Maharashtra Live blog: 'पहलगाममध्ये सहभागी असलेले तिन्ही दहशतवाद्यांचा ऑपरेशन महादेवमध्ये खात्मा', गृहमंत्री अमित शाह यांचा लोकसभेत खुलासा
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी आणि ताज्या घडामोडींचे अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. राज्यात कुठे-कुठे पाऊस पडणार?
LIVE

Background
Maharashtra Live blog updates: मुंबई-गोवा महामार्गावर LPG गॅस वाहून नेणारा टँकरला अपघात. सोमवारी रात्री हातखंबा येथे पुलावरून टँकर खाली कोसळला. या अपघातानंतर टँकरमधून वायूगळती सुरु झाली. एमआयडीसीच्या रेस्क्यू टीमने ही वायूगळती तात्पुरती थांबवली होती. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केली पाहणी
आमिर खान आता यूट्यूब क्षेत्रात पाऊल टाकणार
आमिर खान आता यूट्यूब क्षेत्रात पाऊल टाकणार आहे ...आमिर खान टॅाकिज जनता का थिएटर आता एक नवा यूट्यूब चॅनल सुरू करणार आहे
आमिरचे सिनेमे आता यूट्यूब वर येणार …
सितारे जमीन पर थेट थिएटरनंतर सरल यूट्यूब वर येणार …
कोणत्याही OTT चॅनलवर हा सिनेमा येणार नाही ...
एक नवीन दिशा सिनेसृष्टीला आमिर खान देणार आहे
फक्त १०० रूपयेत आता यूट्यूब वर आमिरचा सिनेमा येणार आहे …
आमिर पहिला अभिनेता आहे ज्यांनी ताचा सिनेमा कोणत्याही OTT वाहिनीवर दिला नाही ...
सितारे जमीन पर आता थिएटरनंतर १ ॲगस्टला यूट्यूबवर प्रदर्शित होणार आहे...
आमिर खान भाषण पॉईंटर
३ ते साडे कोटी लोक म्हणजे २ ते ३ टक्के लोक फिल्म थेटर मध्ये बघतात.भारताची लोकसंखा १४५ कोटी आहे.इतर लोकांसमोर कसं पोहचायचं.मी यावर विचार केला कस पोहचताच अनेक आयडिया आल्या पण त्यातून काही झालं नाही.सरकार ने UPI आणलं.त्यामुळे सोप झालं.भारतात डिजिटल पेमेंट मध्ये जगात पहिल्या क्रमांकावर आहे.आता हीच वेळ आहे अस मला वाटत.याच उत्तर आज आहे डिजिटल प्लॅटफॉर्म प्रत्येक लोकांपर्यंत पोहचू शकतो.यू ट्यूब च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचू शकतो.५५ करोड भारतीय रोज youtube बघतात.याच उत्तर मी शोधाल आणि यू ट्यूब वर येऊ.तशी तयारी केली.शंभर वर्षापासून एकच मॉडेल आहे.तिकीट खरेदी करतात आणि फिल्म बघतात.आमिर खान टॉकीज यू ट्यूबवर लाँच केलं.मी प्रत्येक भारतीयापर्यंत पोहचू अस स्वप्न होत.जनता का थिएटर हे नाव दिलं.यू ट्यूब हेड यांना भेटलो.भारतात ८ ते ९ हजार स्क्रीन आहेत अमेरिकेत ३५ हजार चीन मध्ये ८० ते ९० हजार स्क्रीन आहेत.सिनेमा घर घर गाव गाव नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.स्मार्ट फोन आल्यावर जीवनशैली बदलली आहे.भारतात सर्वं जास्त सिनेमे तयार होतात.युवांना यामुळे संधी मिळत नाही.ही संधी त्यांना देणार आहे.यू ट्यूब वर १०० रुपयात सिनेमा रिलिज करणार आहे. यामुळं सर्व कुटुंब,नातेवाईक मित्रपरिवार यात बघू शकतात...
पंतप्रधानाच्या 'मन की बात' मध्ये गोव्याच्या पर्यटन मंत्र्याच्या खांद्यावर बसला पक्षी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या मासिक रेडिओ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सुरू असताना गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या खांद्यावर एका पक्ष्याने बसून सर्वांनाच सुखद धक्का दिला. विशेष म्हणजे, ज्यावेळी पंतप्रधानांनी पक्षी आणि त्यांच्या संवर्धनाबद्दल चर्चा केली, त्याचवेळी हा अनपेक्षित प्रसंग घडला. व्हिडिओमध्ये खंवटे शांतपणे हसत, संयम राखत बसलेले दिसत आहेत, तर पक्षी त्यांच्या खांद्यावर आरामात बसून होता. पंतप्रधानांच्या पक्ष्यांवरील भाषणाशी जुळल्याने तो क्षण अधिकच लक्षवेधी ठरला. पक्ष्यांना त्रास न देता त्यांना ओळखण्यासाठी ध्वनी रेकॉर्डिंग उपकरणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करण्यात आला. जेव्हा तंत्रज्ञान आणि संवेदनशीलता एकत्र येतात, तेव्हा निसर्गाला समजून घेणे किती सोपे आणि सखोल होते. हे एकीकडे पंतप्रधान पक्षी आणि तंत्रज्ञानावर बोलत होते, तर दुसरीकडे गोव्यात मंत्र्याच्या खांद्यावर बसलेल्या या पक्ष्याने आपला संदेश कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर न करता, जुन्या पद्धतीनेच, अचानक प्रकट होऊन दिला. हा प्रसंग निसर्ग आणि मानवी जीवनातील सुंदर समन्वयाचे एक अनोखे उदाहरण आहे.
























