LIVE UPDATE | आघाडीचे नेते राज्यपालांना भेटायला जाण्याची शक्यता
LIVE
Background
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिला आहे. विधानसभेचा कालावधी संपण्याच्या एक दिवस आधी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत जनतेशी संवाद साधला. यावेळी मित्रपक्ष शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेबाबत त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्याचा शब्द भाजपने कधीच दिला नव्हता. तसेच पुढचं सरकार भाजपच स्थापन करेल, असा पुनरुच्चारही फडणवीस यांनी केला.
शिवसेना ज्या भाषेत बोलत आहेत, त्या भाषेत आम्हीही उत्तरं देऊ शकतो. मात्र आम्ही आमची मर्यादा कधीही ओलांडली नाही. शिवसेनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींवरची टीका विखारी होती. मात्र आम्ही दिवंगत बाळासाहेब ठाकरेंबद्दल कधीही चुकीचं वक्तव्य केलं नाही. बाळासाहेब आमच्यासाठी पुज्यनीय आहेत. तसेच उद्धव ठाकरेंवरही आम्ही कधी टीका केली नाही. आम्ही आमच्या मर्यादा कधीही ओलांडल्या नाहीत, याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करुन दिली.