एक्स्प्लोर

Dahi Handi 2022 : आमचं सरकार हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचा सत्कार करणारं, यापुढे सर्व सण उत्साहात: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis : रवी राणा आणि नवनीत राणा यांना हनुमान चालीसा म्हटल्याबद्दल तुरुंगात जावं लागलं, तरीही ते मागे हटले नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

अमरावती: आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे खऱ्या अर्थाने गरीबांचे कैवारी आहेत, हनुमान चालीसा म्हटल्याबद्दल त्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं, आता आमचं सरकार आहे, आमचं सरकार हे हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचा सत्कार करणारं आहे असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते अमरावतीमध्ये राणा दाम्पत्यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात बोलत होते. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आता आपलं सरकार आलं आहे, सगळं कसं खुलं खुलं वाटतंय. दोन वर्षे सगळं बंदिस्त होतं. आता यापुढे गणेशोत्सव, दिवाळी सर्व सण उत्साहात साजरे होणार.  हे सरकार कोणालाही हनुमान चालीसा म्हटल्याबद्दल जेलमध्ये टाकणार नाही. हे सरकार हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचं सत्कार करणारं आहे."

रवी राणा आणि नवनीत राणा यांनी पाहिलेल्या विकासाचं स्वप्न आता साकार होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. रवी राणा आणि नवनीत राणा हे गरीबांचे कैवारी आहेत. म्हणूनच तुम्ही सगळे त्यांच्या मागे उभे आहात असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस हे आज अमरावतीमध्ये बोलत असताना म्हणाले की, "आता आपलं सरकार आलं आहे, सगळं कसं खुलं खुलं वाटतंय. दोन वर्षे सगळं बंदिस्त होतं. आता यापुढे गणेशोत्सव, दिवाळी सर्व सण उत्साहात साजरे होणार.  हे सरकार कोणालाही हनुमान चालीसा म्हटल्याबद्दल जेलमध्ये टाकणार नाही. हे सरकार हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचं सत्कार करणारं आहे."

रक्ततुला करण्यास नकार
अमरावतीच्या राणा दाम्पत्यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला होणार होती. यासाठी तीन हजार लोकांनी रक्तदान केली असल्याची माहिती होती. या रक्ततुलास देवेंद्र फडणवीसांनी नकार दिला. 

या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचताच देवेंद्र फडणवीसांनी हाताच्या इशाऱ्याने वजनकाटा हटवण्यास सांगितला. त्यानंतर तो वजनकाटा हटवण्यात आला आणि त्यांची  रक्ततुला रद्द करण्यात आली. यावर बोलताना अमरावतीच्या खासदार रवी राणा म्हणाल्या की, "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्याला नकार दिला नाही तर प्रोटोकॉलमध्ये त्यांचे रक्त आणि त्यांचे वजन आपण एकत्रित ठेऊ शकत नाही. त्यांचे जेवढे वजन आहे त्या पेक्षा दुप्पट रक्तदान करण्यात आलं आहे. हे रक्त आरोग्य विभागाला देण्यात आलं आहे. यावेळी जवळपास तीन हजार लोकांनी रक्तदान केलं आणि त्याच माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केलं."

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: अमरावती शहरातील रहमत नगरमध्ये युवकाची हत्या
Maharashtra Live blog updates: अमरावती शहरातील रहमत नगरमध्ये युवकाची हत्या
Sugar Price Diwali: मोठी बातमी! राज्य सरकार साखरेची किंमत कमी ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; राजू शेट्टींसह कारखानदारांचा मात्र विरोध
मोठी बातमी! राज्य सरकार साखरेची किंमत कमी ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; राजू शेट्टींसह कारखानदारांचा मात्र विरोध
Maratha Reservation: फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर मध्यरात्री उच्चस्तरीय बैठक, मनोज जरांगेंच्या कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवर चर्चा, काय-काय घडलं?
फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर मध्यरात्री उच्चस्तरीय बैठक, मनोज जरांगेंच्या कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवर चर्चा, काय-काय घडलं?
Rohit Pawar on Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार

व्हिडीओ

Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक
Gunratna Sadavarte On Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस
Vishakha Raut Nagarsevak : नगरसेवक पद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; ठाकरेंची वाघीण विशाखा राऊत काय म्हणाल्या?
Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde UP Vidhansabha Election 2027 Marathi News: लखनौत पोहोचले, तळ ठोकले; उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी 4C प्लॅनने सगळ्यांचं लक्ष वेधले, विनोद तावडेंची रणनिती गेमचेंजर ठरणार?
लखनौत पोहोचले, तळ ठोकले; उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी 4C प्लॅनने सगळ्यांचं लक्ष वेधले, विनोद तावडेंची रणनिती गेमचेंजर ठरणार?
Mumbai Crime Khar: मुंबईच्या खारमध्ये वेश्याव्यवसाय, मॉडेल तरुणीची सुटका; हॉटेलमध्ये काँडमची तीन पाकिटं, आयफोन प्रो मॅक्स अन् कॅश सापडली
मुंबईच्या खारमध्ये वेश्याव्यवसाय, मॉडेल तरुणीची सुटका; हॉटेलमध्ये काँडमची तीन पाकिटं, आयफोन प्रो मॅक्स अन् कॅश सापडली
Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
Nana Patole: कोरोना लसीमुळे कर्करोग अन् हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले; आमदार नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
कोरोना लसीमुळे कर्करोग अन् हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले; आमदार नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Rohit Pawar on Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
Sanjay Dutt Refuses To Speak Marathi: 'मी सहा वर्षे पुण्याच्या येरवडा तुरुंगात होतो तरीही मराठी शिकलो नाही'; संजय दत्तनं प्रताप सरनाईकांची मराठीत बोलण्याची विनंती धुडकावली, पाहा VIDEO
'मी सहा वर्षे पुण्याच्या येरवडा तुरुंगात होतो तरीही मराठी शिकलो नाही'; संजय दत्तनं प्रताप सरनाईकांची मराठीत बोलण्याची विनंती धुडकावली, पाहा VIDEO
Embed widget