Sharad Pawar Markadwadi : शरद पवारांसह राहुल गांधीही मारकडवाडी ग्रामस्थांची भेट घेणार
Sharad Pawar Markadwadi : शरद पवारांसह राहुल गांधीही मारकडवाडी ग्रामस्थांची भेट घेणार
ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलनाला सुरुवात केलेली मारकडवाडी हे गाव आता देशात चर्चिलं जाऊ लागले असून उद्या शरद पवार हे सकाळी हेलिकॉप्टरने या गावात दाखल होणार आहेत. बॅलेट वर मतदान करण्यात यावे यासाठी या गावाने 29 नोव्हेंबर पासून आंदोलनाला सुरुवात केली होती. या गावाचा आवाज एबीपी माझाने समोर आणला आणि तीन डिसेंबर रोजी मतदान घेण्याचा निर्णय करण्यात आला होता. मात्र प्रशासनाने 2 डिसेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत या गावांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करत बॅलेटवर मतदानास विरोध केल्याने अखेर 3 डिसेंबर रोजी होणारे मतदान ऐनवेळी रद्द करावे लागले होते . सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे या गावात येऊन ग्रामस्थांची भूमिका जाणून घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने बॅलेटवर मतदान करण्याबाबतच्या याचिका फेटाळून लावल्यानंतर आता पुन्हा शरद पवार याबाबत न्यायालयात जाणार असल्याची चर्चा आहे. उद्या पवार नेमकी काय भूमिका घेत आहेत हे समोर येणार असून राहुल गांधी देखील या गावात येणार असल्याची चर्चा आहे.