एक्स्प्लोर
Advertisement
फडणवीस सरकारला महात्मा फुले, डॉ. आंबेडकरांचा विसर!
पुरोगामी महाराष्ट्राची ओळख फुले, शाहू, आंबेडकर यांच्या कार्याच्या महतीने सांगितले जाते. सत्ताधारी असो वा विरोधक या तीन महापुरुषांना कधीही विसरत नाही. मात्र, या तिघांची थोरवी गाऊन सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारला महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा विसर पडला आहे.
मुंबई : महापुरुषांची थोरवी गात सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारला त्यांच्या पुण्यतिथीचा मात्र विसर पडल्याचं दिसत आहे. कारण राज्य शासनातर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या दिनदर्शिकेत महापुरुषांच्या पुण्यतिथीच्या तारखांचा उल्लेखच नसल्याचं समोर आलं आहे.
राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून सर्व विभागांना दिनदर्शिकेचं वितरण करण्यात आलं आहे. परंतु यात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीचा उल्लेखच नाही. दिनदर्शिकेत 1 डिसेंबरला जागतिक एड्स प्रतिबंधक दिन, 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण प्रतिबंधक दिन आणि 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिनाचा मात्र उल्लेख केला आहे.
पुरोगामी महाराष्ट्राची ओळख फुले, शाहू, आंबेडकर यांच्या कार्याच्या महतीने सांगितले जाते. सत्ताधारी असो वा विरोधक या तीन महापुरुषांना कधीही विसरत नाही. मात्र, या तिघांची थोरवी गाऊन सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारला महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा विसर पडला आहे.
महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या 2019 या नववर्षाच्या दिनदर्शिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर रोजी असलेल्या महापरिनिर्वाणदिनाचा आणि 28 नोव्हेंबरच्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीचा उल्लेखच नाही. राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने नवीन वर्षाची दिनदर्शिका प्रकाशित केली असून त्याचे वितरण मंत्रालयासह शासनाच्या सर्व कार्यालयांमध्ये करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर या महापरिनिर्वाणदिनी दादरच्या चैत्यभूमीवर जनसागर उसळतो. तमाम आंबेडकरी जनता या दिवसाची डोळे लावून प्रतीक्षा करतात. मात्र, राज्यसरकारच्या लेखी या दिवसाचे काहीच महत्व नसल्याचे दिनदर्शिकेतून दिसून आले आहे. तसेच थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीची तारीख 28 नोव्हेंबर आहे . मात्र, दिनदर्शिकेत या तारखेखाली काहीही नमूद असल्याचे आढळून आले आहे.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंची टीका
सरकारी दिनदर्शिकेत महात्मा फुले यांची पुण्यतिथी, महापरिनिर्वाण दिनाचा उल्लेख नसावा ही गंभीर बाब आहे. या सरकारकडून वारंवार महामानवांचा अवमान होत आहे. माहिती व जनसंपर्क विभाग वारंवार चुका करत असतांना कारवाई मात्र केली जात नाही. या सरकारला महामानवांच्या स्मृती पुसून टाकायच्या आहेत का?, अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
सरकारी दिनदर्शिकेत महात्मा फुले यांची पुण्यतिथी,महापरिनिर्वाण दिनाचा उल्लेख नसावा ही गंभीर बाब आहे.या सरकारकडुन वारंवार महामानवांचा अवमान होत आहे.माहिती व जनसंपर्क विभाग वारंवार चुका करत असतांना कारवाई मात्र केली जात नाही.या सरकारला महामानवांच्या स्मृती पुसून टाकायच्या आहेत का?
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 5, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement