(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी
Maharashtra Covid-19 cases Live Updates 18 January 2022 : राज्यातील आजची जिल्हानिहाय कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
मुंबई : गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत राज्याला आज काहीसा दिलासा मिळाला असून कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याचं दिसून येतंय. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 31 हजार 111 नव्या रुग्णांची भर झाली असून 24 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 29, 092 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. या आधी रुग्णसंख्या 40 हजारांच्या वर असायची, त्यात आता घट होत असल्याचं दिसून येतंय.
राज्यात 112 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 112 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 1860 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 959 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 24 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 24 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.95 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 68 लाख 29 हजार 992 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.3 टक्के आहे. सध्या राज्यात 22 लाख 64 हजार 217 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2994 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7,21,24,824 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईतील रुग्णसंख्येत घट, 5 हजार 956 नवे कोरोनाबाधित
मागील 24 तासांत 5 हजार 556 नवे कोरोना बाधित आढळले आहेत. तर नव्या बाधितांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात नागरिक कोरोनामुक्त झाले असून एकूण 15 हजार 551 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत सोमवारी 5 हजार 556 नवे रुग्ण आढळले असून 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 469 झाली आहे. तर 15 हजार 551 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे आतापर्यंत 9 लाख 35 हजार 934 मुंबईकरांनी कोरोनावर मात झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून 93 टक्क्यांवर पोहचला आहे.
परभणी जिल्ह्यात 203 नवीन कोरोना बाधितांची नोंद
परभणी कोरोना अपडेट
परभणी- जिल्ह्यात 24 तासात 203 नवीन कोरोना बाधितांची भर
2201 तपासण्यांत आढळले 203 नवीन रुग्ण
53 रुग्णांना देण्यात आला डिस्चार्ज
सध्या जिल्ह्यातील एकुण 920 रुग्णांवर उपचार सुरू
पुणे जिल्ह्यात 11 हजार 748 नवे कोरोनाबाधित
पुणे जिल्ह्यात आज एका दिवसांत नवे 11 हजार 748 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 8 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
परभणी जिल्ह्यात 24 तासात 203 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
परभणी जिल्ह्यात 24 तासात 203 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 53 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात 920 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात 144 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात 144 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 384 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
नांदेड जिल्ह्यात आज 451कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
नांदेड जिल्ह्यात आज 451कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.