Corona Booster Dose: आजपासून 18 वर्षांवरील सर्वांना 'बूस्टर'; लसींच्या किमतीही घटल्या
Corona Vaccine Booster Dose : देशात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविड वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येणार आहे. दुसरीकडे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या किमती घटवल्या आहेत.
![Corona Booster Dose: आजपासून 18 वर्षांवरील सर्वांना 'बूस्टर'; लसींच्या किमतीही घटल्या Booster Dose Start For All who cross 18 ministry of health announces booster dose will start from today 10 April Corona Booster Dose: आजपासून 18 वर्षांवरील सर्वांना 'बूस्टर'; लसींच्या किमतीही घटल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/15/aa355202d5ac919fa9fd80a840866097_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Corona Vaccine : देशात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविड वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येणार आहे. 10 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून कोविड वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 9 महिने पूर्ण झाले आहेत ते नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन कोरोना लसीचा बूस्टर लस घेऊ शकतील. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्यांचे वय 18 वर्षे आहे आणि लसीचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत, ते बूस्टर डोससाठी पात्र असतील.
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या किमती घटवल्या
सीरम इन्स्टिट्यूकडून उत्पादित करण्यात येणाऱ्या कोव्हिशिल्ड लसीचे दर कमी करण्यात आली आहे. सीरमने खासगी रुग्णालयासठी कोव्हिशिल्डचे दर हे तब्बल 375 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. कोव्हिशिल्डची लस आता 225 रुपयांना मिळणार आहे. सोबतच भारत बायोटेकच्या सुचित्रा एला यांनी देखील खासगी रुग्णालयासाठी कोवॅक्सीनच्या किंमत कमी केल्या आहेत. कोवॅक्सीनची किंमत आता 1200 वरून 225 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या वर्षी 16 जानेवारीला देशभरात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली. त्यावेळी आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांवरील सर्व प्रौढांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. आतापर्यंत देशभरात कोरोना लसीचे 185.38 कोटी डोस देण्यात आले आहेत. 15 वर्षांवरील जवळपास 96 टक्के लोकसंख्येला लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे, तर 83 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
आतापर्यंत भारतात झालेलं लसीकरण :
पहिला टप्पा - 60 वर्षांपुढील नागरिकांसाठी कोरोना लसीचा डोस देण्याचे सरकारने जाहीर केले. सोबतच, त्यामध्ये फ्रंटलाईन वर्कर्स म्हणजेच डॉक्टर, पोलीस कर्मचारी, आरोग्यसेविका यांचा यामध्ये समावेश होता.
दुसरा टप्पा - 60 वर्षांच्या पुढील सर्व व्यक्तींचा यामध्ये समावेश होता.
तिसरा टप्पा - तिसऱ्या टप्प्यात 1 मे पासून 45 च्या पुढील सर्व नागरिकांचा यामध्ये समावेश होता.
चौथा टप्पा - 1 जूनपासून 18 वयोगटापुढील सर्वांना लसीकरणाचा डोस मिळत होता.
Zydus Cadila : कोरोनापासून बचाव करण्यासाठी झायडस कॅडिलाच्या लशीचा पुरवठा सुरू झाला आहे. महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये या लशीचं वितरण होणार आहे. विशेष बाब म्हणजे ही लस सुईमुक्त आहे. आतापर्यंत बाजारात आलेल्या इतर कोरोना लसींप्रमाणे या लशीचे दोन नव्हे तर तीन डोस घ्यावे लागतील. अशी ही जगातील पहिली लस आहे, जी डीएनए आधारित आणि सुईमुक्त आहे.
Covaxin : कोवॅक्सिन भारत बायोटेकद्वारे उत्पादित केली जाते. ही देशातील दुसरी लस आहे जी वापरण्यासाठी मंजूर झाली आहे. या लशीसाठीसुद्धा दोन डोस घेणे गरजेचे होते. पहिल्या डोसनंतर, दुसरा डोस 28 दिवसांनी घेतला जातो.
Covishield : कोविशिल्ड सीरम इन्स्टिट्यूटने विकसित केले आहे. आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळविणारे कोविशील्ड ही देशातील पहिली लस होती. या लसीचे दोन डोस घेणे गरजेचे होते. दुसरा डोस पहिल्या डोसनंतर 84 दिवसांनी लागू केला जातो.
Sputnik V : रशियाच्या Sputnik V ला Kovshield नंतर मान्यता देण्यात आली होती. कोरोनाची देशातील तिसरी लस म्हणून याकडे पाहिले जाते. या लसीचे दोन डोस आहेत. या लसीचा वापर देशातही मोठ्या प्रमाणात झाला आहे.
आतापर्यंत भारताने लसीकरणाचे चार टप्पे पूर्ण केले असून लसीकरणाच्या बाबतीत भारत सर्वात अव्वल स्थानावर आहे.
महत्वाच्या बातम्या :
- आनंददायी बातमी, बूस्टर डोसच्या पार्श्वभूमीवर Covishield आणि Covaxin किंमतीत मोठी कपात
- Corona Vaccine : देशातील 18 वर्षांवरील सर्वांना आता बूस्टर डोस घेता येणार; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची घोषणा
- Mumbai Vaccination : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! आठवडाभरात महानगरी 100 टक्के लसवंत...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)