एक्स्प्लोर

स्वप्नात देखील शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असं बडबडायचो : संजय राऊत

महाराष्ट्रातील थरारक सत्ता संघर्षाचा अनुभव शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी, दिल्लीत अधिवेशनासाठी जमलेल्या महाराष्ट्रातील खासदारांच्या स्नेह भोजनावेळी सांगितला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील विश्वासाचा धागा अतूट आणि मजबूत ठेवण्याची कामगिरी संजय राऊत यांनी कशी पार पाडली. याचा वृत्तांत स्वत: संजय राऊत यांनीच खासदारांसमोर जाहीर केला.

नवी दिल्ली : महाराष्ट्राने डर को खतम किया... महाराष्ट्राने सगळ्यांच्या मनात असलेली भिती संपवली. यामुळे महाराष्ट्रात परिवर्तन झाल आणि त्यामुळे महाराष्ट्राला वेगळी दिशा मिळाली असे मत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातील थरारक सत्ता संघर्षाचा अनुभव शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी, दिल्लीत अधिवेशनासाठी जमलेल्या महाराष्ट्रातील खासदारांच्या स्नेह भोजनावेळी सांगितला. राज्यात कोणाचे सरकार येणार काय होणार याबद्दल कोणालाच विश्वास नव्हता. 'मी सकाळी उठल्यापासून मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार असं म्हणायचो. एवढचं काय तर स्वप्नातदेखील मी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असं बडबडायचो', अस देखील ते यावेळी म्हणाले. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचे एकत्र स्नेह भोजन 4 डिसेंबर रोजी आयोजीत करण्यात आलं होत. या स्नेह भोजनावेळी खासदार श्रीनिवास पाटील आणि अरविंद सावंत यांचा सत्कारही करण्यात आला होता. या स्नेह भोजनावेळी सर्व खासदारांच्या आग्रहाखातर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पडद्यामागील सत्तासंघर्षाचा थरारक अनुभव सांगितला. तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील विश्वासाचा धागा अतूट आणि मजबूत ठेवण्याची कामगिरी संजय राऊत यांनी कशी पार पाडली. याचा वृत्तांत स्वत: संजय राऊत यांनीच खासदारांसमोर जाहीर केला. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राने देशाला दिशा दिली. आता देशातील इतर राज्यातले नेते ही म्हणत आहेत की 'ये हमारे यहा भी हो सकता है'. हा 36 दिवसांचा जो राजकीय खेळ होता, तो कमिटमेंटचा खेळ होता. शरद पवारांवर माझा कमालीचा विश्वास होता. शरद पवारांनी एकदा गोष्ट मनावर घेतली तर ते ती पूर्ण करतात यावर आमचा विश्वास होता. शरद पवारांनी साताऱ्याच्या राजाला घरी बसवण्याची कमिटमेंट देखील पाळली. Sanjay Raut | “मी झोपेतही बडबडायचो मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार” - संजय राऊत | नवी दिल्ली | ABP Majha राज्यातील सत्ता संघर्षाचा अनुभव सांगताना ते म्हणाले, एखाद्या थ्रिलर सिनेमासारखा हा अनुभव होता. राज्यात कोणाचे सरकार येणार काय होणार याबद्दल कोणालाच विश्वास नव्हता. मी सकाळी उठल्यापासून मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार अस म्हणायचो. एवढचं काय तर स्वप्नातदेखील मी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार अस बडबडायचो. शरद पवारांकडे जायला निघालो तर लोकांना वाटायच की, एक तर टोपी लागेल किंवा टोपी लावतील, अजित पवारांच्या शपथविधीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, सकाळी मला जेव्हा फोनवर कळाले अजित पवारांनी शपथ घेतली. तेव्हा मला वाटल तो जुन्या शपथविधीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण त्यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस आहे हे कळाल्यानंतर मला खात्री पटली. परंतु अजित पवार संध्याकाळपर्यंत राजीनामा देतील यावर आमचा विश्वास होता.

महत्त्वाच्या बातम्या

सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले
सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
आत्तापर्यंत राज्यातील किती शेतकऱ्यांना मिळाला कर्जमाफीचा लाभ, कोणत्या विभागात किती? सविस्तर आकडेवारी समोर 
आत्तापर्यंत राज्यातील किती शेतकऱ्यांना मिळाला कर्जमाफीचा लाभ, कोणत्या विभागात किती? सविस्तर आकडेवारी समोर 
सीजेपीची पुन्हा दिल्लीत धडक, शिक्षक दिनीच इंडिया गेटपासून मोर्चा; अभिजीत दिपकेंचा सरकारला इशारा
सीजेपीची पुन्हा दिल्लीत धडक, शिक्षक दिनीच इंडिया गेटपासून मोर्चा; अभिजीत दिपकेंचा सरकारला इशारा

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी, त्यांच्या हातात सुदर्शन चक्र - संजय राऊत
Mazgaon Ganpati Bappa Rally Marathi News: मुंबईतील माझगावचा मोरया मंडळाच्या आगमन मिरवणुकीत नेमकं काय घडलं?
Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Century : सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले
सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले
जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
सरकार आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याचा कॉकरोच जनता पार्टीचा आरोप;राष्ट्रीय कार्यकारी समितीची आज बैठक
सरकार आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याचा कॉकरोच जनता पार्टीचा आरोप;राष्ट्रीय कार्यकारी समितीची आज बैठक
Mhada Pune Lottery 2026 : गुड न्यूज, म्हाडाकडून पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 4462 घरांची लॉटरी जाहीर, घरांच्या किमती 13 लाखांपासून सुरु
पुण्यात घर खरेदीचं स्वप्न पाहणाऱ्यांना सुवर्णसंधी, म्हाडाकडून 4462 घरांची लॉटरी जाहीर, 13 लाखांपासून घरांच्या किमती सुरु
सीजेपीची पुन्हा दिल्लीत धडक, शिक्षक दिनीच इंडिया गेटपासून मोर्चा; अभिजीत दिपकेंचा सरकारला इशारा
सीजेपीची पुन्हा दिल्लीत धडक, शिक्षक दिनीच इंडिया गेटपासून मोर्चा; अभिजीत दिपकेंचा सरकारला इशारा
Abhijeet Dipke: 'विद्यार्थ्यांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक...' अभिजित दिपकेंचं देशातील सर्व शिक्षण मंत्र्यांना पत्र; शिक्षक भरती ते शाळांवर खर्च, सहा मुद्यांवर लक्ष वेधलं
'विद्यार्थ्यांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक...' अभिजित दिपकेंचं देशातील सर्व शिक्षण मंत्र्यांना पत्र; शिक्षक भरती ते शाळांवर खर्च, सहा मुद्यांवर लक्ष वेधलं
Embed widget