एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News 10 April 2022 : अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या घराची झडती घेऊन आता पोलीस बाहेर पडले

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News 10 April 2022 : अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या घराची झडती घेऊन आता पोलीस बाहेर पडले

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Corona Booster Dose: आजपासून 18 वर्षांवरील सर्वांना 'बूस्टर'; लसींच्या किमतीही घटल्या

Corona Vaccine : देशात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविड वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येणार आहे. 10 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून कोविड वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 9 महिने पूर्ण झाले आहेत ते नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन कोरोना लसीचा बूस्टर लस घेऊ शकतील. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्यांचे वय 18 वर्षे आहे आणि लसीचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत, ते बूस्टर डोससाठी पात्र असतील.

कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या किमती घटवल्या
सीरम इन्स्टिट्यूकडून उत्पादित  करण्यात येणाऱ्या कोव्हिशिल्ड लसीचे दर कमी करण्यात आली आहे. सीरमने खासगी रुग्णालयासठी कोव्हिशिल्डचे दर हे तब्बल 375 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. कोव्हिशिल्डची लस आता  225 रुपयांना मिळणार आहे. सोबतच भारत बायोटेकच्या सुचित्रा एला यांनी  देखील खासगी रुग्णालयासाठी कोवॅक्सीनच्या किंमत कमी केल्या आहेत. कोवॅक्सीनची किंमत आता 1200 वरून 225 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Pakistan New PM : इम्रान खाननंतर 'हे' होणार पाकिस्तानचा पुढचे पंतप्रधान, सोमवारी होणार अधिकृत घोषणा

Pakistan New PM : पाकिस्तानमध्ये मध्यरात्री राजकीय नाट्य पाहायला मिळालं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इम्रान खान (Imran Khan) यांच्याविरोधात संसदेत आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर मतदान झालं. यादरम्यान इम्रान खान यांना पराभवाचा सामना करावा लागला. अविश्वास ठरावाच्या बाजूने 174 मते पडली. इम्रान खान यांचा पक्ष पीटीआय मतदान प्रक्रियेत सहभागी झाला नाही. इम्रान खान यांनी अविश्वास प्रस्तावावरील मतदानापूर्वी पंतप्रधान निवासस्थान सोडले. पीटीआयचे खासदार फैसल जावेद यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की, 'त्यांनी सभ्यतेने पदभार सोडला आणि नतमस्तक झाले नाही.'

दरम्यान, आता पुढील पंतप्रधानाची निवडणूक सोमवारी होणार आहे. इम्रान खान यांच्या विरोधात एकजूट राहिलेल्या विरोधकांनी शाहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदाचा आधीच नवा चेहरा बनवलं आहे. अशा स्थितीत शाहबाजच पंतप्रधान होणार हे स्पष्ट झालं आहे.

23:35 PM (IST)  •  10 Apr 2022

Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या घराची झडती घेऊन आता पोलीस बाहेर पडले

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या घरी मुंबई पोलिसांच्या पथकाने झडती घेतल्यानंतर आता ते पथक बाहेर पडलं आहे. यावेळी या ठिकाणचे सीसीटीव्ही, रजिस्टर तपासण्यात आलं असून सदावर्तेंना भेटायला कोण-कोण आलं होतं याची माहिती घेण्याचं काम पोलिसांनी केलं. ही झडती सुमारे सात ते आठ तासांपासून सुरू होती असं सांगितलं जातंय.

22:23 PM (IST)  •  10 Apr 2022

Gunaratna Sadavarte : अॅड. गुरणरत्न सदावर्ते यांच्या घरी मुंबई पोलिसांचे पथक दाखल

Gunaratna Sadavarte : अॅड. गुरणरत्न सदावर्ते यांच्या घरी मुंबई पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. सदावर्ते यांच्या घराची मुंबई पोलीस झाडाझडती घेणार आहेत.   

19:32 PM (IST)  •  10 Apr 2022

Kolhapur : महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला कोल्हापूर महाविकास आघाडीकडून 5 लाखाचे बक्षीस

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला कोल्हापूर महाविकास आघाडीकडून 5 लाखाचे बक्षीस.

पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि अरुण दुधवडकर यांच्याकडून बक्षिसाची घोषणा.

पैलवांनाच्या पाठीशी महाविकास आघाडी कायम राहणार असल्याचं आश्वासन.

16:58 PM (IST)  •  10 Apr 2022

Beed News Update :  भाजप आमदार सुरेश धसांवर दरोड्याचा गुन्हा दाखल, न्यायालयाचा दणका  

Beed News Update : भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात दरोड्यासारखी कलमे वाढवण्याचे आदेश  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. बीडमधील आष्टी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते मनोज चौधरी यांच्या पत्नी माधुरी चौधरी यांनी आठ महिन्या पूर्वी फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीवरून आमदार सुरेश धस यांच्यासह 38 जणांवर दाखल झालेल्या गुन्ह्यात आता दरोड्या सारखी गंभीर कलमे वाढविण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिले आहेत. 

16:13 PM (IST)  •  10 Apr 2022

Cm Uddhav Thackeray : विरोधकांकडे बोलण्यासारखे मुद्दे नाहीत ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टीका

Cm Uddhav Thackeray : विरोधकांकडे बोलण्यासारखे मुद्दे नाहीत. बोलण्यासारखे काही नाही, त्यामुळे खोटे आरोप करण्याचे काम सुरू आहे, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Embed widget