ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा; राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची तारीख जाहीर
ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांसाठी 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जातील.
मुंबई : राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7 हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची घोषणा झाली आहे. 21 मे 2021 रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. निधन, राजीनामा किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांसाठी 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जातील. त्यांची छाननी 7 डिसेंबर 2021 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 9 डिसेंबर 2021 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल. मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 22 मे 2021 रोजी होईल.
पुणे
पुणे जिल्ह्यात वेल्हे तालुक्यातील 43 ग्रामपंचायतींमधील 65 जागा, भोर 71 ग्रामपंचायती 121 जागा, पुरंदर 16 ग्रा.पं.-27 जागा, दौंड 6 ग्रा.पं.-6 जागा, बारामती 10 ग्रा.पं.-13 जागा, इंदापूर 6 ग्रा.पं.-8 जागा, जुन्नर 31 ग्रा.पं.-55 जागा, आंबेगाव 33 ग्रा.पं.-55 जागा, खेड 36 ग्रा.पं.-49 जागा, शिरुर 8 ग्रा.पं.-12 जागा, मावळ 15 ग्रा.पं.-19 जागा, मुळशी 35 ग्रा.पं.च्या 63 जागांसाठी तर हवेली तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीच्या 10 जागा अशा एकूण 317 ग्रामंपचायतीतील 503 जागांसाठी पोट निवडणूक होणार आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या :