Maharashtra Live: उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग थांबवला, वारकऱ्यांना चंद्रभागेत सुरक्षित स्नान करता येणार
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि घटनांचे अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. राज्यातील पावसाची स्थिती काय, अधिवेशनातील लाईव्ह अपडेटस्
LIVE

Background
हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असलेले डॉ. मारोती क्यातमवार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश करत भगवा झेंडा हाती घेतला आहे. मागील अनेक वर्षापासून डॉ. क्यातमवार हे जिल्हाभरात काँग्रेस वाढीसाठी काम करत होते क्यातमवार यांच्या पक्षप्रवेशामुळे वसमत शहरात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आता नवं बळ मिळणार आहे
बीड अर्बन मल्टीस्टेट मध्ये बनावट स्वाक्षऱ्या करून एचयूएफ खात्यातून 50 लाखांचा अपहार
Anc: बीड जिल्ह्यातील जवळपास दहा मल्टीस्टेटने ठेवीदारांची फसवणूक करत आपला गाशा गुंडाळल्याची प्रकरणे ताजी असताना आता बीड अर्बन मल्टीस्टेट मध्ये बनावट स्वाक्षऱ्या करून 50 लाखांचा अपहार झाल्याचं समोर आलंय. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये दिलीप रामगोपाल चितलांगे यांनी त्यांच्या दिवंगत वडिलांच्या नावे एचयुएफ खाते उघडले होते. मात्र याच खात्यातून तब्बल 50 लाख रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करत त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडिलांच्या मृत्यूनंतर नियमानुसार खात्याचा कर्ता ज्येष्ठ मुलगा होतो. मात्र पतसंस्थेने आरबीआय आणि आयकर विभागाचे नियम धाब्यावर बसून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली नाही.. याउलट बनावट स्वाक्षऱ्या वापरून ठेवींचा अपहार केला असा गंभीर आरोप चितलांगे यांनी केला. दरम्यान या प्रकरणात मल्टीस्टेटने आपली बाजू मांडली नसून पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत..
विजेच्या धक्क्यानं तरुणाचा मृत्यू,भंडाऱ्याच्या राजनी गावातील घटना
विजेच्या धक्क्यानं तरुणाचा मृत्यू
भंडाऱ्याच्या राजनी गावातील घटना
Anchor : प्रवाहित वीज तारांना स्पर्श झाल्यानं एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील राजनी या गावात घडली. युवराज थेरे (३५) असं मृत तरुणाचं नावं आहे. मृतक युवराज यानं गवातचं एक नवीन घरं बांधलं, मात्र गृहप्रवेश कार्यक्रम व्हायचा असल्यानं, तो रोज रात्री नवीन घरी झोपायला जात होता. मात्र, सकाळ होऊनही युवराज जुन्या घरी नं परतल्यानं कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला असता ही घटना समोर आली.
























