एक्स्प्लोर

'हे सांगून सांगून आम्ही थकलोय,एकनाथ शिंदे नाराज नाहीत..' नाराजीनाट्यावर उदय सामंत म्हणाले..

हे सांगून सांगून आम्ही थकलोय. सरकार स्थापन झाले आहे. तिनही नेते मंत्रीमंडळ सांभाळायला सक्षम आहेत. असं म्हणत विरोधकांनाही उदय सामंत यांनी चांगलंच सुनावलंय.

Mumbai: विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत महायुतीनं राज्यात सत्ता स्थापन केली आहे. आधीच नाराजीची चर्चा असणाऱ्या एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली खरी पण कोणाला कुठलं मंत्रीपद मिळणार मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार हे गुलदस्त्यात असल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहे. यावर शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी आता स्पष्टीकरण दिलंय. शिंदे साहेब नाराज नाहीत. हे सांगून सांगून आम्ही थकलोय. सरकार स्थापन झाले आहे. तिनही नेते मंत्रीमंडळ सांभाळायला सक्षम आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या आधीच मंत्रीमंडळ विस्तार होईल असं वक्तव्य केलंय. हे सांगत त्यांनी EVM वर चाललेल्या गोंधळावरही विरोधकांना सुनावलंय.

काय म्हणाले उदय सामंत?

राज्यात सध्या महाविकास आघाडीकडून सत्ताधाऱ्यांवर EVM वरून आरोप प्रत्योरोप होत आहेत. यावरून आमदार उदय सामंत यांनी विरोधकांवर टोलेबाजी केलीय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर ते म्हणाले, एकीकडे EVM च्या नावावर बोंबाबोंब करायची ही दुसरीकडे लोकांची माथी भडकवायची हा विरोधकांचा डाव आहे. ही भूमिका महाराष्ट्राला समजली म्हणून ते 40-50 वर आले. नियम लावताना खासदारकीला एक आाणि विधानसभेला एक नियम. इतर ठिकाणी EVM चांगलं होतं आता वाईट आहे. असं म्हणत शिंदेगटाचे आमदार उदय सामंत यांनी पवारांवर टीका केली.

राहूल गांधींसह काँग्रेस नेत्यांना टोला

EVM विरोधी वातावरण निर्माण करण्यापेक्षा जे अपयश आलं आहे ते झाकण्याचा हा प्रयत्न आहे. जिंकून आले ते मतदान पण इव्हीएमवर झाले. असा टोला काँग्रेसनेते राहूल गांधींना त्यांनी लगावला. राहुल गांधीवर प्रयत्न करुन बघितला तो यशस्वी झाला नाही. म्हणून आता ममता दिदिंवर प्रयोग करुन बघत आहेत. काँग्रेसने विचार करावा की त्यांच्यावर शंका निर्माण होत आहे. असंही ते म्हणाले.

हिवाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार

राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. सरकार स्थापन झालं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यानंतर आता सर्वांचं लक्ष मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागलं आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आठवडाभरात मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिपदांचा फॉर्म्युला आणि खात्यांच्या वाटप, यासाठी महायुतीतील नेत्यांना आणि पक्षांना तारेवरती कसरत करावी लागणार आहे.  याआधी देखील मंत्रीपदासाठी आस लावून बसलेल्या नेत्यांचा देखील विचार यावेळी करावा लागणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suresh Dhas on Walmik Karad : 100 बँक खाती, 17 सीम कार्डचा वापर, खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठका! वाल्मिक कराडची सुरेश धसांकडून पुन्हा पोलखोल
100 बँक खाती, 17 सीम कार्डचा वापर, खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठका! वाल्मिक कराडची सुरेश धसांकडून पुन्हा पोलखोल
Ind vs Eng T20 Series : टीम इंडिया होणार मोठी उलथापालथ! इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी BCCI 'या' खेळाडूंना देणार संधी? जाणून घ्या शेड्यूल अन् सर्वकाही
टीम इंडिया होणार मोठी उलथापालथ! इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी BCCI 'या' खेळाडूंना देणार संधी? जाणून घ्या शेड्यूल अन् सर्वकाही
Mumbai High Court : मुलीला एकदा फॉलो करणे गुन्हा नाही; सतत पाठलाग करणे हा कायदेशीर गुन्हा! उच्च न्यायालयाने आरोपींची शिक्षा केली कमी
मुलीला एकदा फॉलो करणे गुन्हा नाही; सतत पाठलाग करणे हा कायदेशीर गुन्हा! उच्च न्यायालयाने आरोपींची शिक्षा केली कमी
Ladki Bahin Yojana: खटाखट नोंदणी वाढवण्यासाठी भाजपचा नवीन फंडा, 2100 रुपये देतो सांगून पक्ष सदस्यत्त्वाचे फॉर्म फरुन घेतले
लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देतो सांगून भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष सदस्यत्त्वाचे फॉर्म भरुन घेतले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 80 at 08AM Superfast 06 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 06 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 730AM 06 January 2025 माझा गाव, माझा जिल्हाABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 06 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suresh Dhas on Walmik Karad : 100 बँक खाती, 17 सीम कार्डचा वापर, खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठका! वाल्मिक कराडची सुरेश धसांकडून पुन्हा पोलखोल
100 बँक खाती, 17 सीम कार्डचा वापर, खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठका! वाल्मिक कराडची सुरेश धसांकडून पुन्हा पोलखोल
Ind vs Eng T20 Series : टीम इंडिया होणार मोठी उलथापालथ! इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी BCCI 'या' खेळाडूंना देणार संधी? जाणून घ्या शेड्यूल अन् सर्वकाही
टीम इंडिया होणार मोठी उलथापालथ! इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी BCCI 'या' खेळाडूंना देणार संधी? जाणून घ्या शेड्यूल अन् सर्वकाही
Mumbai High Court : मुलीला एकदा फॉलो करणे गुन्हा नाही; सतत पाठलाग करणे हा कायदेशीर गुन्हा! उच्च न्यायालयाने आरोपींची शिक्षा केली कमी
मुलीला एकदा फॉलो करणे गुन्हा नाही; सतत पाठलाग करणे हा कायदेशीर गुन्हा! उच्च न्यायालयाने आरोपींची शिक्षा केली कमी
Ladki Bahin Yojana: खटाखट नोंदणी वाढवण्यासाठी भाजपचा नवीन फंडा, 2100 रुपये देतो सांगून पक्ष सदस्यत्त्वाचे फॉर्म फरुन घेतले
लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देतो सांगून भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष सदस्यत्त्वाचे फॉर्म भरुन घेतले
Pushpa 2 Box Office: 'पुष्पा 2'नं किती कोटींचा गल्ला जमवला? 800 की, 1200 कोटी? बॉक्स ऑफिसच्या आकड्यांचं गूढ तुम्हाला उलगडलं?
'पुष्पा 2'नं किती कोटींचा गल्ला जमवला? 800 की, 1200 कोटी? बॉक्स ऑफिसच्या आकड्यांचं गूढ तुम्हाला उलगडलं?
Suresh Dhas On Walmik Karad Dhananjay Munde: वाल्मिक कराडची सटकली अन्...; धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप
वाल्मिक कराडची सटकली अन्...; धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप
एसटी घोटाळ्यात चौकशीचा ससेमिरा; कागदपत्रे सादर करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश 
एसटी घोटाळ्यात चौकशीचा ससेमिरा; कागदपत्रे सादर करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश 
Beed Crime: संतोष देशमुखांना संपवल्यानंतर सुदर्शन घुले आसऱ्यासाठी भिवंडीत सोन्या पाटलांकडे पोहोचला पण सगळा प्लॅनच फसला
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे भिवंडीतील सोन्या पाटील कनेक्शन समोर, सुदर्शन घुलेचा प्लॅन कसा फसला?
Embed widget