Maharashtra Headlines 13th May : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर, वाचा दुपारच्या बातम्या
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
सीबीआयकडून समीर वानखेडे यांच्या घराची तब्बल 13 तास झाडाझडती
एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या मुंबईतील निवासस्थानी सीबीआयने (CBI Raid) छापे टाकले. सोबतच सीबीआयने आर्यन खान (Aryan Khan) क्रूझ प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात त्यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने त्यांच्या मुंबई, दिल्ली, रांची आणि कानपूरमधील एकूण 29 ठिकाणी छापेमारी केली.
जळगावात उष्माघाताचा पहिला बळी, अमळनेरमध्ये महिलेचा उष्माघातामुळे मृत्यू
जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट (Heat Wave) पसरली असून तापमान 45 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचले आहे. त्याचा फटका अमळनेर येथील महिलेला बसला असून उष्माघाताने (Heat Stroke) तिचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. रुपाली राजपूत असे या महिलेचे नाव आहे. (वाचा सविस्तर)
दहा एकर जमीन, उच्चशिक्षित, तरीही लग्नासाठी मुलगी मिळेना; जळगावच्या तरूणाचे अनोखे आंदोलन
गेल्या काही वर्षांपासून लग्नासाठी (Marraige) मुलगी मिळणे मुश्किल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच गावाकडं शेती करत असलेल्या तरूणांना तर वधू मिळणे अवघड झाले आहे. मुलींना मुलाकडे शेती हवी असली तरी त्या स्वत: शेतात जाण्यासाठी तयार नसल्याचे आजचे चित्र आहे. याच विरोधाभासावर जळगावमधील (Jalgaon) तरुण शेतकऱ्याने अनोखे आंदोलन केले आहे. (वाचा सविस्तर)
सरकार तीन महिन्यात जाणार, अधिकाऱ्यांनी बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश पाळू नयेत : संजय राऊत
राज्यातील सरकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. सुप्रीम कोर्टानं शिंदे-फडणवीसांना उघडं पाडल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. फुटलेला गट हा मूळ पक्षावर दावा करु शकत नाही हे न्यायालयानं सांगितलं आहे. मग तुम्ही कसले पेढे वाटताय? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. या सरकारचा मृत्यू अटळ आहे. हे सरकार तीन महिन्यात जाणार असल्याचे राऊत म्हणाले. (वाचा सविस्तर)
किशोर आवारे हत्याप्रकरणात आमदार सुनील शेळकेंचा हात; आईच्या तक्रारीने खळबळ
पुण्याच्या तळेगावमध्ये किशोर आवारे हत्या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतलेलं आहे. या हत्येचा कट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंनी कट रचल्याचा आरोप आवारे यांच्या आईने केला. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. एफआयआरमध्ये आमदार सुनील शेळके, त्यांचे भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकरसह अन्य तीन अनोळखी माणसांचादेखील उल्लेख आहे. (वाचा सविस्तर)