Maharashtra Breaking News 12 April 2022 : दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Kolhapur Election 2022 : उत्तर कोल्हापूरचा कौल कुणाला? दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; आज मतदान
Kolhapur Election 2022 : कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेसाठी एकूण 2 हजार 142 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, एकूण 357 केंद्रांवर ही मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदानाच्या प्रक्रियेसाठी 357 ईव्हीएम मशीन (EVM Machine) ठेवण्यात आलेत. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात एकूण 7 संवेदनशील मतदान केंद्रं आहेत. एकूण 550 पोलीस कर्मचाऱ्यांचा फोजफाटा तिथे तैनात करण्यात आला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीत 80 वर्षांच्या आणि दिव्यांग नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच मत नोंदवण्यात आलं होतं. तसाच प्रयोग आता या निवडणुकीत केला जाणार आहे.
महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) काँग्रेसच्या जयश्री पाटील या निवडणूक लढवत आहेत. तर भाजपकडून सत्यजित कदम निवडणुकीच्या रिंगणात आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात आला असून, दोघांनीही विजयाचे दावे केले आहेत.
रविवारी प्रचाराच्या शेवटच्या दिग्गज नेत्यांच्या राजकीय सभा कोल्हापुरात पार पडल्या. शेवच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोल्हापूरच्या जनतेला संबोधीत केलं. यावेळी त्यांनी कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. त्यामुळं महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव निवडून येणार हे नक्की असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. खोटं बोल पण रेटून बोल ही विरोधकांची रणनीती आहे. भाजपला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही, भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते.
Sharad Pawar Silver Oak Attack : आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दगडफेक आणि चप्पलफेक करत गोंधळ घातला. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत सिल्व्हर ओक हल्ल्याचा मास्टरमाइंड हा नागपुरचा आहे आणि लवकरच ते नाव समोर येईल असं म्हटलंय.
सिल्व्हर ओक हल्ल्याचा मास्टरमाइंड हा नागपुरचा आहे आणि लवकरच ते नाव समोर येईल असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की, हल्ल्याच्या दिवशी दोन फोन कॉल हे नागपूरहून आले होते, त्यावरून मास्टरमाइंड हा नागपूरचाच असल्याचे स्पष्ट होते असं मिटकरी यांनी म्हटलंय. तर किरीट सोमय्या आणि नील सोमय्या दोषी नसते तर ते पळून गेले नसते असं देखील मिटकरी यांनी म्हटलंय.
नेरळ ते भिवपुरी रेल्वे स्थानका दरम्यान तरुणीचा रेल्वेरुळानजीक मृत्यू
नेरळ ते भिवपुरी रेल्वे स्थानका दरम्यान तरुणीचा रेल्वेरुळानजीक मृत्यू झाला आहे. मंगला शिरोडकर असे या तरुणीचे नाव आहे.
Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका; ब्रिच कॅन्डी रुग्णालयात दाखल
राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला आहे. त्यांना उपचारासाठी ब्रिच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांना साधारणपणे साडे सहा वाजता हृदय विकाराचा झटका आला होता. सध्या त्यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. पुढील 7 दिवस सक्तीच्या विश्रांतीचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे.
Load Shedding : अघोषित भरनियमनाने शेतकरी त्रस्त
यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक महावितरणच्या अघोषित भारनियमनाला वैतागले असून, गेल्या महिन्याभरापासुन सुरू असलेला विजेचा लपंडाव पाहता जनतेत महावितरणच्या तुघलकी कारभाराबाबत रोष निर्माण झाला आहे. विशेषतः शेतकरी वर्गावर मोठे संकट निर्माण झाले आहे. पालेभाज्या, फळबाग आणि उन्हाळी पिकांना सिंचनाची नितांत आवश्यकता असताना शेतकऱ्यांना वीज नसल्याकारणाने मोठी अडचण निर्माण होत आहे. भारनियमनाचे वेळापत्रक पाळल्या जात नसून, कधी रात्री-अपरात्री वीज राहते तर कधी दिवसादेखील वीज पुरवठा खंडित राहत असल्याने पिकांना ओलिताची सोय करायची तरी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांकडे उभा ठाकला आहे. शेतीतील पीक उन्हाच्या वाढत्या तडाख्याने व भारनियमनामुळे ओलित होऊ न शकल्याने डोळ्यादेखत सुकत आहे
बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची भाजपा नेते आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या बद्दल शिवराळ भाषा
भाजपाचे काही नेते सध्या पिसाळलेलं कुत्र्यासारखे राज्याला वागवत आहेत. शरद पवार साहेबांच्या कामाची उंची 'हे' नालायक कधीच समजू शकणार नाहीत. दारू पिऊन त्या गुणरत्न सदावर्ते च्या सांगण्यावरून साहेबांच्या घरावर हल्ला करतो ही मर्दांगी नाही गुणरत्न सदावर्ते हा कुणाचा कुत्रा आहे हे माहीत नाही का...? मराठा समाजाला आरक्षण यांच्या मुळेच मिळालं नाही. राज्यात दंगली घडवून भाजपाला राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचं लक्ष काही भाजप नेत्यांचं असल्याचा आरोप बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केला असून यावेळी त्यांनी भाजपा नेते आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या बद्दल शिवराळ भाषेचा वापर केला आहे.
Neelam Gorhe : पीडित तरूणी जे आरोप करत आहे, त्यावरही विश्वास ठेवायला हवा : नीलम गोऱ्हे
Neelam Gorhe : रधुनाथ कुचीक प्रकरणातील पीडित तरूणी जे आरोप करत आहे, त्यावरही विश्वास ठेवायला हवा असे शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. याबरोबरच पीडित तरूणीच्या जखमांचं भांडवल केलं जातय असेही नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.