एक्स्प्लोर

Maharashtra Coronavirus Lockdown LIVE Updates : निर्बंध शिथिल, नागरिक रस्त्यावर; मुलुंडच्या आनंदनगर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा

Maharashtra Coronavirus Lockdown LIVE Updates : देशासह राज्यातील कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन संबंधित अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Coronavirus Lockdown LIVE Updates : निर्बंध शिथिल, नागरिक रस्त्यावर; मुलुंडच्या आनंदनगर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा

Background

Maharashtra Lockdown Relaxation : राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात लॅाकडाऊन शिथील? काय सुरु, काय बंद?

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे, तर काही ठिकाणी परिस्थिती जैसे थे आहे.  वाशिम, सांगली, नंदुरबार, यवतमाळ कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळेचे जिल्हा प्रशासनाने  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निश्चित केलेल्या निकषांनुसार उद्यापासून (1 जून) सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आहेत. या संदर्भातील अधिकृत आदेश आज काढण्यात आला आहे. 

वाशिम जिल्ह्यात काय सुरू काय बंद?

  • सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहणार
  • अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने शनिवारी, रविवारी बंद
  • हॉटेल, रेस्टॉरंट, मद्य विक्री खानावळीमध्ये केवळ घरपोच पार्सल सेवेस मुभा
  • पेट्रोल डिझेल सेवा 2 वाजेपर्यंत सुरू 
  • अत्यावश्यक सेवा कृषी  सेवा वाहन 24 तास सुरू 

सांगली काय सुरू काय बंद?

  • अत्यावश्यक सेवेमधील सर्व किराणा दुकाने, फळं आणि दूध, बेकरी ,खाद्य आणि मटण दुकान 7 ते 11 सुरू राहणार
  • भाजी मंडई हे सकाळी 7 ते 11 सुरू राहतील मात्र आठवडा बाजार बंद राहतील.
  • 2 जून पासून अत्यावश्यक सेवेसोबतच इतर दुकानेही सकाळी  7 ते 2 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी 

यवतमाळ काय सुरू काय बंद?

  •  जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेसोबत इतर सेवेची दुकाने 2 जूनपासून  सकाळी 7 ते  दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू 
  • केवळ कृषिशी संबंधित दुकाने 3 वाजेपर्यंत सुरू 
  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने शनिवार आणि रविवार बंद 

नंदुरबार काय सुरू काय बंद?

  •  सर्वच व्यापारी आस्थापना दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार
  •  कृषी संदर्भातील आस्थापना 6 वाजेपर्यंत सुरू राहणार 
  • रात्रीची संचारबंदी कायम 

अकोला  जिल्ह्यात काय सुरू काय बंद?

  • सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकानं, पेट्रोलपंप राहतील सुरू
  •  बँका 10  ते 3 या वेळेत सुरू 

रत्नागिरी जिलह्यात काय सुरू काय बंद?

  •   दुध व किराणा मालाची दुकाने यांना केवळ घरपोच सेवा सकाळी 07.00 ते 11.00 या वेळेत पुरविता येईल.
  • रत्नागिरी जिल्ह्याच्या सिमा अन्य जिल्हयातून प्रवेश करणेस किंवा अन्य जिल्ह्यात प्रवास करणेस बंद करणेत येत आहेत.
  •  केवळ नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी वैदयकिय उपचारासाठी किंवा निकडीच्या 1 आणिबाणीच्या प्रसंगी रत्नागिरी जिल्हयात प्रवेश करणेस किंवा रत्नागिरी जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात प्रवास करणेस मुभा राहील.
  • जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस 48 तास अगोदर केलेली कोव्हीड-19 निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र सोबत असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही
  • मालवाहतुकीसाठी कोणतेही बंधन असणार नाही. 
  • शेतीच्या पेरणीचा हंगाम विचारात घेता कृषिविषयक संलग्न सर्व दुकाने सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 या काळात सुरु ठेवणेस मुभा 

पिंपरी चिंचवड 1 जून ते 10 जूनसाठी नवी नियमावली काय सुरू काय बंद?

  • अत्यावश्यक दुकानांशिवाय इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू
  • सर्व बँका खुल्या असणार
  • हॉटेल, रेस्टॉरंट, मद्य विक्री खानावळीमध्ये केवळ घरपोच पार्सल सेवेस मुभा
  • मद्यविक्रीची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 खुली राहणार 
  • ई कॉमर्समार्फत अत्यावश्यक वस्तू आणि सेवा यांची घरपोच सेवा करण्याची मुभा
  • दुपारी 3 नंतर अत्यावश्यक कारण वगळता कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही
  • कृषी संबंधित दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू

परभणीत  काय सुरू काय बंद?

  • किराणा,भाजीपाला,फळ विक्रेत्यांना सकाळी  7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मुभा
  • शनिवार व रविवार सर्व  बंद
  • शेती संबंधित निगडीत सर्व दुकाने, बाजार समिती, मोंढा, आडत बाजार यांना आठवड्याचे सर्व दिवस सकाळी 7 ते  संध्याकाळी 5 वाजेपर्यंत परवानगी

कल्याण- डोंबिवली काय सुरू काय बंद?

  • सर्व अत्यावश्यक वस्तू आणि सेवांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू
  • अत्यावश्यक वस्तू वितरणासोबत अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंचे वितरण ई कॉमर्स (ऑनलाइन पध्दतीने) करता येईल.
  • दुपारी 3 नंतर वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगाव्यतिरिक्त येण्या-जाण्यावर निर्बंध 
  •  कोरोना विषयक कामे करणाऱ्या कार्यालयाव्यतिरिक्त इतर शासकीय कार्यालये 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू 
  • कृषी विषयक दुकाने आठवड्याचे सर्व दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरू 
  • दुपारी 2 नंतर दुकाने आणि कार्यालयात माल वाहतुकीद्वारे वितरण करण्यासाठी मुभा 
  • दुपारी 2 नंतर कोणत्याही दुकानात किंवा कार्यालयात ग्राहकांना थेट काउंटर विक्री करता येणार नाही
  • अत्यावश्यक नसलेली केवळ इतर एकल दुकाने ( मॉल्स आणि शॉपिंग सेंटर वगळता) सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू 
  • अत्यावश्यक नसणारी सर्व दुकाने शनिवार आणि रविवार बंद राहणार

Lockdown Relaxation in Mumbai : मुंबईत आजपासून निर्बंध शिथील; दुकाने खुली करण्यासाठी सम-विषम फॉर्म्युला

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा आलेख खाली येताना दिसत आहे. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे मुंबईत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. मुंबईमध्ये सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सर्व अत्यावश्यक आणि बिगर अत्यावश्यक दुकाने सुरु राहतील. दुकाने सुरु करण्यासाठी सम-विषम फॉर्म्युला वापरण्यात आला आहे. रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सोमवार, बुधवार आणि शुक्रवार तर दुसऱ्या बाजूची दुकाने मंगळवार आणि गुरुवार अशी सुरु राहतील. तर शनिवार रविवार आवश्यकतेनुसार दुकाने बंद राहतील. 

मुंबईत काय सुरु, काय बंद?

  • आवश्यकतेतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत उघडी राहतील. पहिल्या आठवड्यात रस्त्याच्या उजव्या बाजुकडील दुकाने सोमवार, बुधवार व शुक्रवार उघडी राहतील. तर रस्त्याच्या डाव्या बाजूकडील दुकाने मंगळवार, गुरुवार उघडी राहतील. पुढील आडवड्यात रस्त्याच्या डाव्या बाजूकडील दुकाने सोमवार, बुधवार व शुक्रवार उघडी राहतील व रस्त्याच्या उजवीकडील दुकाने मंगळवार, गुरुवार उघडी राहतील. शनिवार व रविवारी आवश्यकतेतर दुकाने पूर्णत: बंद राहतील.
  • ई कॉमर्स अंतर्गत अत्यावश्यक वस्तूंबरोबर आवश्यकतेतर वस्तुंचे वितरण करण्यास परवानगी असेल.
  • राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 किंवा राज्यात लागू असलेल्या इतर कायद्यान्वये जारी केलेले 'ब्रेक-द-चेन' बाबतचे आदेश अस्तित्वात असेपर्यंत हे आदेश लागू राहतील.
  • शासनाने वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे सर्व व्यापारी आस्थापनांना सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर व इतर उपाययोजना अनिवार्य राहतील.

 

10:09 AM (IST)  •  02 Jun 2021

निर्बंध शिथिल, नागरिक रस्त्यावर; मुलुंडच्या आनंदनगर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा

लॉकडाऊनच्या निर्बंधात 1 जूनपासून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली असली तरी आज पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.  ठाण्याहून मुंबईच्या दिशेने येताना आनंदनगर टोलनाक्यावर सुद्धा सकाळच्या वेळी अनेक वाहनं रस्त्यावर पाहायल मिळत आहेत. वाहनांची रांग जरी दिसत असली तरी पोलिसांकडून प्रत्येकाचे ओळखपत्र तपासूनच त्याला पुढे मुंबईच्या दिशेने जाऊ दिले जात आहे.
06:28 AM (IST)  •  02 Jun 2021

कल्याण डोंबिवलीत आज-उद्या फक्त शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण, इतरांचे लसीकरण आज बंद

कल्याण डोंबिवलीमध्ये आज आणि उद्या असे दोन दिवस शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचेच लसीकरण होणार असल्याची माहिती केडीएमसी प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे आज इतर नागरिकांचे लसीकरण केले जाणार नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश निश्चित झालेल्या 18 ते 44 वयोगटातील विद्यार्थ्यांना कोविशील्ड लस दिली जाणार आहे. आज (2 जून) आणि उद्या (3 जून) असे दोन दिवस कल्याण पश्चिमेकडील आर्ट गॅलरी इथे सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे लसीकरण सुरु राहणार आहे. 20 फॉर्म अथवा DS 160 फॉर्म किंवा प्रवेश निश्चित झाल्याचे परदेशी विद्यापीठाचे/शिक्षण संस्थेचे पत्र या दोन्हीपैकी एक यासह आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगण्याचे आवाहन पालिकेने केलं आहे. परदेशी शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झालेल्या पात्र विद्यार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन केडीएमसीतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान महापालिकेला लस उपलब्ध न झाल्यामुळे इतर सर्व नागरिकांचे आणि इतर सर्व केंद्रांवर आज लसीकरण बंद राहणार असल्याची माहितीही केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.

10:26 AM (IST)  •  01 Jun 2021

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा बंदी

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा बंदी. जिल्ह्याच्या खारेपाटण, करूळ, आंबोली, बांदा सीमा अत्यावश्यक सेवा वगळता परजिल्ह्यातील किंवा परराज्यातील व्यक्तींना वाहतुकीसाठी परवानगी नाही. १ जून ते १५ जून पर्यत जिल्हा बंदी. या काळात जिल्याच्या सर्व सीमा बंद राहतील, जिल्हाधिकाऱ्याचा आदेश. अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय कारणासाठी किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू तसेच कोविड १९ निगडित व्यक्तींना जिल्हाबंदीतुन सूट

09:34 AM (IST)  •  01 Jun 2021

दुकानांची डावी-उजवी बाजू कशी ठरवायची? दुकानमालकांमध्ये बीएमसीच्या परिपत्राबाबत संभ्रम

दुकानांची डावी-उजवी बाजू कशी ठरवायची? दुकानमालकांमध्ये बीएमसी परिपत्राबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. वेळ वाढवून दिल्याने ग्राहकांची गर्दी कमी होईल, मात्र व्यवसायात फारसा दिलासा नाही मिळणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मुंबई महापालिकेने दुकान उघडी ठेवण्याच्या वेळेमध्ये शिथिलता दिली आहे. त्यानुसार सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकान उघडे ठेवता येणार आहे.  मात्र परिपत्रकात नमूद केल्यानुसार एक दिवस उजव्या बाजूच्या तर दुसऱ्या दिवशी डाव्या बाजूच्या दुकान उघडी ठेवण्याचा निर्णयबाबत दुकान मालक संभ्रमात आहेत. मार्केटमध्ये उजवी आणि डावी बाजू कशी ठरवायची याबाबत कोणतेही स्पष्टता नाही किंवा तशाप्रकारच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे दुकान दोन वाजेपर्यत उघडे ठेवायचं हे कळलं असून फारसा दिलासा यामध्ये मिळला नाही असं दुकान मालकांचं म्हणणं आहे. तर किराणा दुकानामध्ये वेळ वाढवून मिळाल्याने ग्राहकांची सकाळी होणारी गर्दी कमी होईल, असंही दुकान मालकांना वाटतं.

09:31 AM (IST)  •  01 Jun 2021

पुणे शहरातील लॉकडाऊन मध्ये आज पासून अंशतः बदल

पुणे शहरातील लॉकडाऊन मध्ये आज पासून अंशतः बदल करण्यात आला आहे. सर्व प्रकारची दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार पुण्यातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या लक्ष्मी रस्त्यावर आज सकाळपासूनच दुकान उघडण्यासाठी आणि साफसफाई करण्यासाठी व्यापाऱ्यांची लगबग सुरू आहे. मागील दोन महिन्यांपासून बंद असलेला दुकान व व्यापाऱ्यांनी साफसफाईला सुरुवात केली आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
Sanjay Raut : राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
Maharashtra Assembly Election 2024: हिंदू समाज उदासीन, 50 टक्के मतदान होणे हे एक प्रकारची राष्ट्रीय आपत्ती: गोविंद देवगिरी महाराज
हिंदू समाजात मतदानाबद्दल उदासीनता; बीडमध्ये गोविंद देवगिरी महाराजांचं वक्तव्य
Supriya Sule on Devendra Fadnavis : तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Full PC : सुप्रिया सुळेंचं देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाल्या?Sanjay Raut Full PC : शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं; शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेतTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaJammu Kashmir Assembly Conflict : कलम 370 पुन्हा लागू करण्याच्या प्रस्तावावरून  धक्काबुक्की

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
Sanjay Raut : राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
Maharashtra Assembly Election 2024: हिंदू समाज उदासीन, 50 टक्के मतदान होणे हे एक प्रकारची राष्ट्रीय आपत्ती: गोविंद देवगिरी महाराज
हिंदू समाजात मतदानाबद्दल उदासीनता; बीडमध्ये गोविंद देवगिरी महाराजांचं वक्तव्य
Supriya Sule on Devendra Fadnavis : तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
Pune News: पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
Jitendra Awhad on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
Sanjay Raut: एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
Embed widget