(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking News LIVE Updates : कॉंग्रेस आमदारांची मुख्यमंत्र्याकडे नाराजी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Maharashtra Samruddhi Mahamarg : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचं काम (Samruddhi Mahamarg) अंतिम टप्प्यात असल्याचं बोललं जातं आहे. सरकारकडून वारंवार हा महामार्ग सुरू करण्यासंबंधी तारखाही घोषित करण्यात आल्या आहेत. यापूर्वी ऑक्टोबर 2021, 31 डिसेंबर 2021 आणि आता 31 मार्च 2022 ही तारीख देण्यात आली आहे. पण अजूनही समृद्धी महामार्गाचं काम अपूर्ण असल्यानं पहिल्या टप्यातील नागपूर शिर्डी महामार्ग सुरू होऊ शकणार नसल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. त्यामुळे आता सरकार काय अजून डेडलाईन देणार का? वारंवार तारखा देऊनही का सुरू होऊ शकत नाही समृद्धी महामार्ग?
नागपूर (Nagpur)-मुंबई (Mumbai) दरम्यान पृष्ठभागाची रहदारी सुलभ व्हावी या उद्देशानं 31 जुलै 2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 701 किलोमीटरच्या 'समृद्धी महामार्गाची' घोषणा विधानसभेत केली. प्रत्यक्षात राज्याच्या 10 जिल्ह्यातून जरी हा महामार्ग जात असला तरी एकूण 24 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. या महामार्गाच्या बांधकामाच्या सुरुवातीला अनेक अडचणी आल्यात आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्यावेळी हा महामार्ग पूर्ण सुरू होण्याची प्रस्तावित तारीख ही ऑक्टोबर 2021 अशी ठरविण्यात आली होती. पण मध्यंतरी जमीन अधिग्रहण, कोरोनामुळे लॉकडाऊन अशा अनेक अडचणींना सामोरं जात सरकारनं हा महामार्ग जवळपास पूर्णत्वाला नेला आहे. मात्र समृद्धी महामार्ग सुरू करण्यासंबंधी सरकारनं अनेकदा तारीख घोषित केली, गेल्या वर्षी 31 डिसेंबर ही तारीख देण्यात आली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी कामं अपूर्ण असल्यानं 31 मार्च 2022 पर्यंत नागपूर शिर्डी हा पहिला टप्पा सुरू करणार असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. पण अजूनही समृद्धी महामार्गाचं काम हे नागपूर जिल्ह्यातील पेकेज 1 चं काम उशिरा सुरू झाल्यानं तर, बुलढाणा जिल्ह्यातील पेकेज 7 मध्ये खडकपूर्णा नदीवरील पुलाचं काम अपूर्ण असल्यानं आणि औरंगाबाद जिल्ह्यातील पेकेज 9 मधील काही ठिकाणी घाट सेक्शनचं काम अपूर्ण असल्यानं अजूनही 31 मार्चपर्यंत हा महामार्ग सुरू होण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे वारंवार सरकारकडून तारखा जाहीर झाल्यावरही समृद्धी महमार्ग का सुरू होऊ शकत नाही? असा प्रश्न आता उपस्थित राहत आहे. याबाबत मात्र अधिकारी सरकार स्तरावरून यासंबंधी तारीख जाहीर होईल, असं सांगत असले तरी मात्र महामार्गाचं अजूनही राहिलेलं काम बघता नागपूर-शिर्डी या टप्प्याला पुढील तीन महिने सुरू करण्यास लागतील असं चित्र आहे.
सरकारने जाहीर केल्याप्रमाणे 31 मार्च 2022 पर्यंत नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्यातील मार्ग सुरू न होऊ शकण्याची काय कारणं?
- महामार्गाच्या सुरुवातीलाच नागपूर शहराजवळील पेकेज 1 चं काम सुरुवातीलाच उशिरा सुरू झालंय
- कोरोना आणि लॉकडाऊनमुळे काम बंद पडलं होत
- बुलढाणा जिल्ह्यातील पॅकेज 7 मधील खडकपूर्णा नदीवरील पूलाचं काम अजूनही अपूर्णच
- औरंगाबाद जिल्ह्यातील पेकेज 9 मधील काही ठिकाणी घाट सेक्शनमधील काम अपूर्ण
Maharashtra SSC Exams 2022 : राज्यात आजपासून दहावी बोर्डाची परीक्षा (SSC Board) सुरू होत आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर दहावीची ऑफलाईन परीक्षा सुरु होणार आहे. 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थी दहावी बोर्डाची परीक्षा देणार आहेत. दरम्यान, दहावीच्या परीक्षार्थिंना वेळ वाढवून देण्यात आला आहे. दहावीच्या लेखी परीक्षेत 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटं तर 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटं वाढवून देण्यात आली आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board Of Secondary & Higher Secondary Education) वतीने घेण्यात येणाऱ्या मार्च एप्रिल 2022 दहावी बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. मागील वर्षी कोरोनाच्या परिस्थितीत दहावी परीक्षा ऐनवेळी रद्द करावी लागली होती. त्यामुळे दोन वर्षानंतर दहावी परीक्षा घेतली जात आहे. यंदाच्या दहावी बोर्ड परीक्षेला 16,39,172 विद्यार्थी बसणार आहेत. दहावी बोर्ड परीक्षेसाठी एकूण 22,911 शाळांमधील विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असून राज्यातील 21,284 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. आज पहिला पेपर हा प्रथम भाषेचा असणार आहे.
Belgaum Fire : बेळगाव जिल्ह्यातील उगार साखर कारखान्याला आग
बेळगाव जिल्ह्यातील काग वाड तालुक्यातील उगार येथील साखर कारखान्यात आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. कारखान्यात ऊस गाळप सुरू असताना त्यावेळी अचानक ठिणगी पडून कन्व्हेअर बेल्टला आग लागली. कन्व्हेअर बेल्टला आग लागल्यावर ही आग आजूबाजूला पसरली. ज्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
Maharashtra News : कॉंग्रेस आमदारांची मुख्यमंत्र्याकडे नाराजी
Maharashtra News : भाजप विरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका न घेता नरमाईची भूमिका घेत असल्याची नाराजी कॉंग्रेस आमदारांनी मुख्यमंत्र्याकडे व्यक्त केली आहे. आज विधनभवनात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री अशोक चव्हाण आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली.
Buldana News : शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीपात्रात 12 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू
Buldana News : शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीपात्रात खेळायला गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांनी रात्री जेसीबीच्या साहाय्याने नदीत खड्डा खोदून ठेवल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. गुन्हा दाखल केल्याशिवाय मुलांचे शव ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईक आणि गावकऱ्यांची भूमिका आहे.
Holi Special : चिपळूणच्या सोमेश्वर आणि करंजेश्वरी देवीच्या शिंगोत्सवला प्रारंभ
नवसाला पावणारी देवी अशी श्रद्धा असणाऱ्या करंजेश्वरी देवीचा शिमगोत्सव आजपासून सुरू झाला. दुपारी 3 वाजता श्री देव सोमेशवर आणि श्री देवी करंजेश्वरीच्या चांदीच्या पालख्या ढोल ताशांच्या गजरात आज मंदिरातून निघाल्या.
Gondia News: गोंदिया जिल्ह्यात विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारात कचरा
गोंदिया जिल्ह्यात वर्ग पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारात चक्क गुटखा आणि कचरा, धूळ, सिमेंट असं सारं आढळलं आहे. गोंदिया जिल्हा परीषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे.