एक्स्प्लोर

Uttam Jankar : माझ्या शपथेपेक्षा मारकडवाडीची लढाई महत्त्वाची, मी राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान घ्या; उत्तम जानकरांचं शरद पवारांसमोर मोठं वक्तव्य

Uttam Jankar : शरद पवार यांच्या उपस्थितीत मारकडवाडी गावात झालेल्या सभेतून उत्तम जानकर यांनी मोठं वक्तव्य केलंय.

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) ईव्हीएमबाबत (EVM) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून आरोप केला जात आहे. ईव्हीएममधून झालेल्या मतदानावर शंका उपस्थित करत मारकडवाडी (Markadwadi) गावाने मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रशासनाने दबाब टाकत अभिरुप मतदानाचा प्रयोग बंद पाडला. आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आज मारकडवाडी गावाला दाखल झाले. यावेळी जाहीर सभेतून आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी मोठं वक्तव्य केले. माझ्या शपथेपेक्षा मारकडवाडीची लढाई महत्त्वाची आहे. मी राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान घ्या, असे त्यांनी म्हटले. 

उत्तम जानकर म्हणाले की, आमच्यावर प्रशासनाने दबाव वाढवला तेव्हा आदल्या दिवशी रात्री गावामध्ये लोकं मंडपात झोपले होते. सकाळी मतदानाच्या दिवाशी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राहुल गांधी यांनी याबाबत माहिती घ्यायला गावात प्रतिनिधी पाठवले होते. माझ्या शपथेपेक्षा येथील लढाई महत्त्वाची आहे. मी राजीनामा देतो, बॅलेट पेपरवर मतदान घ्या, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

...तर राजीनामा देणार

ते पुढे म्हणाले की, मी निवडणूक आयोगाकडे गावाचा ठराव पाठवणार आहे. मला मतदान केलेल्या 1400 ग्रामस्थांचे प्रतिज्ञा पत्र देणार आहे. लोकशाही फक्त पवार साहेबच वाचवू शकतात. बॅलेट पेपरवर मतदान होणार असेल तर राजीनामा देणार आहे. देशातील एक निवडणूक बॅलेटवर घेऊ शकणार नाही का? असा सवाल उत्तम जानकर यांनी निवडणूक आयोगाला विचारला. 

माझ्यासाठी आमदारकी महत्त्वाची नाही

निवडणूक आयोगाने ऐकले नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टात जावू, असे देखील त्यांनी म्हटले आहे. माझ्यासाठी आमदारकी महत्त्वाची नाही तर लोकशाही महत्त्वाची आहे. लोकसभेला येथे मोदी आणले होते, तेव्हा 64 हजार मते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाले, असेही उत्तम जानकर यांनी स्पष्ट केले. 

ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, मारकडवाडीत एकूण 2476 मतदान असून त्यापैकी 77 टक्के मतदान झाले. भाजपचे राम सातपुते यांना 1003 तर उत्तम जानकर यांना 843 मतदान पडलं. गेली तीन टर्म या गावातून जानकर यांनाच लीड मिळायचे. पण यावेळीच मला कमी मतदान कसं झालं असा प्रश्न जानकरांनी उपस्थित केला होता. यानंतर मारकडवाडीच्या नागरिकांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली होती. यासाठी आंदोलन देखील केलं होतं. ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची संपूर्ण तयारी केली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने गावात जमावबंदी आदेश लागू करत ही मतदान प्रक्रिया थांबवली होती. बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील 17 जणांसह अन्य 100 ते 200 ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आणखी वाचा

Sharad Pawar: शरद पवार गटाला मोठा झटका, आणखी एक बडा नेता अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाणार, गुलाबराव देवकरांचा धक्कादायक निर्णय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

साडे तीनशे वर्षांपूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे हे विसरु नका : जयंत पाटील
मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील, ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेचं मैदान जयंत पाटील यांनी गाजवलं
Raj Thackery Video: राज ठाकरेंचा घणाघात, 'लाव रे तो व्हिडिओ'तून अदानींचं साम्राज्य सांगितलं; मराठी माणसांसाठी मुंबई किती महत्त्वाची?
Raj Thackery Video: राज ठाकरेंचा घणाघात, 'लाव रे तो व्हिडिओ'तून अदानींचं साम्राज्य सांगितलं; मराठी माणसांसाठी मुंबई किती महत्त्वाची?
Gold Rate : 2025 मध्ये सोन्याचे दर 65 टक्क्यांनी वाढले, 2026 मध्ये काय घडणार? तज्ज्ञ अंदाज वर्तवत म्हणाले...
2025 मध्ये सोन्याचे दर 65 टक्क्यांनी वाढले, 2026 मध्ये काय घडणार? तज्ज्ञ अंदाज वर्तवत म्हणाले...
Video: आक्रमक भाषण, दाखव रे तो फोटो, फडणवीसांची दुसऱ्यांदा मिमिक्री; शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंचीही तोफ धडाडली
Video: आक्रमक भाषण, दाखव रे तो फोटो, फडणवीसांची दुसऱ्यांदा मिमिक्री; शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंचीही तोफ धडाडली

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका
Prakash Mahajan On Sanjay Raut Thane : संजय राऊत यांच्यावर टीका करताना प्रकाश महाजन यांची जीभ घसरली
Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
साडे तीनशे वर्षांपूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे हे विसरु नका : जयंत पाटील
मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील, ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेचं मैदान जयंत पाटील यांनी गाजवलं
Raj Thackery Video: राज ठाकरेंचा घणाघात, 'लाव रे तो व्हिडिओ'तून अदानींचं साम्राज्य सांगितलं; मराठी माणसांसाठी मुंबई किती महत्त्वाची?
Raj Thackery Video: राज ठाकरेंचा घणाघात, 'लाव रे तो व्हिडिओ'तून अदानींचं साम्राज्य सांगितलं; मराठी माणसांसाठी मुंबई किती महत्त्वाची?
Gold Rate : 2025 मध्ये सोन्याचे दर 65 टक्क्यांनी वाढले, 2026 मध्ये काय घडणार? तज्ज्ञ अंदाज वर्तवत म्हणाले...
2025 मध्ये सोन्याचे दर 65 टक्क्यांनी वाढले, 2026 मध्ये काय घडणार? तज्ज्ञ अंदाज वर्तवत म्हणाले...
Video: आक्रमक भाषण, दाखव रे तो फोटो, फडणवीसांची दुसऱ्यांदा मिमिक्री; शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंचीही तोफ धडाडली
Video: आक्रमक भाषण, दाखव रे तो फोटो, फडणवीसांची दुसऱ्यांदा मिमिक्री; शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंचीही तोफ धडाडली
भाजप उमेदवारासाठी मतदारांना 3 हजारांचं पाकीट, शिवसेना कार्यकर्त्यांची धाड; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार
भाजप उमेदवारासाठी मतदारांना 3 हजारांचं पाकीट, शिवसेना कार्यकर्त्यांची धाड; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार
Video: मोठी बातमी! पुण्यात देवाभाऊंचा रोड शो, स्वागताच्या फटाक्यांनी इमारतीला आग; मोबाईल टॉवर जळून खाक
Video: मोठी बातमी! पुण्यात देवाभाऊंचा रोड शो, स्वागताच्या फटाक्यांनी इमारतीला आग; मोबाईल टॉवर जळून खाक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जानेवारी 2025 | रविवार
BJP vs MNS Clash: मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेत राडा! भाजप अन् मनसे कार्यकर्ते एकमेकांना भिडले; एक जण जखमी, नेमकं काय घडलं?
मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेत राडा! भाजप अन् मनसे कार्यकर्ते एकमेकांना भिडले; एक जण जखमी, नेमकं काय घडलं?
Embed widget