एक्स्प्लोर
सत्तास्थापनेपूर्वी पवार-ठाकरेंमध्ये खलबतं, रात्री उशिरा एक तास बैठक, बैठकीनंतर संजय राऊतांचे सकारात्मक संकेत
पवार मुंबईमध्ये दाखल होताच उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे आणि संजय राऊत पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी पोहोचले. या ठिकाणी पवार आणि ठाकरे यांच्यात बैठक सुरु असून यामध्ये काय चर्चा होणार हे बैठकीनंतर कळणार आहे. दरम्यान यावेळी कॉंग्रेसचा एकही नेता उपस्थित नव्हता हे देखील विशेष.
मुंबई : सत्तास्थापनेआधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात आज, शुक्रवारी ठरलेल्या बैठकीआधी गुरुवारी रात्री उशिरा बैठक झाली. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाविकासआघाडीच्या सत्तास्थापनेचा निर्णय आता जवळपास निश्चित झाला आहे. यासाठी आज, शुक्रवारी महाविकासआघाडीची बैठक आयोजित केली आहे. मात्र या नियोजित बैठकीआधी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री उशिरा पोहोचले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते आज रात्री मुंबईत दाखल झाले. पवार मुंबईमध्ये दाखल होताच उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे आणि संजय राऊत पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी पोहोचले. या ठिकाणी पवार आणि ठाकरे यांच्यात बैठक सुरु असून यामध्ये काय चर्चा होणार हे बैठकीनंतर कळणार आहे. दरम्यान यावेळी कॉंग्रेसचा एकही नेता उपस्थित नव्हता हे देखील विशेष.
रात्री 11.20 वाजता उद्धव ठाकरे शरद पवारांच्या निवासस्थानी आले. तेव्हापासून पवार-ठाकरे यांच्यात चर्चा सुरु झाली. ही चर्चा बराच वेळ सुरु होती. ही बैठक बरोबर रात्री 12.15 वाजता संपली. या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं, हे जरी समजलं नसलं तरी ही बैठक सकारात्मक झाल्याचे संकेत संजय राऊत यांनी अंगठ्याने 'थम्प्स अप' दाखवत दिले आहेत. या बैठकीत मुख्यमंत्रीपद, महत्वाची खाती आणि अन्य महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. या बैठकीला अजित पवार आणि सुप्रिया सुळे देखील उपस्थित होते.
एकूणच चित्र पाहता महाराष्ट्रात सरकार बनवण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कालपासून दिल्लीत लागोपाठ बैठका झाल्या. उद्या मुंबईत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होईल, त्यामुळे सत्तास्थापनेसंबंधीची कार्यवाही आता अंतिम टप्प्यात आली असल्याचे बोलले जात आहे. आज (22 नोव्हेंबर)संध्याकाळी 4 वाजता काँग्रेसच्या विधीमंडळ नेत्यांची निवडदेखील केली जाणार आहे.
महाराष्ट्रात पर्यायी सरकार बनवण्यासाठी परवापासून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान आमच्या दिल्लीतल्या चर्चा आता आटोपल्या आहेत. सत्तास्थापन करण्यावर आमचे एकमत झाले आहे. उद्या आम्ही मुंबईला जाणार आहोत. मुंबईत आम्ही आमच्या आघाडीमधील मित्रपक्षांशी चर्चा करणार आहोत. आतापर्यंतच्या चर्चेची त्यांना माहिती देऊ, पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीतील बैठकीनंतर सांगितले होते. आमचा किमान समान कार्यक्रम, सत्तास्थापन कधी करणार? मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असेल? मंत्रीमंडळात कोण कोण असणार? याबाबतची माहिती आम्ही शिवसेनेसोबतच्या चर्चेनंतरच जाहीर करु, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले होते. मात्र शुक्रवारी होणाऱ्या बैठकीआधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात रात्री उशीरा बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेसचे मात्र कुणीही उपस्थित नव्हते.
दरम्यान, 2017 दिवाळीत सगळ्यात पहिल्यांदा उद्धव ठाकरे सिल्वर ओक वर शरद पवार यांना भेटायला गेले होते. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी उद्धव ठाकरे सिल्वर ओकला गेले आहेत. याआधी शरद पवार मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटायला जायचे. प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी यांना घेऊन शरद पवार मातोश्री वर गेले होते. शरद पवार आणि मातोश्रीचे जवळचे संबंध होते. पण बाळासाहेबांनंतर ते संबंध कमी झाले होते. आता पुन्हा सिल्वर ओक आणि मातोश्री यांचे सूर जुळले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement