Maharashtra Live Updates: रत्नागिरीच्या मिरकडवाड्यात प्रचंड पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकामावर कारवाई
Breaking news in Maratahi: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे अपडेटस् आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा.
LIVE
Background
Maharashtra Breaking News Live Updates: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास सुरुच. महादेव मुंडे यांचे नातेवाईक बीडच्या पोलीस अधीक्षकांना भेटणार, पालकमंत्रीपदाचा तिढा सुटण्याची शक्यता, यासह देशभरातील विविध बातम्यांचे अपडेट्स...
नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; माहेरच्याकडून गंभीर आरोप, सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल
नांदेड: एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला असून मयत महिलेच्या आईने मुलीची हत्या झाल्याचा आरोप केलाय. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल केलाय. शहरातील मालेगांव रोडवरच्या तुळशीराम नगर भागातील ही घटना आहे. प्रियंका अभिजित अन्नपुरे असे मयत विवाहित महिलेचे नाव आहे. माहेरावरून सोने आण अशी मागणी करत सासरची मंडळी तिचा सातत्याने छळ करत होती. त्यातच काल तिचा संशयास्पद मृत्यू झाला असून मयत विवाहितेच्या भावाने सासरच्या मंडळींनीच तिची हत्या केली असा आरोप केलाय.या प्रकरणी भाग्यनगर पोलीस स्टेशन मध्ये सासू सासरे नणंद नवऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
वक्फ प्रकरणी मतदानावेळी शरद पवारांचा खासदार अनुपस्थित
नवी दिल्ली : वक्फ प्रकरणी मतदानावेळी शरद पवारांचा खासदार अनुपस्थित
उद्धव ठाकरेंच्या वतीने अरविंद सावंतांचे विरोधात मतदान
संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत वक्फ सुधारणा विधेयकावर आज क्लॉज बाय क्लॉज मतदान झालं
१६ विरुद्ध १० च्या बहुमताने संयुक्त संसदीय समितीत विधेयकावरील शिफारशी मंजूर
आम आदमी पक्ष आणि शरद पवारांच्या पक्षाचे खासदार अनुपस्थित
एसटी भाडेवाडीच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक; नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थांनकासमोर चक्काजाम आंदोलन
नांदेड: एसटी भाडेवाडीच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला असून ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी नांदेड शहरातील मध्यवर्ती बास्थानाकासमोर चक्काजाम आंदोलन केले आहे. एकीकडे लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जातात. तर दुसरीकडे एसटी बसेसचे भाडेवाढ करून सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे काम हे सरकार करत आहे, असा आरोप या शिवसैनिकांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील एकूण नऊ ही अगरासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे. अचानक सुरू केलेल्या या आंदोलनामुळे रस्त्यावर बसेसच्या रांगा लागल्या होत्या. त्याचबरोबर प्रवाशांचा देखील खोळंबा झाल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान एसटी ची भाडेवाढ रद्द करावे अन्यथा या पुढं देखील दर वाढी विवरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिला आहे.
मनोज जरंगे पाटील यांच्या समर्थनार्थ बार्शीत आमरण उपोषण ; सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
मराठा आंदोलन नेते मनोज जरंगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज बार्शीत आमरण उपोषण
बार्शी तहसील कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्याचा करण्यात आला प्रयत्न..
बार्शी येथील आंदोलन आनंद काशीद यांनी गेल्या तीन दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरू आहे आमरण उपोषण..
उपोषण स्थळी आनंद काशीद आणि त्यांच्या समर्थकांनी सरकारच्या निषेधार्थ वैकुंठ स्नान करत केले आंदोलन.
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन केले सुरू..
त्यांना पाठिंबा म्हणून बार्शी तहसील कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसापासून सकल मराठा समाजाकडून आमरण उपोषण सुरू
शाळेमध्ये ई-मेलच्या माध्यमातून बाँब ठेवल्याचा माहिती; परिसरात खळबळ, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
कांदिवली: मुंबईच्या कांदिवली पश्चिमेत एका शाळेमध्ये ई-मेलच्या माध्यमातून बाँब ठेवल्याचा माहिती देण्यात आली.
कांदिवली पश्चिमेल इराणी वाडी मध्ये असलेल्या KES इंटरनॅशनल स्कूल मध्ये हा बाँब ठेवण्याचा निनावी ई-मेल करण्यात आला,
आज सकाळी आठच्या सुमारास शाळेच्या कॅम्पुटर मध्ये ई-मेल आल्याच्या घटना घडली.
घटनेची माहिती मिळतात कांदिवली पोलीस आणि बाँब स्क्वाड पथक शाळेमध्ये दाखल होत शाळा खाली करून पूर्ण परिसर तपासण्यात आला.
पोलिसांच्या तपासणीमध्ये शाळेमध्ये बाँब नसल्याचे माहिती मिळाली.
यानंतर कांदिवली पोलिसांनी निनावी बाँब ठेवण्याचा ईमेल करणारा व्यक्तीचे विरोधात गुन्हा दाखल करून शोध घेतात...
2 दिवस पूर्वी ओशिवरा परिसरामध्ये देखील एका शाळेत बाँब ठेवण्याचं निनावी ईमेल करण्यात आला होता...