून वगळलं, रोहित शर्माकडेच कसोटी कर्णधारपदाचीही कमान, तर टी-२०त बुमराह आणि जाडेजाचं पुनरागमन
Raj Thackeray : 'मराठी भाषा गौरव दिवस इतक्या जोरदारपणे साजरे करा की...' राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र
Raj Thackeray Letter to MNS Party Workers : येत्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जाणार आहे. हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना केलं आहे. राज ठाकरे यांनी पत्र लिहित म्हटलं आहे की, 27 फेब्रुवारी हा मराठीतील थोर कवी कुसुमाग्रज ह्यांचा जन्मदिवस. हा दिवस आपण महाराष्ट्रात 'मराठी भाषा गौरव दिवस' म्हणून साजरा करतो. 'गौरव दिवस'. पूर्वीही दिनदर्शिकेत किंवा कॅलेंडरमध्ये हा दिवस होता परंतु तो दिवस धूमधडाक्यात साजरा करण्याची पध्दत आपण, आपल्या पक्षानं सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरू केली.
हा आपल्या भाषेचा “गौरव” दिवस आहे, तो त्याच जोशात, त्याच दिमाखात आपल्या शहरात, गावात, प्रत्येक भागात, प्रत्येक प्रभागात, प्रत्येक विभागात जोरात साजरा व्हायला हवा, असं राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, आपली भाषा आहे म्हणून आपण आहोत. आपली भाषा आपल्या सर्वांना ओळख देते. त्यामुळेच आपल्या एका महान, गौरवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेचा गौरव त्याच जोरदारपणे साजरा झाला पाहिजे. लक्षात ठेवा की मराठी भाषकांनी ह्या देशाच्या फार मोठ्या भागावर आपलं राज्य एकेकाळी प्रस्थापित केलं होतं. ह्या भाषेचा वचक संपूर्ण देशात होता, असं त्यांनी म्हटलं आहे.
किरीट सोमय्या सोमवारी घेणार पत्रकार परिषद
भाजप नेते किरीट सोमय्या उद्या (सोमवार, 21 फेब्रुवारी) मुंबईच्या नरिमन पॉइंट येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलीय.
कल्याण मध्ये दोन तरुणांचा हातात तलवारी नाचविल्याचा व्हिडिओ व्हायरल
शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .कल्याण-डोंबिवली शहरात देखील शिवजयंतीनिमित्त विविध ठिकाणी बाईक रॅली ,मशाल रॅली आयोजन करण्यात आलं होतं. .कल्याण जवळ असलेल्या मोहना परिसरात देखील सायंकाळच्या सुमारास शिवजयंतीनिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं .सर्व काही शांततेत सुरू असताना या रॅली दरम्यान दोन तरुणांनी हातात तलवारी घेऊन नाचवल्या .
. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.या व्हिडियोच्या आधारे खडकपाडा पोलीसानी तपास सुरू करत या दोन तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय . जयदीप पाटील हर्षद भंडारी असे या दोन तरुणांच नाव आहे
संजय राऊतांची अतुल लोंढेंच्या कौटुंबिक कार्यक्रमात उपस्थिती
शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या नागपूरातील नंदनवन परिसरातील घरी एका कौटुंबिक कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली.
काँग्रेसला वगळून मोदींविरोधातली लढाई यशस्वी होणार नाही - यशोमती ठाकूर
विकास... विकास आणि विकासावरच आमची चर्चा - शरद पवार
विकास... विकास आणि विकासावरच आमची चर्चा झाली असल्याचे माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी सांगितलं.