एक्स्प्लोर

Pune Kishor Aware  Murder :  किशोर आवारे हत्याप्रकरणात आमदार सुनील शेळकेंचा हात; आईच्या तक्रारीने खळबळ

पुण्याच्या तळेगावमध्ये किशोर आवारे हत्या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतलेलं आहे. या हत्येचा कट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंनी कट रचल्याचा आरोप आवारे यांच्या आईने केला.

Pune Kishor Aware  Murder :  पुण्याच्या तळेगावमध्ये किशोर आवारे हत्या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतलेलं आहे. या हत्येचा कट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंनी कट रचल्याचा आरोप आवारे यांच्या आईने केला. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. एफआयआरमध्ये आमदार सुनील शेळके, त्यांचे भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकरसह अन्य तीन अनोळखी माणसांचादेखील उल्लेख आहे. 

श्याम निगडकरने साथीदारांच्या मदतीने आवारे यांची नगरपरिषदेसमोरच गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या केली. आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके आणि संदीप गराडे यांनी कटकारस्थान रचून त्यांचाच साथीदार श्यामला ही हत्या करायला लावली, असं किशोर आवारे यांच्या आईने एफआयआरमध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. 

किशोर आवारे यांचे  सुनील शेळके, सुधाकर शेळके,संदीप गराडे आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये नेहमीच भांडणे होत होती. गेल्या सहा महिन्यापासून किशोर हे नेहमी मला आमदार सुनील शेळके त्याचा भाऊ सुधाकर शेळके यांच्याकडून जिवाला धोका असल्याबाबत सांगत असत. तसेच माझ्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर ते याच लोकांपासून होईल हे प्रत्यक्षपणे सांगितले होते, असंही नमूद केलं आहे.  किशोर यांनी स्वतःचा वेगळा गट तयार करून सुनील शेळके यांना गेल्या दोन वर्षापासून पूर्णपणे राजकीय विरोध केलेला आहे. तसेच सोशल मीडियावरही ही याबाबत पोस्ट केली होती.

किशोर आवारे यांनी मार्च महिन्यात सोमटणे टोल नाका बंद करण्यासाठी आमरण उपोषण केलं होतं. त्या दरम्यानच मावळवासीयांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करत, टोल नाक्यावर मोर्चा धाडला होता. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री स्वतः या आंदोलनस्थळी आले होते. त्यानंतर हा टोल नाका बंद करण्याच्या दृष्टीने पावलं उचलण्यास सुरुवात झाली होती. मात्र दरम्यान किशोर आवारे यांचा निर्घृण खून करण्यात आला. आवारे आज नगरपरिषद कार्यालयात गेले होते. त्यावेळी हल्लेखोर कार्यालयाबाहेर दबा धरून बसले होते. ते बाहेर येताच हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने गोळीबार करत कोयत्याने वार केले. आवारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. त्यांच्या हत्येमुळे सगळीकडे शोक व्यक्त केला जास आहे. मात्र त्यांच्या आईने दिलेल्या तक्रारीमधेय सुनील शेळकेंचा उल्लेख असल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आलं आहे.  

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Portfolio : महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Maharashtra Cabinet Portfolio : अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Tafa Car Accident | केजमध्ये शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीला अपघात ABP MajhaMaharashtra Portfolio Allocation | महायुतीचं खातेवाटप जाहीर, चंद्रशेखर बावनकुळेंकडे महसूल ABP MajhaDeepak Kesarkar VS Aaditya Thackeray | शालेय गणवेशावरून आदित्य ठाकरे- केसरकरांमध्ये जुंपली ABP MajhaEVM Mahrashtra Election | EVM चं काठमांडू कनेक्शन? भारत जोडोतील नेत्यांचं काय संबंध? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet Portfolio : महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Maharashtra Cabinet Portfolio : अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेंना पर्यावरणाची जबाबदारी
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेंना पर्यावरणाची जबाबदारी
Maharashtra Cabinet Portfolio : देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी
खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी
Dhananjaya Yeshwant Chandrachud : माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
Embed widget