एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News 06 September 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News 06 September 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Background

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू... 

भाजपचं मिशन बारामती, बावनकुळे बारामती दौऱ्यावर
 पवार कुटुंबीय निवडणूक प्रचाराची सुरुवात ज्या कनेरी गावातील हनुमान मंदिरातून करतात त्याच मंदिराला भेट देऊन बावनकुळेंच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. काटेवाडी येथे भाजप कार्यकर्त्यांशी बैठकीतून संवाद साधणार आहेत.

सायरस मिस्त्रींवर अंत्यसंस्कार
सायरस मिस्त्री यांच्यावर सकाळी 11 वाजता वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत

पुण्याच्या मानाच्या गणपती विसर्जनासंदर्भात हायकोर्टात सुनावणी
पुणे शहरात लक्ष्मी रोडवरून गणपती विसर्जन मिरवणुकीच्यावेळी शहरातील पाच मानाच्या गणपतींना प्रथम मार्गस्थ होण्याची परंपरा आणि रूढी आहे. त्यानंतर अन्य गणपती मंडळांना विसर्जन मिरवणुकीला रस्ता खुला केला जातो. मात्र, अशा अटी आणि परंपरा या संविधानातील कलम 19 नुसार असलेल्या संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. असा दावा करत 'बढाई समाज ट्रस्ट'चे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी उच्च न्यायालायात धाव घेत याचिका केली आहे. 

बांग्लादेशच्या पंतप्रधानांसोबत मोदींची द्विपक्षीय चर्चा
बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि मोदींमध्ये आज चर्चा होणार आहे. त्यानंतर शेख हसीना राष्ट्रपती मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेणार आहेत. 

आज भारतीय क्रिकेट संघासाठी करो या मरो ची स्थिती
आशिया कप 2020 च्या सुपर फोरमध्ये आज भारत आणि श्रीलंकेत सामना होणार आहे. पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे.  सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. 

20:51 PM (IST)  •  06 Sep 2022

Satara  News : महाबळेश्वर बसस्थानकात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन; पोलीस यंत्रणा हायअलर्टवर

Satara  News : महाबळेश्वर (Mahableshwar) बसस्थानकात बॉम्ब ठेवल्याची धमकी एका निनावी फोनद्वारे सातारा  पोलिसांना देण्यात आली. एका अज्ञात व्यक्तीने गाडी क्रमांकासह पोलिसांना माहिती  दिली .  फोन आल्यानंतर खबरदारी म्हणून बसस्थानकात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.  सायंकाळी 6 वाजता पोलिसांना फोन  करण्यात आला होता. परंतु हा फेक कॉल असल्याची माहिती  जिल्हा पोलिस प्रमुखांनी दिली.

20:44 PM (IST)  •  06 Sep 2022

 CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  उद्या पुणे दौऱ्यावर, मानाच्या पाच गणपतींचे घेणार दर्शन

 CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  उद्या पुणे दौऱ्यावर आहेत. मानाच्या पाच गणपतींचे दर्शन घेणार आहेत. तसेच तसेच काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या घरी आणि मंडळात जाण्याची शक्यता आहे.

19:19 PM (IST)  •  06 Sep 2022

Virar : काशीद कोपरमध्ये दरड कोसळल्याची घटना

MMRDA चे काम सुरू असलेल्या ठिकाणी दरड कोसळल्याची घटना विरारच्या काशीद कोपर येथे घडली आहे. काशीद कोपर येथे डोंगर खोदून सूर्या प्रकल्पाच्या 7 हजार 600 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या  भल्या मोठ्या पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. या कामामुळे माळिण, तळईसारखी दुसरी घटना विरारच्या काशीद कोपर येथे घडू शकते असा आरोप काँग्रेस पर्यावरण समितीचे प्रदेश अध्यक्ष समीर वर्तक यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गावकऱ्यांनी केला. गावकऱ्यांनी या कामाला विरोध केला आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास खोदकाम चालू असलेल्या ठिकाणी दरड कोसळल्याने स्थानिक राहिवाशांमध्ये भीतीचं वातावरणआहे. परंतु स्थानिकांचा विरोध झुगारून MMRDA कडून पाण्याच्या टाकीचे काम सुरूच असल्याने राहिवाशांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

16:47 PM (IST)  •  06 Sep 2022

Amol Mitkari : शिवा मोहोड यांची अमोल मिटकरींना अब्रुनुकसानीची नोटीस

अकोला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांची आमदार अमोल मिटकरींना अब्रूनुकसानीची नोटीस. अब्रुनुकसानीच्या दाव्यापोटी मिटकरींना 1 रूपयाची दिली नोटीस. आमदार मिटकरींनी चारित्र्यावर शिंतोडे उडविल्याने जनमाणसात आपली प्रतिमा मलिन झाल्याचा नोटीसमध्ये आरोप करण्यात आला आहे. मिटकरींच्या कुवतीनुसार नोटीस दिल्याची शिवा मोहोड यांची प्रतिक्रिया. जास्त रक्कमेची नोटीस दिली असती तर मिटकरींना काळी कामं करावी लागली असती. या आधी मिटकरींनी शिवा मोहोडांना 5 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस दिली आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
Bopdev Ghat Incident : आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
मोठी बातमी! विधानसभा निवडणुकांचा परिणाम; राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
मोठी बातमी! विधानसभा निवडणुकांचा परिणाम; राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2024 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Harshvardhan Patil : घेतली तुतारी, मिळाली उमेदवारी; मिटकरी म्हणाले, गद्दारीकडे भाजपचं दुर्लक्षTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 07 OCT 2024 : 07 PM : ABP MajhaAkola Rada News Update : अकोल्यात दोन गटातील वादानंतर राडा, अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 8 PM 07 October 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
Bopdev Ghat Incident : आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
मोठी बातमी! विधानसभा निवडणुकांचा परिणाम; राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
मोठी बातमी! विधानसभा निवडणुकांचा परिणाम; राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2024 | सोमवार
यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना जाहीर
यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना जाहीर
Jalna News : जालन्यात काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना राडा, दोन गटात जोरदार घोषणाबाजी
जालन्यात काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना राडा, दोन गटात जोरदार घोषणाबाजी
अकोल्यात दोन गटांत तणाव, दगडफेक अन् जाळपोळ; पोलिसांसह दंगा काबू पथकंही रस्त्यावर
अकोल्यात दोन गटांत तणाव, दगडफेक अन् जाळपोळ; पोलिसांसह दंगा काबू पथकंही रस्त्यावर
MP Vishal Patil Vs Sanjay Patil : तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यात मोगलाई लागली नाही, येत्या काही काळात आम्ही दाखवून देऊ; रोहित पाटलांकडून संजय पाटलांना ओपन चॅलेंज!
तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यात मोगलाई लागली नाही, येत्या काही काळात आम्ही दाखवून देऊ; रोहित पाटलांकडून संजय पाटलांना ओपन चॅलेंज!
Embed widget