एक्स्प्लोर

ओबीसी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि विज्ञान विषयांसाठी आता शिक्षक मिळणार : अतुल सावे

कला, वाणिज्य किंवा कला, विज्ञान अशा दोन विद्या शाखा असलेल्या आश्रम शाळांसाठी एकूण आठ शिक्षक मिळणार आहे. 

मुंबईराज्यातील ओबीसी (OBC)  आश्रम शाळेतील (Ashram School)  विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि विज्ञान विषयांसाठी आता शिक्षक मिळणार आहे.  141  खाजगी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमाशाळांसाठी 282 शिक्षकांचा पदे मंजूर करण्यात आली आहे. ओबीसी मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी अधिवेशनात दिलेल्या आश्वासनानुसार पदभरती होणार  आहे. 

विज्ञान शाखेसाठी वाढीव प्रत्येकी दोन विषय शिक्षकांची पदे मंजूर झाली आहे. ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी अधिवेशनात आश्वासन दिले होते. कला, वाणिज्य किंवा कला, विज्ञान अशा दोन विद्या शाखा असलेल्या आश्रम शाळांसाठी एकूण आठ शिक्षक मिळणार आहे. 

अशी होणार आश्रमाशाळांसाठी भरती?

  •  उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या (कनिष्ठ महाविद्यालय) विज्ञान शाखेसाठी वाढीव दोन शिक्षकांची पदे मंजूर 
  • ज्या उच्च माध्यमिक आश्रमशाळेत (कनिष्ठ महाविद्यालयात) कला/वाणिज्य आणि विज्ञान अशा दोन विद्याशाखा आहेत, त्या उच्च माध्यमिक आश्रमशाळेत एकूण आठ शिक्षकांची पदे अनुज्ञेय होतील
  •  मंजूर पदे सहा व अधिक नव्याने गणित/विज्ञान विषयासाठी मंजूर होणारी दोन पदे असतील
  • त्यापैकी कला/वाणिज्य विशेष विषय शिक्षकांची दोन आणि मराठी व इंग्रजी विषय शिक्षकाची दोन पदे 
  • याशिवाय उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या विज्ञान शाखेस गणित, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विशेष विषयांकरीता प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण चार विषय शिक्षक अनुज्ञेय राहतील

आश्रम शाळांमध्ये सोयीसुविधा पुरवण्यात त्रुटी 

राज्य शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या निधीच्या तुलनेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, जेवण आणि इतर सोयीसुविधा दिल्या जात असल्याची खात्री करावी. तसेच ज्या निवासी वसतिशाळांमध्ये संस्थाचालकांकडून या सोयीसुविधा पुरविण्यात त्रुटी अथवा कमतरता आढळून येत असल्यास त्याचा अहवाल विभागाकडे सादर करण्याचे आदेश मंत्री सावे यांनी अधिकाऱ्यांना दिले.  आश्रमशाळांना दर आठ दिवसाला ठरवून भेटी द्याव्यात, विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्था, विद्यार्थीसंख्या, पटपडताळणी यासह विविध बाबींचा तपासणीदरम्यान आढावा घेण्याचे आदेश अतुल सावे यांनी दिले आहे.

यशवंतराव मुक्त वसाहत घरकुल योजना, वसंतराव नाईक तांडा वस्तीसुधार योजनेतील तालुकानिहाय आढावा, सैनिकी शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता योजनेचा आढावा, मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ, मर्यादित राबविण्यात येणाऱ्या योजनांचे उद्दिष्ट आणि साध्य याचा आढावा तसेच नविन वसतिगृह सुरु करण्याबाबत इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री अतुल सावे यांनी आढावा घेतला. 

हे ही वाचा :


  

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: कंट्रोल रूमला डायल 112 वर आला फोन, पोलिसांची एकच धावपळ; घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा चक्रावली, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
कंट्रोल रूमला डायल 112 वर आला फोन, पोलिसांची एकच धावपळ; घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा चक्रावली, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Nashik Land Scam : शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा
शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा
Chandrashekhar Bawankule: नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, याची त्याची जबाबदारी करण्यापेक्षा....
नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, याची-त्याची जबाबदारी करण्यापेक्षा....
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
Embed widget