Mahayuti : शिंदेंनी ताणून धरलं, जागा वाढण्याची शक्यता, पण अजितदादा मात्र एक अंकीच; चार दिवसात महायुतीचं फायनल होणार
Mahayuti Seat Sharing : एकनाथ शिंदे यांनी ताणून धरल्याने त्यांच्या जागांमध्ये काहीशी वाढ होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. पण त्या बदल्यात शिंदेंना मुंबईतील जागा भाजपला द्यावी लागणार आहे अशी माहिती समोर येतेय.
मुंबई: राज्यातील महायुतीच्या जागावाटपावर येत्या तीन ते चार दिवसात अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अवाजवी जागांची मागणी केल्यामुळे आतापर्यंत अंतिम निर्णय झाला नसल्याचं सांगितलं जातंय. भाजप 32 जागा लढवण्याची शक्यता आहे, तर शिंदेंना 12 ते 13 जागा मिळण्याची शक्यता आहे. अजित पवारांना मात्र तीन ते चार जागांवरच समाधान मानावं लागणार असल्याचं बोललं जातंय.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत येत्या तीन ते चार दिवसात महायुतीच्या जागावाटपावर अंतिम निर्णय होणार आहे. 2019 साली जेवढ्या जागा लढल्या होत्या त्यापेक्षा जास्त जागांवर भाजप लढणार हे नक्की झालं आहे. त्यामुळे भाजप 32 पर्यंत जागा लढवणार असून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 10 ते 14 जागा तर अजित पवारांना 3 ते 4 जागा मिळण्याची शक्यता आहे.
नवनीत राणांचा निर्णय कोर्टाचा निकालानंतर
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा निर्णय कोर्टाच्या निर्णयानंतर होणार आहे. विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र वैधतेविषयी सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली असून काही दिवसात न्यायालय त्यावर निकाल देणार आहे. त्यामुळे त्या जर पात्र ठरल्या तर त्यांना भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवता येईल. अन्यथा या ठिकाणी भाजपकडून दुसरा उमेदवार देण्यात येईल अशी चर्चा आहे.
शिंदेंची डील, मुंबईतील आणखी एक जागा भाजपकडे
या आधी एकनाथ शिंदे यांना एक अंकी जागा देण्यात येणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले समर्थक खासदार नाराज होते. शिवसेनेतील बंडानंतर शिंदेंसोबत 13 खासदार आले होते. पण आता जर एक जागावाटपाच्या चर्चेमध्ये शिंदेंना 8 ते 9 जागा मिळणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या चार खासदारांचे तिकीट कापलं जाणार असल्याचं बोललं जात होतं.
ही बातमी वाचा: