एक्स्प्लोर

महाविकासआघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे दोन तास महापौर बंगल्यावर

LIVE

महाविकासआघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे दोन तास महापौर बंगल्यावर

Background

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाच्या 29 दिवसांनी सरकार स्थापनेची प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह मित्रपक्षांची महाविकासआघाडी आजच सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज (22 नोव्हेंबर) दुपारी संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीनंतर संध्याकाळी महाविकासआघाडी सरकार बनवण्याचा दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सत्तापेच लवकर सुटेल, अशी अपेक्षा आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील किमान समान कार्यक्रम तयार झाला असून आज तो शिवसेनेसमोर मांडला जाईल. यानंतर आज कोणत्याही क्षणी सत्ता स्थापनेची घोषणा होऊ शकते. सोबकत सरकार बनवल्यानंतर खातेवाटप कसं करायचं हे देखील ठरलं आहे. त्यामुळे आता केवळ घोषणेची प्रतीक्षा आहे.

सिल्वर ओकवर राष्ट्रवादी-शिवसेनेची खलबतं
शरद पवार दिल्लीहून मुंबईत दाखल होऊन तासही लोटत नाही तोच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत सिल्वर ओकमध्ये दाखल झाले.  राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये काल (21 नोव्हेंबर) रात्री जवळपास सव्वा तास महत्त्वाच्या विषयावर खलबतं सुरु होती. रात्री 11 वाजता सुरु झालेली चर्चा सव्वाबारा वाजती संपली. राष्ट्रवादीकडून स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हजर होते. मुख्यमंत्रिपद, विधानसभाअध्यक्ष, खातेवाटप, एकसूत्री कार्यक्रम यासह अनेक महत्वाच्या मुद्यांवर पवार आणि ठाकरेंमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचं कळतं. बैठक संपल्यानंतर शरद पवारांच्या निवासस्थानातून बाहेर पडताना संजय राऊतांनी सकारात्मक चर्चा झाल्याचे संकेत दिले.

पवार-ठाकरे भेटीनंतर नवा फॉर्म्युला समोर
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आता महाविकासआघाडीचा नवा फॉर्म्युला समोर येत आहे. या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला 11 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्रीपदं, राष्ट्रवादी काँग्रेसला 11 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रीपदं तर काँग्रेसला 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदं मिळणार आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या नव्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला 27 महामंडळे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 25 महामंडळे मिळणार आहेत. तर सिद्धिविनायक ट्रस्टचा कारभार शिवसेनेकडे आणि शिर्डी संस्थानचा कारभार काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाहणार आहेत.

मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपचा मार्ग वेगळा
24 ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर सरकार स्थापनेचा पेच वाढला होता. निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळालं होतं. परंतु मुख्यमंत्रीपदाचा 50-50 म्हणजेच अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता, तो भाजपने मान्य करावा अशी मागणी शिवसेनेने सातत्याने केली. परंतु असा कोणताही फॉर्म्युला ठरला नव्हता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसल्याने दोन्ही पक्षाचे मार्ग वेगळे झाले. शिवाय भाजपने शिवसेनेला एनडीएमधून बाहेर काढत असल्याचं जाहीर केलं.

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाचा आग्रह
शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे असावेत, असा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आग्रह असल्याची माहिती समोर येत आहे. महाविकासआघाडीचा मुख्यमंत्री हा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांतील नेत्यांचा प्रमुख असणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची धुरा स्वतः उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या खांद्यावर घ्यावी, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

संबंधित बातम्या

22:05 PM (IST)  •  22 Nov 2019

महाविकासआघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे दोन तास महापौर बंगल्यावर
19:46 PM (IST)  •  22 Nov 2019

महाविकासआघाडीची चर्चा सकारात्मक, उद्याही चर्चा - पृथ्वीराज चव्हाण
20:35 PM (IST)  •  22 Nov 2019

20:35 PM (IST)  •  22 Nov 2019

20:35 PM (IST)  •  22 Nov 2019

मुख्यमंत्रीपदाचा आग्रह उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला, संजय राऊत यांची एबीपी माझाला फोनवरुन माहिती
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah on Maharashtra Vidhan Sabha : महाराष्ट्रात यंदा महायुतीचे सरकार, मात्रAmit Shah : यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंBadlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Embed widget