एक्स्प्लोर

राज्यातील OBC नागरिकांच्या विकासासाठी कोणत्या योजना? कोणत्या संस्थेकडून किती आर्थिक मदत केली जाते?

Maharashtra Govt. Schemes For OBC : राज्य शासनाच्या इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागामार्फत ओबीसी नागरिकांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. 

मुंबई: राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग तसेच विशेष मागास प्रवर्गातील लोकांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक ऊन्नतीसाठी राज्य शासनाने अनेक योजना (Maharashtra Govt. Schemes For OBC) सुरू केल्या आहेत. शासनाच्या इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागामार्फत विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली या योजना राबवल्या जात आहेत. 

राज्यातील इतर मागासवर्गीय नागरिकांसाठी असलेल्या योजना खालीलप्रमाणे, (Schemes For OBC Maharashtra) 

मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांसाठी 72 वसतीगृहे सुरु करणार (OBC Students Hostel Scheme)

इतर मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुलांसाठी आणि मुलींसाठी प्रत्येकी एक शासकीय वसतीगृहे सुरु करण्यास नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. 36 जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रत्येकी 2 (100 मुले व 100 मुलींसाठी) या प्रमाणे 72 शासकीय वसतीगृहांमध्ये 7 हजार 200 विद्यार्थ्यांच्या निवासासाठी सुमारे 73 कोटी 81 लाख रुपयांच्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली. या वसतीगृहांसाठी गृहपाल, कनिष्ठ लिपीक, शिपाई, पहारेकरी, सफाई कामगार हे कंत्राटी पद्धतीने घेण्यात येतील. या वसतीगृहामुळे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना जिल्ह्याचे ठिकाणी शिक्षण घेणे सुलभ होणार आहे. 

परदेश शिष्यवृत्तींची संख्या वाढवली (OBC Students Scholarship Scheme)

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्तींची संख्या दहावरून पंच्याहत्तर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. 

महाज्योतीच्या माध्यमातून विविध निर्णय (Mahajyoti Yojana For OBC) 

महाज्योतीमार्फत राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्गातील घटकांचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास, संशोधन, रोजगारभिमुखता वृद्धी, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, ग्रामीण विकास, शेती विकास, व्यक्तिमत्व विकास, स्पर्धात्मकता विकास, सामाजिक ऐक्य व सलोखा आणि तत्सम क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येतात. या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत.  https://mahajyoti.org.in/

अमृत संस्था (Amrut Institution For OBC) 

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवती व इतर उमेदवारांसाठी विविध योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र संशोधन उन्नत व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेची पुणे येथे स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येते .

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता (OBC Students Scheme)

या विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण घेणे सुलभ व्हावे यासाठी या आश्रमशाळांमधील सुमारे 65 हजार विद्यार्थ्यांना टॅब पुरविण्यात आले होते.स्वयंसेवी संस्थांमार्फत विजाभज प्रवर्गाच्या मुलांसाठी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, विद्यानिकेतन व ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींकरीता चालविण्यात येणाऱ्या  आश्रमशाळांमधील विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या वंचित घटकांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण उपयोगी पडणार आहे.

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना (OBC Students Education Scheme)

 इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, त्यांना शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्जावरील व्याज उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातंर्गत 'शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना' राबविण्यात येते.  राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इमाव प्रवर्गातील विद्यार्थी अर्ज करू शकतात.

व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती

शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थांमधील पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खाजगी औद्योगीक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विर्द्यांर्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती करण्यात येते. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाच्या अनुषंगाने ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येईल.

रोजगाराभिमुख शिक्षण (OBC Students Employment Scheme)

ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना रोजगार, स्वयंरोजगार, व्यावसायिक अभ्यासक्रमातून जीवनमान उंचावे व रोजगारसंधी उपलब्ध व्हाव्यात या हेतूने इतर मागास बहुजन कल्याण विभाग सतत प्रयत्नशील राहील. 

शिष्यवृत्ती

विभागामार्फत ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील 3 लाख मॅट्रीकपूर्व व 90 लाख मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.

निपुण भारत योजना (Nipun Bharat Yojana) 

शिक्षण क्षेत्रात संपूर्ण भारतात सध्या निपुण भारत कार्यक्रम सुरू आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रासह भारतातील सर्व राजय देशातील तिसऱ्या इयत्तेपर्यंत सर्व 80 टक्के मुलांना मुलभूत भाषा आणि गणित थोडक्यात 2026 पर्यंत येईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत संचलित सर्व आश्रमशाळा निपुण भारत कार्यक्रमाचा भाग म्हणून कार्यरत आहेत. याकरिता निपुण भारत योजनेच्या धर्तीवर विजाभज प्रवर्गाच्या आश्रमशाळामधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

 धनगर समाज घटकासाठी विविध २२ योजना सूरू करण्यात येणार असून त्यासाठी एक हजार कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली असून महाराष्ट्र मेंढी,शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. 

वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना

या योजनेतंर्गत तांडा वस्तीच्या  विकासकामांना भरीव निधी देण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणि वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनाही प्रभावीपणे राबविण्यात येतील. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी २५ हजार तसेच धनगर समाजातील लाभार्थ्यांसाठी २५ हजार घरे बांधण्यात येतील यासाठी ६०० कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.इतर मागासवर्गींय घटकांसाठी येत्या तीन वर्षात मोदी आवास योजना सुरू करण्यात  येईल.या योजनेसाठी ३ वर्षात १२ हजार कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात येतील.त्यापैकी पहिल्या वर्षात ३ लाख  घरांसाठी ३ हजार ६०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

OBC व VJNT महामंडळांतर्गत विविध प्रवर्गासाठी उपकंपन्यांची स्थापना

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय विकास महामंडळातंर्गत लिंगायत समाजातील तरूण, सुशिक्षीत बेरोजगार आणि नवउदयोजकांना स्वयंउदयोजकांना अर्थसहाय देण्यासाठी जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाजासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ,वडार समाजासाठी पैलवान कै. मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळांची स्थापना करण्यात आली आहे.

राज्यातील इतर मागास प्रवर्गातील युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याकरिता कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने वेबपोर्टल www.msobcfdc.org सुरु  केलेले आहे. तसेच विभागाचे संकेतस्थळही सुरु आहे. ही वेबसाईट मराठी  व इंग्रजी दोन्ही भाषातून आहे. 

https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in/en  आहे. या संकेतस्थळावरील माहिती  विद्यार्थ्यी तसेच जनतेला अत्यंत उपयुक्त अशी आहे.                          

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PMRavindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Embed widget