Maharashtra Live blog: रामदास कदमांच्या बायकोने स्वतःला पेटवून का घेतलं, त्याची नार्को टेस्ट करा; अनिल परबांची मागणी
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
LIVE

Background
Maharashtra Live blog: जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, मारहाण करणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी,आणि रुग्णालयात उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सुरक्षा पुरविण्याची मागणी डॉक्टरांच्या संघटने कडून करण्यात आली आहे.रात्री साडे आठ वाजता दोन रुग्णांना घेऊन चार ते पाच तरुण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे घेऊन आले होते,यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्या रुग्णावर तातडीने उपचार करण्याचा आग्रह केला,यावेळी अन्य रुग्णांवर उपचार सुरू असून ते पूर्ण झाल्यावर आपल्या रुग्णावर उपचार केले जातील अस,मारहाण झालेल्या डॉक्टर मोहित यानी रुग्णाच्या नातेवाईकाना सांगितले,यावेळी डॉक्टर आणि रुग्ण नातेवाईक यांच्या मधे वाद निर्माण झाला असता,रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर मोहित यांना कानशीला मध्ये मारण्या बरोबर लाथा बुक्यांनी मारहाण केली. डॉक्टर मोहित यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली असल्याचं,त्यांचा सहकाऱ्यांनी म्हटले असून,मारहाण करणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी आणि आम्हाला सुरक्षा पुरवण्यात यावी,या मागणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर मोठ्या संखेने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल झाले असून,मारहाण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत,त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे
आधी बलात्काराचा दाखल केला गुन्हा; नंतर त्याच व्यक्तीसोबत पत्नी फिरताना आढळली, पतीने रस्त्यातच घातला गोंधळ
बीड: बलात्काराचा गुन्हा नोंदविलेल्या व्यक्तीसोबत चार चाकी वाहनात फिरणाऱ्या पत्नीला पतीने भर रस्त्यात रंगेहात पकडले.. हायव्होल्टेज ड्रामाची दिवसभर चर्चा रंगली होती. अखेर पतीच्या तक्रारीवरून पत्नीला घेऊन फिरणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर आणि महिलेवर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पतीच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बीड शहरात वास्तव्यास असणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील एपीआय रवी शिंदे याचे शेजारील महिलेसोबत प्रेमाचे सूत जुळले.. काही दिवस प्रेमसंबंधात राहिलेले हे दोघेजण पतीच्या निदर्शनास आले. पतीने पत्नीला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यास भाग पाडले. बलात्काराच्या गुन्ह्यात उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने फरार असलेला धाराशिवचा सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी शिंदे पुन्हा तक्रारदार महिलेसोबत बीड शहरात फिरताना पतीला आढळून आला. आणि पतीने रस्त्यातच गोंधळ घातला.. पुन्हा हे प्रकरण बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले आणि यावेळी पतीच्या तक्रारीवरून पोलीस अधिकारी शिंदे सह महिलेवर गुन्हा नोंदविला गेला आहे..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यभरातील प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यभरातील प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक
सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीच आयोजन
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर राज्य सरकारने काढलेल्या २ सप्टेंबरच्या शासन निर्णयाला ओबीसी नेत्यांचा विरोध
आजच्या बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी बैठकीला येण्यास दिला आहे नकार तर निमंत्रण नसल्याच कारण देत लक्ष्मण हाके यांची देखील बैठकीकडे पाठ
























