Anand Mahindra : प्लॅस्टिक कचऱ्यापासून बूटाची निर्मिती, आनंद महिंद्रा 23 वर्षीय मुलाची मदत करण्यास तयार
Anand Mahindra : प्लास्टिक बॉटल आणि टाकावू बॅगच्या मदतीनं या मुलाची कंपनी बूटाची निर्मिती करते.
![Anand Mahindra : प्लॅस्टिक कचऱ्यापासून बूटाची निर्मिती, आनंद महिंद्रा 23 वर्षीय मुलाची मदत करण्यास तयार Anand Mahindra wants a pair of sneakers made from garbage, by 23-year-old's start-up Anand Mahindra : प्लॅस्टिक कचऱ्यापासून बूटाची निर्मिती, आनंद महिंद्रा 23 वर्षीय मुलाची मदत करण्यास तयार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/08/4be3271eb530bed185c40c5d81498998_original.webp?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Anand Mahindra : सामाजिक काम करणाऱ्यांच्या अथवा क्रिएटिव्हिटी दाखवणाऱ्यांच्या मदतीला महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा नेहमीच तयार असतात. याची अनेक उदाहरणं तुम्ही पाहिली असतील. त्यांच्या याच कार्यामुळे आनंद महिंद्रा नेहमीच चर्चेत असतात. आताही आनंद महिंद्रा आपल्या एका ट्वीटमुळे चर्चेत आहेत. आनंद महिंद्रा यांना एका 23 वर्षीय स्टार्टअप व्यावसायिकाची आयडिया आवडली. त्याला मदत करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. प्लास्टिक बॉटल आणि टाकावू बॅगच्या मदतीनं या मुलाची कंपनी बूटाची निर्मिती करते. या 23 वर्षीय मुलाची आयडिया मंहिंद्रा यांना आवडली. ट्वीट करत महिंद्रा यांनी मन की बात केली आहे. या 23 वर्षीय मुलाचं नाव आशय भावे (Ashay Bhave) असं आहे. टाकाऊ प्लॅस्टिकवर रिसायकल करुन बूट तयार करण्याची आयडिया आशय भावे याला शिक्षण घेत असताना सूचली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आशयनं लगेच स्टार्टअप सुरु केलं. आशय भावेच्या स्टार्टअपचं नाव 'थैली' (Thaely) असं आहे. आनंद महिंद्रा आशयच्या या कंपनीची मदत करण्यास तयार आहेत. त्यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.
Embarrassed I didn’t know about this inspiring startup. These are the kinds of startups we need to cheer on—not just the obvious unicorns. I’m going to buy a pair today. (Can someone tell me the best way to get them?) And when he raises funds-count me in! https://t.co/nFY3GEyWRY
— anand mahindra (@anandmahindra) November 17, 2021
वापरेल्या 10 बॅग, 12 प्लॅस्टिक बॉटल आणि रबरापासून आशयची कंपनी सरासरी बूटाच्या जोडीची निर्मिती करते. प्रत्येक वर्षाला वापरण्यात येणाऱ्या 100 अब्ज प्लॅस्टिक बॅगपासून रिसायकल करण्याचा उद्देश आशयच्या कंपनीचा आहे. या प्लॅस्टिक बॅग वर्षाला 1.2 कोटी बॅरेल तेलाचा वापर केला जातो. तसेच यामुळे प्रतिवर्ष एक लाख समुद्रातील जिवांचा मृत्यू होतो.
नॉर्वेचे माजी मंत्री Erik Solheim यांनी सर्वात आशयच्या कंपनीबाबत ट्वीट केलं होतं. त्यांनी आशयच्या 'थैली' कंपनीत बूटाची निर्मिती कशी होते, याबाबतचा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यासोबत त्यांनी आशयच्या आयडिचं कौतुकही केलं होतं. Erik Solheim यांचं ट्वीट पाहिल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी आपल्याला याबाबत माहित नसल्यामुळे सर्वात आधी खेद व्यक्त केला. तसेच ते म्हणाले की, अशा स्टार्टअपला आपण प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आनंद महिंद्रा यांनी आशयच्या कंपनीचे बूट खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय, स्टार्टअपला आर्थिक मदतही करण्यास तयार झाले आहे.
कंपनीची कधी झाली सुरुवात?
आशयच्या 'थैली' स्टार्टअपला जुलै 2021 मध्ये सुरुवात झाली. बूटाची एक जोडी तयार करण्यासाठी 10 वापरेल्या बॅग, 12 प्लॅस्टिक बॉटलचा वापर करते. प्लॅस्टिक बॅगला अतिप्रमाणात तापवून ThaelyTex या फॅब्रिकमध्ये रुपांतर केलं जातं. त्यानंतर याला बूटाच्या मापाने कापलं जाते. तसेच फॅब्रिकमध्ये रुपांतर कलेल्या प्लॅस्टिक बॉटलला rPET (Polyethylene Terephthalate) असं नाव देण्यात आलेय. याचा वापर लायनिंग, शू-लेस, पॅकेजिंग आणि अन्य भागासाठी वापर केला जातो. बूटाची लेस रिसायकल रबराची असते. या बूटाची किंमत 10 डॉलर इतकी असते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)