Maharashtra LIVE Updates : दिल्ली विमानतळावर वीजपुरवठा खंडित, सर्व देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम
Maharashtra Updates News LIVE : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स एका क्लिकवर...

Background
मुंबई : सध्या देशात तसेच राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. देशात नुकतेच स्थापन झालेले एनडीए आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा देशपातळीवरील विरोधकांकडून केला जातोय. तर दुसरीकडे राज्यात राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली असून त्या दृष्टीने राजकीय नेत्यांनी आपली तयारी चालू झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Eknath Shinde Shivsena) आणि भाजप (BJP) या दोन पक्षांत अनेक ठिकाणी द्वंद्व चालू आहे. तर महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) आम्ही आागामी विधानसभा निवडणूक (Maharashtra State Assembly Election) एकत्र लढवण्याचे संकेत दिले आहेत. अशा स्थितीत आजदेखील राजकीय पटलावर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात साधारण सर्व ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. पण मुंबईसह, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी पावसाने (Rain Update) काहीशी विश्रांंती घेतली आहे. या घडामोडींसह आंतरराष्ट्रीय, देश तसेच राज्य पातळीवर सर्व घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर!
अमोल कीर्तिकर आमचे हे जिंकलेले खासदार आहेत- आदित्य ठाकरे
अमोल कीर्तिकर आमचे हे जिंकलेले खासदार आहेत- आदित्य ठाकरे
निकाल आल्यानंतर देशभरात चर्चा होतीये ते evm किती सुरक्षित आहेत
५ जून पासून यावर चर्चा सुरु आहे
या सगळ्यांवर कोर्टाची लढाई लढायची आहेच, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
Devendra Fadnavis Delhi Visit : देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार, वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता
नागपूरवरून संध्याकाळी देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार
रात्री दिल्लीत भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता























